सद्यस्थितीत पिकाच्या अवस्थेप्रमाणे तज्ज्ञांचा सल्‍ला

1

पिकांचे नाव अवस्था कृषी सल्ला
गहु-पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन बागायती गहु पिकाची पेरणी 20 नोव्हेंबरपर्यंत करता येते. बियाण्यांची मात्रा 100 ते 125 किलो प्रती हेक्टरी एवढी ठेवावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टटन किंवा थायरम 3 ग्रॅम प्रती किलो याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी.
हरभरा-पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबरपर्यंत करता येते. बागायती क्षेत्रात बियाणे कमी खोलीवर (5 सेंमी) पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 4 ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्डॅझिम 2 ग्रॅम प्रती किलो याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी.
करडई-पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबरपर्यंत करता येते. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 4 ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्डॅझिम 2 ग्रॅम प्रती किलो याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी.
ऊस-वाढीची अवस्था
ऊस पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार फिप्रोनील 0.3 टक्के 13 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावे किंवा ओल असताना मेटारायझियम अ‍ॅनोसोप्ली जैविक बुरशी 4 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावी.
संत्रा किंवा मोसंबी-वाढीची अवस्था
संत्रा किंवा मोसंबी फळबागेत ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. बागेत फळगळ होऊ नये म्हणून झाडांवर 13: 00: 45, 10 ग्रॅम + झिंक सल्फेट 5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डाळिंब-वाढीची अवस्था
ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज लक्षात घेता डाळिंब बागेत तेल्यारोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात. डाळिंब बागेस पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बागेत झाडाभोवती आच्छादन करावे.
चिकू-वाढीची अवस्था
चिकू बागेस पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बागेत झाडाभोवती आच्छादन करावे.
फुल शेती-वाढीची अवस्था
गुलाब फुलपिकाची छाटणी केली नसल्यास छाटणी करावी. फुलपिकात रसशोषन करणार्‍या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लो प्रीड 17.8 टक्के 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला लागवड-
गादी वाफ्यावर तयार केलेली रोपे लागवडीसाठी तयार असल्यास टोमॅटो, वांगी, कोबी या पिकांची पूनर्लागवड करून पाणी द्यावे.
चारा पिके लागवड-
पाण्याची उपलब्धता असल्यास लुसर्न, बर्सीन, ओट व मका या चारापिकांची लागवड 15 नोव्हेंनबरपर्यंत करता येते.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. Anonymous says

    5

Leave A Reply

Your email address will not be published.