विभाग – मत्स्यव्यवसाय
१ ) योजनेचे नांव – मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना : –
१ ) योजनेचा उद्देश : – मत्स्यबीज उत्पादन केंद्रासाठी आवश्यक सर्व बाबींचा विचार होवून अशा निवडलेल्या जागेत मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात येवून या ठिकाणी मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी मत्स्यबीजाची पैदास करण्यात येवून मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व इतर खाजगी मत्स्यकास्करांना मत्स्यबीज पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत या केंद्राची दुरुस्ती व इतर संबंधीत कामांसाठी निधीची मागणी करण्यात येते.
२ ) योजनेचे निकष : – मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या उभारणीस सर्व बाबींनी परिपूर्ण असलेली जागा निवडून अशा ठिकाणी मत्स्यबीज केंद्र बांधण्यात येते .
२ ) योजनेचे नांव :- अवरुद्ध पाण्यात मत्स्यसंवर्धन :
१) योजनेचा उद्देश : – मत्स्यसंवर्धनास योग्य असलेल्या जलक्षेत्रात मत्स्यशेती करुन गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढविणे हा या योजनेचा हेतू आहे. दरवर्षी मत्स्यव्यवसाय विभागाकडून जलद वाढणाच्या जातीचे स्थानिकरित्या निर्माण केलेले मत्स्यबीज संवर्धकांना पुरवून तलाव / जलाशयामध्ये मत्स्यशेती करण्यास प्रोत्साहन देण्यात येते. पाटबंधारे विभागातील नवीन तलावात पहिली दोन वर्ष १०० %, तिसरे वर्ष ७५ % व चौथ्यावर्षी ५० % व पाचव्या वर्षी २५ % इष्टतम मत्स्यबीज संचयन खात्यामार्फत करण्यात येते. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाटबंधारे तलाव वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने सदर योजना आदिवासी भागात राबविण्यात येत नाही.
२) योजनेचे निकष : – नव्याने पंजीबद्ध झालेल्या मच्छिमार सहकारी संस्थाकडे ठेक्याने असलेल्या पाटबंधारे विभागाच्या नवीन तलावात सदर योजना राबविण्यात येते.
३) पात्र लाभार्थी : – नवीन पंजीकृत मच्छिमार सहकारी संस्था
३) योजनेचे नांव : – मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य
योजनेचा उद्देश : – मत्स्यव्यवसायासाठी लागणारी जाळी तयार करण्यासाठी बरेच मच्छिमार नायलोन सुत मोनाफिलॅमेट व शेवसुत वापरतात. या साधनांच्या किंमतीत बरीच वाढ होत असल्याने मासेमारी ती आवश्यक असूनही त्यांचा वापर करणे मच्छिमारांना ही साधने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या विभागाकडून ही योजना राबविली जात नाही . नायलॉन सुत मोनोफिलॅमेंट धागा, सुताची जाळी शिखर संघ किंवा जिल्हा संघामार्फत पूरविले जात. प्रतिवर्षी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांना जास्तीत जास्त ५ किलो सुत अनुदानीत दराने ( किंमतीच्या ५० % ) पुरविले जात. अल्प उत्पन्न गटातील मच्छीमारांना बिगर यांत्रिकी नौकासाठी नौकेच्या किंमतीच्या ५० % जास्तीत जास्त रु . मत्स्यव्यवसाय ३००० / – अर्थसहाय्य देण्यात येते.
२) योजनेचे निकष :- मच्छिमार सहकारी संस्थेचे सभासदांना याचा लाभ दिला जातो.
३) पात्र लाभार्थी : – मच्छिमार सहकारी संस्थेचे सभासद .
४) योजनेचे नांव : – मच्छिमार सहकारी संस्थांचा विकास
१) योजनेचा उद्देश : – मच्छिमार सहकारी संस्थेच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची आर्थिक बळकटी आणणे आवश्यक आहे. म्हणून या योजनेत मच्छिमार सहकारी संस्थांना व्यवस्थापकीय अनुदान अंशदान पहिले पाच वर्ष देण्यात येते. नवीन प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्थांना एकूण रुपये २००० / – अनुदान पाच वर्षांसाठी उतरत्याक्रमाने दिले जात व मच्छिमार सहकारी संस्थांना स्वत:च्या भागभांडवलाच्या तिप्पट इतके येते. परंतु जास्तीत जास्त रु . १०००० / – इतके भागभांडवल दिले जाते .
योजनेचे निकष : – नव्याने पंजीबद्ध झालेल्या मच्छिमार सहकारी संस्थांना सदर व्यवस्थापकीय अनुदान व भागभांडवल दिले जाते .
पात्र लाभार्थी : – नवीन पंजीकृत मच्छिमार सहकारी संस्था
५) योजनेचा नाव – मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा :
योजनेचा उद्देश : – मत्स्यसंवर्धनास उत्सुक असलेल्या शेतक-यांना त्याच्या शेत जमिनीत पाणी टिकवून धरणाच्या व बारमाही पाण्याची सोय असलेल्या जमिनीत तळी बांधकाम करुन मत्यव्यवसायास प्रोत्साहन देणे. निवडक १० हेक्टरच्या आतील तलाव मत्स्यसंवर्धनाखाली आणणे व त्या नजीकच्या मच्छिमारांना प्रशिक्षण देवून मत्स्यकास्तकार तयार करणे व मत्स्यसंवर्धनासाठी लागणाच्या सर्व बाबींवर अर्थसहाय्य देणे व अपेक्षित मत्स्योत्पादनाची पातळी गाठणेसाठी प्रति हेक्टरी मासळीचे उत्पादन वाढविणे इत्यादीसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सदरहू योजना केंद्र पुरस्कृत असून तलाव खोदकामासाठी प्रति हेक्टरी खर्चाच्या २० % परंतू जास्तीत जास्त रु . ४०, ००० / मर्यादेपर्यत व अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी २५ % परंतू जास्तीत जास्त प्रति हेक्टरी ५०, ००० / – मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते . यंत्रणेअंतर्गत निवडलेल्या १० हेक्टरच्या आतील तलावात खत खाद्यावर खर्चाचे २० % परंतु जास्तीत जास्त रु १०, ००० / – प्रति हेक्टरी व अनुसूचित जाती / जमातीसाठी २५ % परंतु रु. १२, ५०० / – मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी अनुदान दिले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क : सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, ६१ स्नेह नगर, खंडल वि. प्र. भवन समोर , धुळे . दूरध्वनी क्र. ( ०२५६२ ) २३४७२२
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!