धोका कर्करोगाचा – बैलाच्या शिंगांना !

0

काळजी घेण्याचे आवाहन – तेल रंगाने इजा होण्याची शक्यता

बैलाच्या शिंगांना कर्करोगाचा धोका बळकावत आहे यामध्ये ५ ते १० वर्षे वयाची जनावरे अधिक असल्याची दिसून येत आहेत. खच्ची केलेल्या व शेती काम करत असणाऱ्या बैलांत हे प्रमाण गाईंपेक्षा जास्त आढळून येत आहे. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करण्याचे पशुसंवर्धन उप आयुक्तांचे म्हणणे आहे.

जनावराची शिंगे हि संरक्षणासोबत शरीराची शोभाही वाढवितात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्वाचे आहे. शिंगांमध्ये जळजळ होत असल्याने बैल इतरत्र शिंगे घासून इजा होऊन चार टप्प्यात कर्करोगाची लक्षणे आढळतात. लक्षणे दिसताच त्याची पशु वैद्यकांकडून योग्य तपासणी करून ईलाज केल्यास हा रोग बरा होऊ शकतो. जिल्हा सर्व रुग्णालयात अशी लक्षणे आढळल्याची पशुसंवर्धन उप आयुक्तांचे म्हणणे आहे.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

अमरावती जिल्ह्यातील शिंगांच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. शेतकऱ्यांनी या बाबत दिरंगाई न करता पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचाराला न्यायला हवे. मोहन गोहत्रे – पशुसंवर्धन उपायुक्त.  

दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे :- शिंगे हळूहळू खाली झुकतात. शिंगांच्या बुडाला जखम होते. जखमेतून रक्त, पु निघते व घाण वास येतो. कर्करोग झालेल्या शिंगावर मारून पाहिल्यास आवाजात फरक जाणवतो.

तिसऱ्या टप्प्यातील लक्षणे :- शिंग पूर्णतः एका बाजूस झुकते. आपोआप तुटून पडते. शिंगाच्या बुडाला जखमेची वाढ झालेली दिसते. अशक्तपणा, तणाव येतो.भूक मंदावते.

कर्करोगाची कारणे :- शिंगांना तेल रंग लावल्याने त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो. शिंगे सोलणे किंवा घासणे, शिंगांना सतत इजा होणे, उन्हात काम करीत असतांना सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कर्करोग होतो. शेतात काम करीत असतांना सतत शिंगाला जू घासणे, शिंगांना सतत दोर बांधून ठेवल्याने कर्करोगाची शक्यता बळावते.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

कर्करोग कसा ओळखावा ?

पहिल्या टप्प्यातील लक्षणे टणक, कडक जागेवर शिंग घासणे, असमान शिंगे, कर्करोग झालेल्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्त्राव, शिंगाचे बुड मऊ, गरम होते, शिंगाला वेदना होतात.

बैलांवर असे करावे उपचार

लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत. शस्त्रक्रिया करून कर्करोग बाधित शिंग बुडापासून काढून टाकावे. कर्करोग विरोधी औषधांचा तज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. शिंगे सोलू किंवा घासू नये. विषारी घटक असलेला रंग लावू नये. कडक उन्हात बैलांकडून अधिक वेळ काम करून घेऊ नये. शिंगांना सतत इजा होणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करावा. जू वर आवरण घालावे. शिंगांना सतत टोचणे मारणे बंद करावे. वेळोवेळी पशुवैद्यकांचे मार्गदर्शन घ्यावे.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.