पिस्ताची सुलभ शेती

1

भारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार या पदार्थांमध्ये बदल होत असतो. भारतात अनेक ठिकाणी विविध पदार्थांमध्ये आणि मिष्टान्नांमध्ये सुका मेवा वापरला जातो. यापैकी महत्वाचा एक असा पिस्ता. जाणून घेऊया पिस्ताची शेती कशी करतात.

भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. पिस्ता आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहेच, याबरोबरच पिस्ता मध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म दडले आहेत. कॅलरी कमी असलेल्या पिस्ता मध्ये एंटीऑक्सीडेंट्स, विटामिन, मिनरल्स आणि मोठ्या प्रमाणात फाइबर चा समावेश आहे.

हवामान आणि तापमान :

प्रत्येक पिकासाठी योग्य हवामान असणे अत्यंत गरजेचे आहे. पिस्ताच्या पिकाला दिवसात अधिकतम ३६ डिग्री सेंटीग्रेड तापमान चालू शकते.

जमीन आणि माती :

अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये पिस्ताची शेती करणे शक्य आहे. मात्र असे असले तरी लागवड करण्याआधी मातीच्या क्षमतेची चाचणी करणे आवश्यक आहे.

७.० ते ७. ८ सामू असलेली जमीन पिस्ता शेतीसाठी चांगली मानली जाते.

जमिनीची मशागत :

जमिनीची खोलगट नांगरणी करणे पिस्ता शेतीसाठी करणे आवश्यक आहे. पिस्ताची मुळे जमिनीत खोलवर जातात त्यामुळे जमिनीच्या आत सहा ते सात फुटापर्यंत जर टणक भाग असेल तर तो तोडून जमीन समतल करावी.

रोप व्यवस्थापन :

  • रोप लावण्यासाठी खोल खड्डा खणावा, यामुळे रोप योग्य रीतीने सामावली जातील.
  • रोपांमध्ये किती अंतर ठेवावे हे पाणी व्यवस्थापनावर अवलंबून आहे.
  • सिंचन व्यवस्था असलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 6 मीटर x 6 मीटर अंतर ठेवावे.
  • सिंचन व्यवस्था नसलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 8मीटर x10 मीटर अंतर ठेवावे.

सिंचन व्यवस्थापन :

पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे कारण पिस्ता च्या पिकाला कमी पाणी लागते. तरी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास रोपाभोवती गावात टाकून ते ओले करावे. पावसाळ्यात पाणी साठणार नाही याची खात्री करावी.

कापणी :

पाच वर्षाचा कालावधी नंतर पिस्ता च्या झाडाला उत्पादन सुरु होते. पिस्ता चे झाड पाच वर्षानंतर उत्पादन देण्यास सुरुवात करते आणि रोप लागवडीच्या १२ वर्षानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. अविकसित फळांची कापणी होणार नाही याची काळजी कापणी करताना घ्यावी.

उत्पादन :

पिस्ताचे उत्पादन हवामान, जाती तसेच शेती व्यवस्थापनाचा दर्जा यावर अवलंबून आहे. लागवडीनंतर १० ते १२ वर्षांनी प्रत्येक झाड ८ ते १० किलो उत्पादन देते.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] पिस्ताची सुलभ शेती […]

Leave A Reply

Your email address will not be published.