गुगल तर्फे भारतीय संस्थेस कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात संशोधनासाठी भरघोस अनुदान

0

जगातील असंख्य प्रश्नावर तोडगा काढण्यसाठी नवनवीन तंत्राचा उपयोग होतो आहे.त्यापैकीच एक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). कापसाच्याअतिनुकसानदायक किडीवर बोंडअळीवर संशोधनासाठी वाधवानी इनस्टीट्युट ऑफआर्टिफिशियल इंटेलिजन्स ला चक्क १४ कोटी रुपयांच अनुदान गुगल या जगप्रसिध्द कंपनीने दिले.

मुंबई.

भारतीय हुशारीच नेहमीच कौतुक होत हे नक्कीच परंतु भारताकडून उशिरा आणि बाहेरील देशांकडून आधी.

असाच प्रकार नेमका घडला नुकताच, कापूस या नगदी पिकाला सर्वाधिक हानी पोहचविणारया बोंडअळीवर संशोधनासाठी वाधवानी इनस्टीट्युट ऑफआर्टिफिशियल इंटेलिजन्स ला चक्क १४ कोटी रुपयांच अनुदान गुगल या जगप्रसिध्द कंपनीने दिले.जगातील अनेक समस्यांवर,प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( आर्टिफिशीयल इंटिलिजेन्स) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे.

गुगलने आर्टिफिशयल इंटिलिजन्स इम्पॅक्ट या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेत संशोधन करणाऱ्या संस्थांनी सहभाग नोंदवला होता. यातील तीनच संस्थांना १४ कोटी रुपयांचं अनुदान गुगलने जाहीर केलं आहे. ‘डब्ल्यूआयएआय’ ही त्यापैकीच एक संस्था आहे. सुनील आणि रोमेश वधवानी या दोन भावांनी या संस्थेची स्थापना केली आहे. कापसाला लागणाऱ्या बोंडअळीचा प्रश्न सोडवण्यासाठी या संस्थेने मोलाचं संशोधन केलं आहे.

गहू आणि भातानंतर देशात सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे कापसाचं होय. कापसासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचाही वापर केला जातो. पण असं असताना देखील कीडीमुळे, बोंडअळीमुळे कापसाच्या पीकाचे भरपूर नुकसान होते. २०१७-१८मध्ये बोंडअळीमुळे ४० टक्के कापसाच्या पीकाची नासाडी झाली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन बोंड अळीचा अभ्यास या संस्थेने केला आहे.

वेगवेगळे अलगोरिदम तयार करून बोंड अळीच्या नेमक्या कोणत्या प्रजातींची कापसाच्या पीकाला सर्वाधिक लागण होते, याचा शोध या संस्थेने घेतला आहे. बोंडअळीच्या सहा प्रजातींची सर्वाधिक लागण कापसाच्या पिकाला होतं आहे. या प्रजातींची यादी तयार करून त्यांच्यावर कोणती कीटकनाशकं सर्वाधिक प्रभावशाली ठरतील याचा ही या संस्थेने अभ्यास केला आहे. या संशोधनासाठी गुगलने १४ कोटींचे अनुदान या संस्थेला जाहीर केलं आहे.

आता या संशोधनाचा कापसाच्या शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.