• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 24, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

ड्रोन – मानवविरहित आकाशात उडणारे वाहन आणि शेतीतील त्याचा उपयोग

Girish Khadke by Girish Khadke
October 4, 2019
in शेती
0
ड्रोन – मानवविरहित आकाशात उडणारे वाहन आणि शेतीतील त्याचा उपयोग
Share on FacebookShare on WhatsApp

आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, टि.व्ही इ. इलेक्ट्रोनिक साधनांमुळे व्यक्तीच्या विचार, राहणीमान आणि कार्य करण्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत आहे. आजकाल सर्वच क्षेत्रात या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढत आहे. दैनंदिन सर्वच कामे मोबाईल, कॉम्प्युटरद्वारेऑनलाईन पद्धतीने होत आहेत. यासाधनांचा वापर करून मनुष्य जास्तीत जास्त माहितीचा संग्रह करीत आहे आणि त्याचा उपयोग स्वतःच्या आणि देशाच्या विकासासाठी करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मनुष्य कधीच मागे राहत नाही,त्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हटलं तर वावगे ठरणार नाही. इलेक्ट्रोनिक साधनांच्या वाढत्या मागणीमुळे नवनवीन कंपन्या बाजारात येत आहेत आणि आपापले उत्पादन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून देत आहेत. सध्या शेतीत देखील या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मोबाईल, कॉम्प्युटर या तंत्रज्ञानाबरोबरचड्रोन तंत्रज्ञानाचा शेती आणि शेती संबंधित क्षेत्रामध्येतसेच सरकारी कामामध्ये वापरहोतांना दिसत आहे. हवामान बदलासारखी आव्हाने पेलण्यासाठीअशा तंत्रज्ञानाने शेतीला सक्षमकरणे देखील गरजेचे बनले आहे. आपण बघतोय कि, शेती क्षेत्र हे पहिल्यापासूनच अश्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात अग्रेसर राहिले आहे.तर काय आहे हे ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याचा शेतीत कसा उपयोग होऊ शकतो असा प्रश्न अनेकाला पडला असेल. ड्रोन हे एक मानवविरहीत आकाशात उडणारे वाहन असून सदर लेखामध्ये ड्रोन संकल्पना व त्याबद्दलची माहिती तसेच शेती व संबंधित क्षेत्रामध्ये त्याचा होणारा उपयोग, फायदे व त्याच्या वापरावरील मर्यादा याच्यावरती सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

ड्रोन तंत्रज्ञान

साधारणतः दोन – तीन वर्षापूर्वीआकशात एखाद्या पक्षाप्रमाणे उडणारे छोटेसे पंख असलेलेमानवविरहीत वाहन म्हणजेच ड्रोन ( DRONE – Daynamic Remotely Operated Navigation Equipment ) किंवाUAV ( Unmanned Aerial Vehicle) पाहिल्यानंतरसर्वांनाच आश्चर्य वाटायचे. अगदी सुरुवातीच्या काळात ड्रोन किंवा मानवविरहीत आकाशातील वाहन हे फक्त मिलिटरीमध्ये सैनिकी कारवायांसाठीवापरले जात असे.

सुरुवातीलाड्रोनचा उपयोग अमेरिकेत लढाईदरम्यान शत्रू शोधण्यासाठी केला गेला. त्यानंतर या तंत्रज्ञानाचा उपयोग निरनिराळ्याक्षेत्रामध्ये वाढायला लागला. अग्निशामक दल, पोलीस दल अश्या बऱ्याच ठिकाणी ड्रोनचा उपयोग पाहणी करण्यासाठी होतांना दिसत आहे. पाहणी करण्यासाठी किंवा लग्नाची शुटींग करण्यासाठी ड्रोनवर कॅमेरा बसवला जातो. त्याचप्रमाणे आपत्ती क्षेत्रात आणि दुर्गम भागात एखादी तत्पर सेवा पोहोचवायची असेल तर ड्रोनचा वापर होताना दिसत आहे. आज ड्रोन वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. याचे नियंत्रण रिमोट वापरून किंवा सॉफ्टवेयरद्वारे केले जाते. संगणक प्रोग्राम वापरून नियंत्रित केलेल्या ड्रोनला स्वनियंत्रित ड्रोन म्हणतात. याची काम करण्याची पद्धत हि भौगोलिक स्थिती निर्धारण प्रणाली जी.पी.एस म्हणजेच GPS ( Geological Positioning System ) प्रणालीवर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या जी.पी.एस मुळे आपल्या मोबाईलच स्थान आपल्याला कळते याच तत्वावर ड्रोन देखील काम करते. ड्रोनला पॉवर देण्यासाठी त्यावर एक बॅटरी बसविली जाते.बॅटरीच्या क्षमतेवर ड्रोनच्या उडण्याचा कालावधी ठरतो.

आपली गरज ओळखून ड्रोनची निवड करणे महत्वाचे असते.सूक्ष्म, छोटे, मध्यम आणि मोठे अशा आकारात याचे विभाजन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या वजनावर, वजन वाहून नेण्याच्या व उंच उडण्याच्या क्षमतेवर आणि उडत राहण्याच्या कालावधीवर देखील त्यांचे विभाजन केले आहे. त्याचप्रमाणे स्थिर पंखे, फिरणारे पंखे आणि मिश्र असे ड्रोन उपलब्ध आहेत. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे फिरणारे पंखे हे ४, ६ किंवा ८ असू शकतात. त्यावर ड्रोनची उडण्याची,वजन उचलण्याची आणि वजन वाहून नेण्याची क्षमता ठरते. शेतीवरील संशोधनासाठी सध्या फिरते पंखे असलेल्याड्रोनचा उपयोग होतांना दिसत आहे. ड्रोन हे एक साधन असून त्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी करून घेण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे कॅमेरे तसेच सेन्सर बसविले जातात व त्याद्वारे माहिती संग्रहित केली जाते.

ड्रोनचे विशिष्ट उपयोग

आजकाल डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अचूक माहितीची आवश्यकता असते. कृषी विभाग, कृषी संबंधित व्यवसाय, बँका, पिक विमा कंपनी यांना शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाची आकडेवारी हवी असते.श्तीमध्ये नुकसान किती झाले? का झाले ? याची माहिती हवी असते. जेणेकरून ह्या माहितीचा उपयोग करून कृषी संबंधित संस्था आणि नाय व्यवसाय आपल्या पुढील धोरणांची आखणी करू शकतात. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून हि माहिती अचूकपणे मिळवता येऊ शकते. तसेच शेताच्या कुठल्या भागात नुकसान होऊ शकते ? कुठे जास्त लक्ष देण्याची गरज आहे ? याबद्दलची माहिती सुद्धा मिळवता येते. पिक विमा कंपनी पिकाची योग्य आणि अचूक पाहणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचा योग्य मोबदला हि देऊ शकते. सरकारला कुठली योजना राबवायची असेल तर अचूक माहितीची आवश्यकता असते. त्या माहितीच्या आधारे योजना कशी, कुठे आणि कधी राबवायची हे सरकार ठरवू शकते. ज्या भागाची माहिती मिळवायची आहे त्या भागावरून ड्रोन उडविला जातो. ड्रोनला दिशा देऊन कोणत्या क्षेत्राचे फोटो घ्यायचे याचे निर्देश दिले जातात. ड्रोनवर बसविलेला कॅमेराफोटो घेतो आणि ते साठवितो किंवा ते पुढे संगणकीय प्रक्रियेसाठी पाठवितो. संगणकीय प्रक्रियेतून आपल्याला इच्छित माहिती मिळविता येते. मान्सूनच्या पावसानंतर किती वेळेत, किती क्षेत्रावर पेरणी झाली आहे, किती क्षेत्र बाकी आहे, तसेचखरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवडी खालील क्षेत्र किती व कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे इ. माहिती सरकारला सुलभ पद्धतीने मिळवता येऊ शकते. या माहितीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.त्याचप्रमाणे ड्रोनचा उपयोग करून मोठे शेतकरी आपल्या पेरणी झालेल्या क्षेत्राचा फोटो घेऊन कुठे पिक चांगले उगवलेले आहे, कुठे दुबार पेरणीची गरज आहे, याची माहिती कमी वेळेत मिळवू शकतात. नियमित पाहणीमध्ये पिकावर कुठल्या रोगाचा वा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा किती क्षेत्र रोगग्रस्त आहे हे समजू शकते. यावर अजून संशोधन चालू आहे. या माहितीवरून पिकाच्या सुरक्षेसाठी योग्य ते निर्णय योग्य त्या वेळी घेतले जाऊ शकतात. समजा एखाद्या गावात रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आजूबाजूच्या गावांना त्यबद्दल माहिती देऊन योग्य ती काळजी तसेच उपाययोजना करण्याचे आदेश दिल्या जाऊ शकतात. एखाद्या क्षेत्राची पिक लावणी ते पिक काढणीपर्यंतच्या संग्रहित माहितीच्या आधारे यंदा किती उत्पादन अपेक्षित आहे याचा देखील अंदाज ड्रोनपासून मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे घेता येऊ शकतो. बहरील देशात ज्या ठिकाणी मनुष्य व मशीन पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनच्या सहय्याने बीजरोपण सुद्धा केले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागांचे आणि शहरांचे अचूक नकाशे तयार करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे ठरविले आहे. यानकाशामुळे सरकारला सार्वजनिक, सरकारी व खासगी जागा याबद्दल अचूक माहिती मिळेल आणि महसूल गोळा करण्यास मदत होईल. पूर्वी हे काम मनुष्यबळ लावून केले जात असे त्यामुळे खूप वेळ आणि पैसा लागत असे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्राची पाहणी

भूकंप, अतिवृष्टी तसेच पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे गावची गावे उध्वस्त होतात, झाडे पडतात, रस्ते बंद होतात. त्यामुळेआपत्तीग्रस्त भागाची पाहणी व मदत पोहोचविणेअवघड होते. अशा वेळी ड्रोनचा उपयोग करून अशा क्षेत्राची माहिती कमी वेळेत मिळविली जाऊ शकते आणि लवकरातलवकर मदत पोहचवली जाऊ शकते. पूरग्रस्त क्षेत्रात

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com  असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Drones - Unmanned aerial vehicles and their use in agricultureड्रोन – मानवविरहित आकाशात उडणारे वाहन आणि शेतीतील त्याचा उपयोग
Girish Khadke

Girish Khadke

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In