शेती म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण दिल्लीच्या 37 वर्षीय गीतांजली या शेतीचं अनोखे मॉडेल विकसित करताहेत. सन 2017 मध्ये त्यांनी फार्मिजन नावाने स्टार्टअप सुरू केलंय. मुळच्या त्या बंगळुरूच्या आहेत, व त्यांनी बंगळुरू, हैदराबाद व सुरत या शहरामध्ये कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली असून त्यांनी शेतकऱ्यांबरोबर पार्टनरशिप सुरु केलीय. त्यांनी नवी पद्धत अवलंबली आहे. त्यांनी 600 – 600 स्वेअरफुटांच्या आकारात शेताचे तुकडे केले. ते ग्राहकांना 2500 रु. प्रतिमाह दराने भाड्याने दिले. ग्राहक मोबाईल अॅपद्वारे आपल्या प्लॉटची निवड करतात आणि तिथे पसंतीचा भाजीपाला लागवड करण्यास सांगतात. यामुळेच ग्राहकांची संख्या तीन हजारावर पोचलीय. त्यामुळेच त्यांना ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय.
भाजीपाला तयार झाल्यावर ‘फार्मिजन’च्या वाहनांद्वारे ग्राहकांना घरपोच दिली जाते. या मॉडेलचे दोन फायदे आहेत. 1. ग्राहकांना घरबसल्या 100 टक्के सेंद्रिय भाजीपाला मिळतोय. 2. शेतकऱ्यांचे उत्पन्न तीनपटीने वाढले आहे.
त्यांनी ‘फार्मिजन’ने सेंद्रिय फळांचीही थेट पोच सुरू केलीय. यामुळे चांगलाच फायदा होतोय. कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 8.4 कोटी रुपये आहे. या नव-नवीन पद्धत अव्लाम्ब्ल्यामुळे ‘गोल्डमॅन सॅक्स’ व ‘फॉर्च्यून’ यांनी गेल्या वर्षी गीतांजली यांना ग्लोबल वुमन लीडर पुरस्कार दिलाय. स्वत:च काम उभं करायचं होत त्यामुळे 2014 मध्ये त्यांनी टीसीएसची नोकरी सोडली. 2014 मध्येच ग्रीन माय लाईफ नामक कंपनी सुरू केली. रुफ टॉप गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग, डिझाइनिंग आदी कामे केली जातात. वार्षिक उलाढाल 6 कोटींची आहे.
ओला-उबेर सारखे मॉडेल:
बिझनेस मॉडेल साधे सरळ आहे. ग्राहकांना सेफ भाजीपाला हवाय, तर शेतकऱ्यांना किफायती उत्पन्न. फार्मिजन शेतकऱ्यांना सेंद्रिय बी-बियाणे, खते-औषधे पुरवते. अडीच हजार रु. भाडे फार्मिजन व शेतकरी अर्धे-अर्धे वाटून घेतात.
…उमेदीची वर्ष नोकरीत गेले म्हणून काय झाले… नव काही करण्याची उमेद थोडीच सरते, उमेदीला थोडेच वयाचं बंधन असते… गीतांजली यांनी ते सिद्ध केलंय!