सौर वाळवणी यंत्र
साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्यक असते. यासाठी अनेक प्रकारांमध्ये सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) उपलब्ध आहे. वरती धुराडे असलेला कॅबिनेट ड्रायर विविध पिकांसाठी उपयोगी ठरतो.
सौर फोटोव्हेल्टाइक पंप
नदी, नाले किंवा विहिरी इत्यादी स्रोतांपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये चार मुख्य भाग असतात…
- सौर फोटोव्होल्टाइक मॉड्युल पॅनेल,
- विद्युतभार कंट्रोलर,
- प्रत्यावर्ती (डी. सी.) पंप,
- पाइप.
सौर पंप प्रणालीमध्ये फोटोव्होल्टाइक मॉड्युल हा मुख्य भाग असून, यामध्ये अनेक सौर मॉड्युल एकमेकांना पंपाच्या शक्तीनुसार जोडलेले असतात. सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी 8.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास विनातक्रार कार्य करतात. सौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारा बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग करता येतो. विद्युतभारित बॅटरीद्वारा कन्व्हर्टर वापरून विविध विद्युत उपकरणे वापरता येतात.
सौर घरगुती दिवे
वीजनिर्मितीसाठी सौर पॅनेलचा उपयोग होतो. सौर पॅनेलची काच विशिष्ट प्रकारची असल्यामुळे सहज फुटत नाही. त्यामुळे सौर पॅनेलची विशिष्ट निगा ठेवावी लागत नाही. हे संच तीन वॉट ते 75 वॉट या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. विजेच्या मागणीप्रमाणे पॅनेलच्या संचाची संख्या ठरविली जाते.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.