1) कापूस –
पाते लागणे, फुले लागणे, बोंड वाढीची अवस्था- कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार पिकास संरिंक्षत पाणी द्यावे.
2) तूर –
फांद्या वाढीची अवस्था- तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार पिकास संरक्षित पाणी द्यावे.
3) हळद-
कंद वाढीची अवस्था- हळद पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार हळद पिकास संरक्षित पाणी द्यावे.
4) रब्बी ज्वारी-
पेरणी अवस्था- पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करावी.
5) रब्बी सूर्यफूल-
पेरणी अवस्था- पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन रब्बी सूर्यफुल पिकाची पेरणी करावी.
6) रब्बी भूईमुग –
पेेरणी अवस्था- पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन रब्बी भुईमूग पिकाची पेरणी करावी.
7) केळी –
वाढीची अवस्था-केळी बागेस पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी बागेत अच्छादन करावे.
8) द्राक्ष –
छाटणी अवस्था-पाण्याची उपलब्धता असल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करावी.
9) सिताफळ-
फळ वाढीची अवस्था- सिताफळ बागेस संरक्षित पाण्याची व्यवस्था करावी.
10) भाजीपाला-
वाढीची अवस्था- भाजीपाला पिकास उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुुसार संरक्षित पाणी द्यावे.
11) फुलशेती-
वाढीची अवस्था-पावसात पडलेल्या खंडामुळे फुलपिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!