राज्यातील 26 जिल्ह्यात दुष्काळ जाहिर

0

112 तालुक्यात परिस्थिती गंभीर दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार जिल्ह्यातीलन दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या या 180 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सत्यापन करण्यात आले असून सत्यापनातील निष्कर्षाच्या आधारे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे गंभीर/ मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करीत आहे.
दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2018 पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशास जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी द्यावी. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी ताततडीने आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्यात. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20181031722349219 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

जिल्हा निहाय दुष्काळग्रस्त तालुके

पुणे: आंबेगाव, पुरंदर सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुरु- घोडनंदी.

सांगली: जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव.

सातारा: माण-दहीवडी, कोरेगाव, फलटण.

सोलापूर: करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्‍कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर.

पालघर: पालघर, तलासरी, विक्रमगड.

धुळे: धुळे, सिंदखेडे, शिरपूर.

जळगाव: अंमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्‍ताईनगर, पोचोरा, पारोळा, रावेर, यावल.

नंदुरबार: नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदे.

नाशिक: बागलान, मालेगाव, नांदगाव, सिन्‍नर, देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड.

अहमदनगर: कर्जत, अहमतनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.

औरंगाबाद: औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्‍लोड, सोयगाव, वैजापूर, कन्‍नड.

बीड: आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवाणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा.

जालना: अंबड, बदनापूर, घनसावंगी, जाफ्राबाद, जालनार, परतूर.

नांदेड: मुखेड, देगलूर, उमरी.

उस्मानाबाद: लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.

परभणी: मनवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.

हिंगोली: हिंगोली, सेनगाव, कळमनुरी.

लातूर: शिरुर अनंतपाळ.

अकोला: बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला.

अमरावती: मोर्शी, अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी.

बुलडाणा: खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा.

वाशिक: रिसोड.

यवतमाळ: बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव.

चंद्रपूर: चिमूर, ब्रह्मपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही.

नागपूर: काटोल, कळमेश्‍वर, नरखेड.

वर्धा: आष्टी, कारंजा.

एकूण: 26 जिल्हे गंभीर दुष्काळाचे तालुके 112, मध्यम दुष्काळाचे तालुके 39

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर

जाऊन फॉर्म भरा.https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.