कापूस पिकासाठी ठिबक सिंचन

1

ठिबक सिंचन पद्धतीतून कापसाच्या पिकला गरजे एवढे पाणी दररोज किंवा एक दिवसा आड दिल्याने पावसाळी हंगामात उघडीपीच्या काळात पिकावर होणारे दुष्परिणाम दिसून येत नाहीत, त्याच प्रमाणे खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शिफारस केलेली खते जास्तीत जास्त हप्त्यात सिंचना मधून विद्राव्य स्वरुपात देता येतात.

सर्वसाधारणपणे कापसाचे पीक जमीनीत घेतले जाते; परंतु ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरामुळे हे पिक मध्यम ते हलक्या जमिनीतही घेता येते. हलक्या जमिनीची पाणी धारण क्षमता कमी असते, या जमिनीत पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी लवकर झिरपते व जमान कोरडी पडते. जर अशा जमिनीत अन्नद्रव्यांचा संतुलीत पुरवठा केला व ठिबक सिंचनाने जमीन सतत ओलसर ठेवली, तर अशा हलक्या जमिनीतही खरीप हंगामात कापसाचे पिक चांगले उत्पादन देऊ शकते. ठिबक सिंचन संचावर होणाऱ्या एकूण खरचापैकी उपनळ्या व तोटयावर  होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. कापसाच्या प्रचलित लागवड पद्धतीत प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी एक तोटी वापरण्याएवजी कापसाची लागवड जोडओलळ दोन ओळीसाठी माधोमद एक उपनळी आणि जोडओळीतील सामोरासोमोरच्या दोन झाडांसाठी एक तोटी वापरल्यास उपनळया व तोट्यावरील खर्चात जवळपास ५० टक्के बचत होते.

 

कापसासाठी ठिबक सिंचनाद्वारे दररोजची पाण्याची गरज

महिना पीक गुणांक दिवसाचे बाष्पीभवन (मि.मी.) प्रत्येक झाडाची गरज (लिटर) हेक्टर पाण्याची गरज (लि. /दिवसात )
जून ०.७५ ८.१६ २.३० २८,४००
जुलै ०.८० ५.९२ १.८० २२,२००
ऑगस्ट १.०५ ४.७१ १.९० ३३,४५०
सप्टेंबर १.२५ ४.८५ २.३० २८,४००
ऑक्टोबर ०.८० ५.३५ १.६२ २०,०००

ठिबक पध्दतीत कापसाची पाण्याची गरज

प्रचलित पद्धतीने पिकास पाणी दिल्यास कापसाची खरिफ पाण्याची एकूण गरज ८० ते ९० सें. मी. एवढी असते ; मात्र जोडओळ पद्धतीत लागवड केलेल्या कापूस पिकास ठिबक सिंचनातून  पाणी दिल्यास जवळपास ४४ ते ४५ सें. मी. एवढीच पाण्याची गरज लागते. याचाच अर्थ असा, की कापसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते. राहुरी परिसरासाठी ठिबक सिंचन पद्धतीत कापसाची दररोजची पाण्याची गरज खालील प्रमाणे असून, राज्यातील इतर ठिकाणच्या सरसरीत बाष्पीभवनानुसार त्यात कमी जास्त बदल होऊ देणे शक्य होत नाही, तेव्हा एक दिवसाआड पिकास पाणी द्यावे.

ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर :

ठिबक सिंचनातून  देता येण्यासारखी; वेगवगळ्या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश असलेली विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत. बागायती कापसासाठी शिफारस केलेली नेत्र १०० किलो : स्फुरद ५० किलो : पालाश ५० किलो प्रती हेक्टर मात्रा एकूण  साथ हप्त्यांत खालीलप्रमाणे विभागून द्यावी. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी, त्यामुळे खर्चात बचत होते

 

पहिला हप्ता  ५% ( ०५ : २.५ : २.५ ) पेरणीच्यावेळी
दुसरा  हप्ता  ५% ( ०५ : २.५ : २.५ ) पेरणीनंतर १० दिवसांनी
तिसरा हप्ता १५% ( १५ : ७.५ : ७.५ ) पेरणीनंतर २० दिवसांनी
चौथा  हप्ता १५% ( १५ : ७.५ : ७.५ ) पेरणीनंतर ३० दिवसांनी
पाचवा हप्ता २०% ( २० : १० : १० ) पेरणीनंतर ४० दिवसांनी
सहावा हप्ता २०% ( २० : १० : १० ) पेरणीनंतर ५० दिवसांनी
सातवा हप्ता  २०% ( २० : १० : १० ) पेरणीनंतर ६० दिवसांनी

खतांचे योग्य प्रमाणात व्यवस्थापन

नात्र : स्फुरद : पालास

https://krushisamrat.com/dry-drip-irrigation-is-as-much-as-the-requirement-of-the-crop-when-it-is-needed-to-provide-controlled-water/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] कापूस पिकासाठी ठिबक सिंचन […]

Leave A Reply

Your email address will not be published.