रेशीम किटकांवर येणारे रोग व त्यांचे नियंत्रण ( भाग – १)
बहुतांश शेतकरी बांधव शेतीस एक पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग करतात. हा उद्योग चांगली आर्थिक उन्नती साधू शकतो. परंतु, हा उद्योग करतांना खूप साऱ्या श्रमाची आणि काळजीची गरज आहे. ह्या उद्योगात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे रेशीम किटकांवर येणारे विविध रोग आणि त्यांचे नियंत्रण. हे नियंत्रण वेळीच नाही केले तर चांगलेच आर्थिक नुकसान होऊ शकते. तर चला माहिती घेवूयात रेशीम किटकांवर येणारे रोग व त्यांच्या नियंत्रणाविषयी……
हि माहिती आपणwww.krushisamrat.com वर वाचत आहात.
सुमारे चार हजार वर्षांपासून रेशीम कोष निर्मितीसाठी मानव रेशीम कीटक संगोपन करीत आहे. रेशीम कीटकांना आपण पाळीव बनवलं असून पिढ्या न पिढ्या रोगकारक जीवाणू , विषाणू इ. चालत आल्यामुळे रेशीम कीटकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. रेशीम कीटक सहजासहजी रोगास बळी पडतात. महाराष्ट्रासारख्या अपारंपरिक राज्यात कच्चे कीटकसंगोपनगृह असल्यामुळेआणि स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे सातत्य टिकवता येत नसल्यामुळे, तसेच शेतकरी नियोजना शिवाय वर्षभर एकापाठोपाठ एकरेशीम कोषाची पिके घेत असल्यामुळे रेशीम किटकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. ( उदा: उझी माशीचा प्रादुर्भाव ) आजपर्यंत जगात कीड व रोगास प्रतिकारक्षम रेशीम कीटकाच्या जातीचा शोध लागलेला नाही. रोग आल्यानंतर रेशीम कीटकांच्या मृत्यूमुळे नुकसान अटळ आहे. त्यामुळे रोग येऊ नये यासाठी केलेला उपाय हाच रामबाण उपाय होय.
रेशीमकीटकास एकपेशीय( protozoa), विषाणू( Virus), जीवाणू( Bacteria) आणि बुरशी ( Fungus) पासून अनुक्रमे पेब्रिन, ग्रासरी, फलॅचरी, मस्करर्डीन इ. रोग होतात.
१)पेब्रिन :-
रोगकारक:- नोसीना बॉम्बीस
रोगप्रसार:-
अ)रेशीम किटकांच्या तोंडात खाद्य जाण्यापूर्वी प्रादुर्भावग्रस्त तुती पानांतून प्रसार होतो.
ब) अंड्यांतून रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे प्रादुर्भावग्रस्त मादी – रेशीम कीटक ते अंडी गर्भ असा प्रसार होतो.
क) प्रादुर्भावग्रस्त अंडी फुटण्याच्या वेळी संपर्कातून रोग प्रसार होतो.
पेब्रिन रोग बीज ( स्पोर)
रोगाचे नाव :- पेब्रिन रोग बीज ( स्पोर)
रोगकारक:- नोसीना बॉम्बीस प्रोटोझोआ
रोगाचे ठिकाण :- आतड्यातील पेशी व त्वचा
रोगाचे लक्षण :- अंडी:- पेश द्रव ( अंडी) सूक्ष्मदर्शकाखाली रोगाचे बीज ( स्पोर) फिकटनिळ्या रंगाचे दिसतात. अंडींची संख्या कमी येणे, अंडी कार्डवर चिटकत नाहीत. फलधारणा न झालेली अंडी ( गंधी अंडी ) व मृत अंडी तयार होतात.
अळी :- खाण्याची क्रिया मंदावते, लहान – मोठ्या आकारात वाढ होते. कातेवर एकावेळी बसत नाहीत. तिसऱ्या कात अव्स्थेअगोदरच मृत पावतात. काळे गोलाकार डाग शरीरावर दिसतात.
कोष:– कोष सुजल्यागत दिसतात. कोषातून प्रौढ पतंग बाहेर पडत नाहीत.
रोगाचा प्रसार :– मादी पतंगातून अनुवांशिक रित्या रोग संक्रमण होते. प्रादुर्भाव मृत अळ्यांपासून, विष्ठा, पतंग, रोगीट अंड्यांपासून, अळीच्या रोगीट कात किंवा कोषापासून, तसेच तुती पानांतून प्रादुर्भाव होतो.
मादी पतंग परीक्षण :– सूक्ष्मदर्शकाखाली अंडीबीज स्पोर परीक्षण करून नष्ट करणे.
नियंत्रण:– शिफारसी प्रमाणे कीटक संगोपनगृह तथा संगोपन साहित्य वेळोवेळी निर्जंतुक करणे.
पेब्रिन रोग ग्रस्त रेशीम किटक
मादी रेशीम किटकांची तपासणी :- पेब्रिन हा एकमेव अंड्यांतून प्रसार होणारा रोग असून अनुवांशिक रित्या पुढच्या पिढीत येणारा रोग आहे.रोग प्रसार टाळण्यासाठी सूक्ष्म दर्शकाच्या साह्याने मादी रेशीम किटकाची अंडी घातल्यानंतर तपसणी करून पेब्रिन स्पोर प्रादुर्भावग्रस्तमादी नष्ट करणे, म्हणजे पुढील रोग प्रसार टळतो.
2) विषाणूजन्य ग्रासरी :- ( Nuclear Polyhydrosis ) रोग:-
ग्रासरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रोगास कर्नाटकात हेलू रोग, आंध्रप्रदेशात पेलूकरूरोग,तर तामिळनाडूमध्येपालपोचिनॉय म्हणून संबोधले जाते.
ग्रासरी रोगग्रस्त रेशीम किटक
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
रोगाचे नाव :- ग्रासरी( विषाणूजन्य रोग )
रोगकारक:- बोरेलीना बॉम्बीस विषाणू( BmNPV )
रोगाचे ठिकाण :- फुफ्फुस नलिका पेशी केंद्रक ( Tracheae )
स्निग्ध पदार्थ ( Fat Bodies ) , त्वचा आणि
किटकाचे रक्त.
रोगाचा प्रसार :- BmNPV– बोम्बॅक्स मोरी नुक्लियर पॉलिहैड्रोसीस व्हायरस या विषाणूमुळे हा रोग होतो. रेशीम कीटकाच्या रक्तामध्ये विषाणूचे दाणेदार विष, श्वसन संस्था, स्निग्ध पदार्थ व त्वचेत तयार होते. या रोगामुळे ३० ते ५५ टक्के कोष उत्पादनात घट येते.
रोगाचे स्त्रोत :-
अ) वाढीच्या लहान अवस्थेत तुती पानांतून रोगाचा प्रादुर्भाव होतो. धुळीतून, पूर्वीच्या चंद्रिका, ट्रे, नायलॉनजाळी इ. तून प्रादुर्भाव होतो.
ब) जास्त कीटक संगोपनातील तापमान,कमी आद्रता आणि कमकुवत तुती पानांचीप्रत खाद्य म्हणून दिल्याने हा रोग होतो.
रोगाचीलक्षणे:-
- रोगाचा प्रादुर्भाव पहिल्या वदुसऱ्या वाढीच्या अवस्थेत किंवा अंडी काळात झाला तरकिटकाची वाढ तिसऱ्या व चौथ्या अवस्थेपर्यंत फक्त बाहेरील शरीराची वाढ व्यवस्थित दिसते.
- प्रौढ अवस्थेत किटकाची कातडी चकाकते. अळीच्या शरीराचे भाग फुगून एकमेकांवर चढल्या सारखे दिसतात. रेशीम कीटक कोश विणत नाहीत आणि रॅकच्या कडेला फिरतांना दिसतात.
- रोगग्रस्तकिटकाची त्वचा सहजगत्या फाटून पांढरा द्रव बाहेर पडतो.
- हा रोग वर्षभर आढळतो पण, उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक असते.
ग्रासरी रोग नियंत्रण :-
- दोन पिकांत आठ दिवसांचा खंड असावा. या काळात तीन ते चार वेळा निर्जंतुकीकरण( संगोपन गृह व संगोपन साहित्य ) ०.३ टक्के चुन्याचे द्रावण + २ टक्के ब्लिचिंग पाऊडरच्या सहाय्याने करणे आवश्यक आहे.
- स्वतःची व संगोपन गृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
- रोगाची लागण होण्याच्या पहिल्या काळात लहान अळ्या वेगळ्या काढून नष्ट करणे, प्रत्येक कात अवस्थेनंतर विजेता/ अंकुशनिर्जंतुक पाऊडरचाशिफारसी प्रमाणे धुराळणी साठी वापर करणे. संगोपन गृहात आवश्यक तापमान व आद्रता मर्यादित करणे. संगोपन रॅकवर रेशीम कीटकांची संख्या दाटी न होऊ देता मर्यादित ठेवणे. प्रौढ अवस्थेत आणि कोश बांधणीच्या काळात संगोपन गृहात तिरपे वायुविजन ठेवणे ( म्हणजे १ मीटर प्रती सेकंद अशी हवा खेळती राहील ) याची काळजी घेणे.
३) जीवाणूजन्य बॅसिलस थुरीन्जेनेसिस / रक्त क्षय :-
रोगाचे नाव :- जिवाणूजन्य रोग.
रोगकारक:- बॅक्टेरियल बॅसिलस थुरीन्जेनेसिस ( रक्तक्षय)
रोगाचे ठिकाण :- किटकाचे रक्त
रोगाचे लक्षण :-लालचाल मंदावणे, भूक कमी होणे, छातीवर सूज येणे, उलटी होणे, शरीर निस्तेज व लवचिक होते. हलक्या धक्क्याने त्वचा फाटते, काळा द्रव बाहेर पडतो व दुर्गंधी सुटते. शरीरातील जखमेतून रोगाची लागण होते.
रोगाचा प्रसार :– रेशीम कीटकाच्या जखमेतून रोगाची लागण किंवा तुती पानावरच्या धुळीतून रोग प्रसार.
रोगाचे नियंत्रण :– शिफारसी प्रमाणे कीटक संगोपनगृह तथा संगोपन साहित्य वेळोवेळी निर्जंतुक करणे.
उर्वरित माहिती पुढील भागात घेऊ ……..( क्रमशः)
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.