• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 28, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

गहू या पिकावर पडणारे रोग, कमतरता आणि त्यांचे व्यवस्थापन (भाग 1)

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
October 19, 2018
in शेती
0
गहू या पिकावर पडणारे रोग, कमतरता आणि त्यांचे व्यवस्थापन  (भाग 1)
Share on FacebookShare on WhatsApp

१.लोह कमतरता-

या प्रदेशांत टोकाचे हवामान असते तिथे लोहखनिज कमतरता ही गंभीर समस्या असते. अतिउष्ण तापमानात असणारी जमीन, पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणारी जमीन, खूप थंडी किंवा खूप पर्जन्यवृष्टी खाली असणारी जमीन अशा प्रदेशांत लोह कमी असते. गहू या पिकावर लोह कमतरतेचा तेवढा परिणाम होत नाही. या कमतरतेला गहू पीक तेवढे संवेदनशील नाही. चुनखडी आणि अल्कधर्मी जमिनीत लोह कमतरता लगेच दिसून येते. प्रकाशसंश्लेषण क्रिया आणि डाळी पिकांच्या मुळांमध्ये गाठींच्या विकासासाठी लोहखनिज अत्यावश्यक समजले जाते. लोह या पोषणतत्त्वाचा संबंध नत्राशी येतो. कारण लोह समस्येमुळे मुळांची वाढ नीट झाली नाही की नत्र पुढील कार्य करू शकत नाही आणि परिणामी उत्पादन घसरते. लोह कमी असले की पिकांद्वारे जमिनीतून कॅल्शिअम कार्बोनेट जास्ते शोषले जाते. शिरांद्वारे ज्याठिकाणी अन्नरसाचा पुरवठा होतो, तो भाग पिवळा पडतो. शिरांचा रंग मात्र हिरवाच राहतो. लोहखनिजाची कमतरता पहिल्यांदा नव्या पानांवर दिसते. याकडे लक्ष दिले नाही तर पुढे पान पांढरट पिवळे व्हायला लागते. पानांच्या टोकावर काळपट तपकिरी ठिपके दिसू लागतात. रंग इतका स्पष्ट असतो की फरक चटकन लक्षात येतो. हरितद्रव्य कमी होते आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. उत्पादन घटते.

कमतरतेवर उपाय-

खतांच्या वापरात बदल करून आपण लोह वाढवू शकता. लहान शेतकरी शेवाळीच्या रसाने बनवलेली खते वापरू शकतात. शेणखत आणि कंपोस्ट वापरल्याने लोहची कमतरता भरून निघते. गहू रोपांच्या आजूबाजूला डॅडेलिअन प्रकारची झाडे लावावीत. ते रोपांना लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देतात. नायट्रिक ऑक्साईडच्या वापरल्याने पानांचा पिवळेपणा कमी होतो व रोपाची सुदृढपणे वाढ होते. लोह कमतरतेला प्रतिबंधात्मक उपाय अतिशय सोपे आहेत. लोह समस्येला संवेदनशील नसलेल्या वाणांची निवड करावी. लोह घटक असणारी खते जमिनीला द्यावीत. चुनखडी आणि अल्कधर्मी जमीन गहू लागवडीसाठी टाळा. पाण्याचा  निचरा होत नसल्यास अशी जमीन गहू पिकासाठी फायदेशीर नसते. तसेच पाणी जास्त देवूही नये.

२. मॅग्नेशिअम कमतरता-

हलक्या प्रतीची आम्लधर्मी आणि वालुकामय जमीन यामध्ये पोषणतत्त्वे कमी असतात. तसेच वाळूमुळे पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असणारी जमीन ही मॅग्नेशिअम घटकाची कमतरता दर्शवते. पालाश आणि अमोनिअम ही खनिजद्रव्ये मॅग्नेशिअमची स्पर्धक आहेत. त्यांचा अतिवापर केलेला असल्यास किंवा त्या जमिनीत या दोन घटकांचा समावेश जास्त झालेला असेल तर मॅग्नेशिअमची कमतरता जास्त जाणवते. मॅग्नेशिअम हे पिकांच्या अंतर्गत भागात साखर वाहून नेण्याचे काम करते. हरितद्रव्य विकासात साखरेची भूमिका महत्त्वाची असते. मॅग्नेशिअम कमतरता असल्यास नव्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार न होता, जुन्या पानांमधील हरितद्रव्य नव्या पानांकडे पाठवले जाते. त्यामुळे शिरांमधून अन्नद्रव्य ज्या भागात पोहचते, तिथे पिवळसर रंग येतो. अशावेळी प्रकाशाची तीव्रता जास्त असेल तर कमतरता आणखी गंभीर होते. मॅग्नेशिअम कमतरतेची लक्षणे मात्र जुन्या पानांपासून दिसतात. अन्नद्रव्य प्रसारित होणाऱ्या भागावर काळपट हिरवे ठिपके दिसू लागतात. सौम्य कमतरता असली तर पानांवरील ठिपके वाढत जावून हिरवा भाग पिवळसर होतो. नंतर पाने लाल होतात आणि आकार खराब होतो. त्यानंतर रोपाची पाने गळतात. मुळांची वाढ जोमदार नसल्याने रोप कोमेजते.

कमतरतेवर उपाय-

शेवाळयुक्त चुनखडी, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम कार्बोनेट जास्त असणारे डोलोमाइट वापरल्याने मॅग्नेशिअमची कमतरता भरून निघू शकते. जमिनीतील पोषणतत्त्वांचे संतुलन टिकून राहावे यासाठी शेणखत, आच्छादन वापरावे. फवारणी करतांना किंवा जमिनीतून खते देतांना मॅग्नेशिअमयुक्त खत वापरावे. मॅग्नेशिअम ऑक्साईड हळूहळू पोषणतत्त्वे सोडते. याव्यतिरिक्त, जमीन सुपीक करण्यासाठी योग्य उपाय योजावेत. जमीन पाण्याचा नीट निचरा करू शकत नसेल तर जास्त पाणी देणे टाळा. पालाश अंतर्भूत असणारी खते देणे टाळा. पालापाचोळ्याने जमीन झाकून टाकल्यास बाष्पीभवन होणार नाही आणि ओलावा टिकून राहील.

३. कीटकनाशकांचा चुकीचा वापर-

पिकांची वाढ होत असतांना रासायनिक संयुगांच्या अतिवापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे विषारी परिणाम होतो. बुरशीनाशके, कीटकनाशके, जंतूनाशके व अतिक्षारता यामुळेही नुकसान होऊ शकते. याला इंग्रजीमध्ये फायटोटॉक्सिसिटी असं म्हणतात. प्रतिकूल हवामान असतांना कीटकनाशके फवारल्याने पिकांचे असे नुकसान होते. उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता असे हवामान असतांना कीटकनाशके फवारल्याने गव्हाला इजा होण्याची शक्यता वाढते. थंड हवेत बुरशीनाशके वापरल्यामुळे सुद्धा वाईट परिणाम होतो. दुष्काळ पडला असेल तर कीटकनाशके आणि बुरशीनाशके यामुळे झाडांना रासायनिक दुखापत होण्याला अनुकूल परिस्थिती असते. इतकेच काय, दमट आणि ढगाळ हवामान असेल तर हवा कोरडी नसल्यामुळे प्रतिकारक वाणही अतिसंवेदनशील बनतात. ही सर्व पीकसंरक्षक रसायने चुकीची वापरल्याने किंवा अति वापरल्याने पानांवर डाग, काळपट पुळ्या, शेंडे करपणे अशी अनेक लक्षणे दिसतात. अनेक कीटकनाशके, बुरशीनाशके एकाचवेळी वापरली तरी रासायनिक क्रिया होऊन गव्हाच्या रोपांना विषबाधा होऊ शकते.

विषबाधेवर उपाय-

अशा चुकीच्या ववापराने रोपाला नुकसान झालेले असल्यास त्याचा रोगसंक्रमित भाग कापून ते परत पेरलेले कधीही उत्तम असते. पुढच्या वेळी काळजी घेणे हा त्याच्यावरचा सर्वांत चांगला उपाय आहे. या रोगाचा सर्वांत मोठा तोटा हा आहे की कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांच्यामुळे रोपे जळण्यावर दुसरा कोणताही प्रतिबंधक रासायनिक उपचार अस्तित्वात नाही. म्हणून ही रसायने काळजीपूर्वक आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे वापरावीत. रोपांची संवेदनशीलता आणि रसायने मिसळण्याचे प्रमाण त्यात दिलेल्या माहितनुसार निश्चित करा. त्यात शेतकऱ्यांनी सावध असावे.

४. गहू पिकावरील भुरी-

ब्लुमेरिया ग्रामिनीस या बुरशीमुळे गव्हाच्या रोपाला हा रोग होतो. ही बुरशी रोपांवरच जगते. हंगाम नसेल तर झाडांच्या अवशेषावर त्या सुप्तावस्थेत राहतात. हवामान अनुकूल असले की त्यांची वाढ होते आणि वाऱ्याबरोबर उडत जावून बुरशी निरोगी झाडांवर आश्रय घेते. यजमान झाडांच्या पानामधून ती पोषणतत्त्वे घेते. म्हणून तिची सारखी वाढ होत राहते. ९५% आर्द्रता आणि ढगाळ हवामान याच्या वाढीसाठी पोषक असते. २५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान झाले तर ही बुरशी मात्र नष्ट होते. सर्व पानांवर याची लक्षणे स्पष्ट दिसतात. रोपाचे सर्व अवयव म्हणजे पान, देठ आणि कणस यांच्यावर आधी पिवळे बिंदू दिसतात आणि मग त्यांचे रुपांतर पांढऱ्या मऊ डागात होते. उघड्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत. त्यासाठी भिंग वापरावे लागते. रोपाची खालची पाने जुनी असतात. त्यांच्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे असे दिसून येते. उच्च आर्द्रतेमुळे हे सर्व शक्य होते. दाटीवाटीची लागवड, नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर, एकाच पिकाची फार काळ लागवड या सर्व गोष्टींमुळे बुरशीला फायदेशीर परिस्थिती निर्माण होते.

भुरी बुरशीचे नियंत्रण-

छोटे शेतकरी आणि बागायतदार हे भुरी बुरशीसाठी दूध हे चांगले औषध मानतात. गव्हाच्या ज्या संवेदनशील झाडांवर प्राथमिक लक्षणे दिसत असतील, त्याच्यावर खबरदारी म्हणून दूध पाण्यात १:१० या प्रमाणात मिसळावे. दर आठवड्याला हा उपचार केल्यास बुरशी पूर्णपणे नियंत्रित होते. भुरी बुरशीच नव्हे तर इतर कोणत्याही बुरशीपासून गव्हाच्या रोपाचे संरक्षण करायचे असेल तर डिफेनोकोनोझोल, फ्ल्युट्रीफोल, ट्रिटिकोनाझोल आणि ट्रायाडिमेनॉल वापरल्यास बुरशीचा नायनाट होतो. बेनोमिल, फेनप्रोपिडीन, फेरानोमिल यासारख्या बुरशीनाशकांमुळे या बुरशीचे गुणकारी रासायनिक नियंत्रण होते. सिलिकॉन आणि कॅल्शिअम सिलिकेट यांचे मिश्रण असणारे द्रव्य वापरले तर रोपाची बुरशीविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते. याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक चांगल्या दर्जाचे प्रतिकारक वाण वापरल्यास रोगाचा संभाव्य धोका टळतो. रोपांमध्ये योग्य अंतर ठेवले तर जमीन वातानुकुलित राहते. नत्राचे प्रमाण जास्त असू नये. पिकाची फेरपालट करावी. तण जास्त वाढू देवून नये. झाडाची प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर वर दिलेली रसायने काळजीपूर्वक फवारावीत.

 

CreditBy: Bhagwat Patil
Raver, Jalgaon.

 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Tags: deficiencies and their management of wheat cropDiseasesकमतरता आणि त्यांचे व्यवस्थापनगहू या पिकावर पडणारे रोग
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In