• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 10, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

उन्हाळी भुईमूग लागवड सविस्तर माहिती

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
October 17, 2018
in शेती
0
उन्हाळी भुईमूग लागवड सविस्तर माहिती
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. मागील दोन दशकांपासून भुईमूग लागवडीसाठी शेतकरी फारसा उत्सुक नाही कारण सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल आदी पर्याय उपलब्ध झाल्याने, तसेच मिळणारा बाजारभाव व मजुरांची कमतरता असल्याने या पिकाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले असले तरी भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.

1)भुईमुगाचे महत्त्व :
भुईमुगाची खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे १००० किलो तर उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्‍टर आहे दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्‍य आहे.
उन्हाळी हंगामासाठी योग्य भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी करावी तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे सहज शक्य होते. भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे. खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असल्यामुळे तुलनेने क्षेत्र कमी असले तरी  उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते.

१) पेरणीसाठी योग्य कालावधी :- १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत.

२) हवामान :-
अ) पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
ब) फुलोरा अवस्थेच्या वेळी या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस लागते, नाहीतर फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. जास्त उशिरा पेरणी केली तर फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
क) हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील असते. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.

३) जमीन आणि मशागत :-
अ) मध्यम प्रकाराची, भुसभुशीत अशी , चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
ब) जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त १२-१५ सें.मी. एवढीच ठेवावी. जास्त खोल नांगरणी केली तर जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. बऱ्याच वेळा पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना किंवा  वखराने काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राह्ण्याची शक्यता असते; परिणामी उत्पादनात घट येते.
क) जमीन भुसभुशीत करण्यासाठी नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून घ्यावी. शेवटची वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे २ टन प्रतिएकर याप्रमाणे देण्यात यावे.

४) बियाणांचे प्रमाण :-
जाती प्रमाणे तसेच दाण्याच्या आकारमानाप्रमाणे बियाण्याचे प्रमाण ठरते.

  • कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी ४० किलो,
  • मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी ५० किलो
  • टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी ६० किलो बियाणे वापरण्याची तजवीज आहे.

५) भूईमुगाच्या जाती :-
  अ) प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच (इरेक्ट – बंची) प्रकारच्या जातींची लागवड करावी.
  ब) एसबी – ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात.
क) टीपीजी –४१ ही मोठ्या दाण्याची जात असून, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
  ड) जे एल –२२० (फुले व्यास) हीसुद्धा मोठ्या दाण्याची जात असून, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
  इ) जेएल-५०१ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत आहे.
  ई) जेएल –७७६ (फुले भारती) या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस आहे.
वरील शिफारशीनुसार उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच परिसरात उपलब्ध उत्पादनक्षमता, या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.

६) बीजप्रक्रिया :-

पेरणीच्या अर्धा तास आधी
अ) थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा कल्चर (भुकटी) ४-५ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा कल्चर (द्रव्य) ३-५ मि.लि.
सूचना : बीजप्रक्रियेनंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे.

७) जिवाणुसंवर्धक बीजप्रक्रिया :-
 १) रायझोबियम कल्चर (द्रव्य) ५ मि.लि. किंवा
२) रायझोबियम कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक  स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि. किंवा
३) स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक पोटॅश विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि.
सूचना : बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया झाल्यानंतर जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.

८) सिंचन व्यवस्थापन कसे करावे :-
a) जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: ९० ते ११५ दिवसांचा असू शकतो. तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
b) पेरणीआधी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर किंवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी किंवा पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
c) नंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाणी द्यावे. यावेळी जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करून घ्यावी.
d) फुलोरा येण्याच्या अवस्थेपासून (म्हणजेच पेरणीपासून २२ ते ३० दिवस) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४० – ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५ – ७० दिवस) या वेळेस पाण्याची पाळी चुकवू नये.
e) पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसारच ठरवावे.
f) एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
g) ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्‍यक असते.

९) खत व्यवस्थापन :-
 पेरणीवेळी ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रतिएकरी द्यावे. पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.

१०) आंतर मशागत :-
अ) पेरणीपासून साधारणत: १०-१२ दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
ब) पेरणीपासून सुरवातीच्या ६ आठवड्यांपर्यंत २-३ डवरणी तसेच १-२ वेळा खुरपणी करावी.
क) आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नयेत.

११) तणनाशकांचा वापर :- 
आवश्‍यकता असल्यास तणनाशकांचा वापर करावा.
प्रमाण : फवारणी प्रतिलिटर पाणी – पेंडीमिथॅलीन ७ मि.लि.
सूचना : फवारणी पेरणीनंतर ४८ तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना करावी. त्यामुळे पीक सुरवातीच्या २० ते २५ दिवस तणविरहीत राखता येते.
गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास :-
प्रमाण : फवारणी प्रतिलिटर – क्विझॉलोफॉफ ईथाईल २ मि.लि.
सूचना : ही फवारणी पेरणीनंतर २० दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना    करावी.
काही रुंद पानांची तणे तसेच गवतवर्गीय तणे या दोन्हीसाठी, इमॅझीथापर या तणनाशकाचा वापर शिफारस व लेबल क्लेमप्रमाणे करावा.

१२) कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन :-
1) मावा, फूलकिडे, तुडतुडे :- प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी.
दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर- डायमिथोएट- ५०० मि.लि. प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारणी (प्रतिहेक्‍टरी )
2) पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी :- क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.
3) टिक्का रोग नियंत्रण :-  मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
4) तांबेरा रोग नियंत्रण :- हेक्साकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाणी प्रति
या प्रमाणे फवारणी करावी.

१३) काढणी :- 
भुईमुगाचा पाला पिवळा आणि शेंगाचे टरफल टणक झाल्यावर आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते ९ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणावे.

१४) उत्पादन :-
भुईमुगाची सुधारित पद्धतीने पेरणी, योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्‍टरी २० ते २५ (खरीप), तर ३० ते ३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४ ते ५ टन कोरडा पाला मिळण्यास काहीच मज्जाव नाही. अशाप्रकारे आपण हे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Tags: Detailed information about summer groundnut cultivationउन्हाळी भुईमूग लागवड सविस्तर माहिती
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

जायद सीजन में भिंडी की खेती 
शेती

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

जायद सीजन में भिंडी की खेती 

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

March 12, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In