शेवगा

0

शेवग्यासाठी हलकी बरड माळरानाची निकस माती वाहून गेलेली आणि एकंदरीत कोणत्याच पिकासाठी योग्य नाही, अशी जमींन चालते असे म्हणे योग्य होणार नाही. अश्या जमिनीत शेवग्याची लागवड केल्यास झाडे वाढतात, शेंगाही लागतात पण शेंगा लागण्याचे प्रमाण आणि शेंगाची प्रत समाधान कारक राहत नाही. आणि अशा जामिनीत शेवग्याची शेती किफायतशीर राहत नाही.

बांधवर वारा प्रतीबंधक म्हणून ही शेवग्याची लागवड करतात. अशा शेवग्याच्या झाडांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

किफायतशीर उत्पादनासाठी शेवग्याची लागवड शेवग्याची बाग म्हणूनच करायला पाहिजे आणि बाग म्हटले कि सर्व बाबींचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे बागेचे नियोजन केल्यास बागेपासून फायदा होतो. हलक्या व अति खडकाळ जमिनीत लागवड केल्यावर किफायतशीर राहत नाही. अश्या जमिनीत लागवड केल्यास बागेस खताची व आवश्यक तितक्या पाण्याची सोय करता आली नाहीतर ती बाग परवडत नाही.

मध्यम ते बहरी जमिनीत ज्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण ०.५ ०.३ ०.४ टक्के इतके किवा त्यापेक्षाही जास्त असते. अश्या जमिनीत शेवग्याची बाग उत्तम प्रकारे येतात व जास्त उत्पन्न देतात. अशा जमिनीत शेंगाचे उत्पन्न अत्यंत समाधानकारक असल्यामुळे शेवग्याचे अर्थशास्त्र बरोबर जुळते.

शेवग्याला मध्यम आणि उत्तम जमीन लागत नसली तरी उत्तम निचरा असला पाहिजे. शेवग्याचे खोड ठिसूळ असते. त्यामुळे पाणी धरून ठेवणाऱ्या व चोपण जमिनीत शेवग्याचे खोड सडते. मुळाची कार्यक्षमता मंदावते व मुळ्या साधण्यास सुरुवात होते. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

जमिनीच्या सामुचा परिणाम सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण प्रक्रियेवर होत असला तरी हा परिणाम झाडावर दिसण्यासारखा नसतो. अश्या परीस्थितीत शेवग्याच्या उत्पादनात तीन ते पाच टक्के नकळत घट होते. हलक्या ते मधम पण उत्तम निचरा असलेल्या जमिनीत शेवग्याची लागवड यशस्वी होते. हलकी व निकस जमीन, खते व वरखते देऊन सहज सुधारता येते. पण कमी निचऱ्याच्या चिकण मातीत व चोपन जमिनी सुधारणे कठीण होते.

शेवग्याचे झाड मुळातच आम्लधर्मी असल्यामुळे जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ पर्यंत चालतो. जमिनीचा सामू ८.५ पर्यंत असल्यास अंतर मशागतीच्या पद्धतीत बदल करून जमिनीत चुन्याचे प्रमाण ८.५ ते ९.५ च्या आसपास असले तरी चालते. यापेक्षा म्हणजे ११.५% वाढल्यास अंतर मशागतीच्या पद्धतीत फेरबदल केल्यास शेवग्याची झाडे चांगली वाढतात व उत्पादन ही चांगले येते. परंतु अश्या जमिनीत सेंद्रिय किंवा असेन्द्रीय खते शिफारसीप्रमाणे आवश्यक असतात. काही जमिनीत पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण फारच चांगले असते. अश्या जमिनीत सुपीकताही चांगली असते. पण अश्या जमिनीत नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण ठराविक प्रमाणापेक्षा कमी असते तरी त्या प्रमाणात रासायनिक खते व शेणखते देऊन शेवग्याची बाग चांगली आणता येते.

हवामान

शेवग्याची लागवड भारतातील उष्ण व समशितोष्ण कटिबंधीय राज्यात होते पण थंड प्रदेशातील राज्यात होते. पण थंड प्रदेशातील राज्यात शेवग्याची लागवड होत नाही. पण महाराष्ट्रातील हवामान शेवगा लागवडीसाठी अनुकूल आहे. शेवग्याच्या अनुकुल लागवडीसाठी सम व दमात हवामान चांगले मानवते.

देशाच्या ज्या राज्यात पर्जन्यमान ५०० ते ९०० से.मी असल्यास अश्या ठिकाणी शेवग्याची लागवड यशस्वी ठरते. जास्त दिवस ढगाळ वातावरण शेवग्याच्या पिअकासाठी हानिकारक असते. शेवग्याच्या चांगल्या वाढी साठी व अधिक उत्पादनासाठी तापमान ३० ते ४० सेन्टीग्रेट दरम्यान असावे. शेवग्याचे पीक फुलोऱ्यात असते. पूस पडत असेल तर फुलाचा मोहोर गळून जातो त्याच प्रमाणे धुक्याचा शेवग्यावर अनिष्ट परिणाम होतो. असे असले तरी शेवग्याची लागवड आता वर्षभर होऊ लागली आहे. पावसाळ्यात शेवग्याची फुले गालात जरी असली तरी त्यामधून बाहेर पडलेल्या शेंगा गळत नाही. पावसाळ्याच्या काळात शेवग्याच्या शेंगाना चांगला बाजारभाव मिळतो.

शेवग्याची बाग सपाट जमिनीत चांगल्याप्रमाणे येते. चढ उताराच्या जमिनीत माती वाहून सखल भागात जमते. अश्या जमिनीत मोठ्याप्रमाणात सपाटीकरण शक्य नसते. त्यामुळे जास्त चढ उतार असलेल्या जमिनीत डोंगर माथ्या टेकडीच्या किवा जास्त चढ उतार असलेल्या व इतर पिकास फलपिकास अयोग्य जमिनीत लागवडीची शिफारस करण्यात अतिरेकी असली तरी अशा पिकाच्या मानाने व्यापारी दृष्ट्या अशी लागवड फायदेशीर ठरलेली आहे

लागवडीची वेळ

शेवगयाची लागवड वर्षभर तिन्ही हंगामामध्ये करता येते. ठराविक कालावधीत शेंगा बाजारात येण्यासाठी शेवग्याची लागवड आता वर्षभर करावी कारण रोपे निरोगी तजेलदार व एक समान उंचीची असतात. त्यामुळे सर्व झाडांवर एकाच वेळेस शेंगा येण्यास सुरुवात होते. तसेच बियांची लागवड सरळ शेतात केल्यास शेतातील वाळवी हुमणी यामुळे बियांची उगवण सक्षमता कमी होते. त्यामुळे शेंगाचे उत्पादन एकाच वेळेस सुरु होत नाही व सर्वच बाबतीत व सर्वच बाबतीत हेळसांड होते. त्यामुळे १ महिना वयाची तयार रोपे शेतात लावावीत.

शेवगा लागवड पद्धत

शेवगा लागवडीसाठी जमिनीच्या मगदूराप्रमाणे २५ ते ५० फुट अंतर ठेवावे. शेवग्याची लागवड बागायती कि कोरडवाहू, जमीनीचा प्रकार यानुसार लागवडीचे अंतर ठरवावे. सरासरी लागवडीचे अंतर ८ x ५ फुट निवडावे. प्रथम जमिनीची मशागत करून प्रत्येकी ८ फुटावर बेड बनवावे. त्यानंतर बेड वरील ढेकळेधसकटे काढून, बेडवर दांताळ मारून बेड थोडा सपाट करावा व त्यानंतर ठिबक नळी बेडवर टाकून पाणी सोडावे व प्रत्येकी ५ फुट अंतरावर रोपे लावून घ्या. त्याचप्रमाणे ठीबकची सोय नसल्यास प्रत्येकी ८ फुटावर पात किवा दंड सोडावे व रोपाची लागण प्रत्येकी ५ फुटावर करावी.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.