जनावरांच्या उत्तम प्रजोत्पादनासाठी आहार नियोजन महत्वाचे आहे

0

जनावरांच्या आहारात निकृष्ट चार्‍याचा वापर तसेच असंतुलित पशुखाद्य मिश्रण यामुळे जनावरांचे कुपोषण होते. जनावरांमधील कुपोषणामुळे जनावर वयात लवकर येत नाही तसेच माजावर लवकर येत नाही आणि वयस्कर जनावरांमध्ये अनियमित माज तसेच माजावर न येणे यासारखे प्रकार दिसून येतात. उर्जेच्या कमतरतेमुळे स्त्रीबीजाची वाढ नीट होत नाही तसेच प्रजननक्षमता कमी होते. जनावर वितेवेळी जर त्याचे आरोग्य चांगले नसेल तर असे जनावर लवकर माजावर येत नाहीत, माजावर आलीच तर गर्भधारणा होत नाही. कुपोषणामुळे वाढ न झालेल्या वासरांना जन्म देणे तसेच गर्भाशयामध्ये गर्भाचा मृत्यू होणे यासारख्या समस्या आढळतात. जनावर माजावर असताना आणि कृत्रिम रेतन केल्यानंतर शर्करेची कमतरता असेल तर गर्भधारणा व्यवस्थित होत नाही कारण शर्करेच्या कमतरतेमुळे शुक्रजंतूंना किंवा गर्भाला उर्जेची कमतरता निर्माण होते. जनावर व्यायल्यानंतर येणारा ताण नष्ट होऊन तसेच दुग्धोत्पादनासाठी लागणारी उर्जा यांची गरज भागून जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य आहार देण्याची गरज असते.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.