बागबगीचातील फुलझाडांत डेलिया हे एक मोठे आकर्षण आहे. ही फुलझाडे हंगामी, वर्षायु – द्विवर्षायू असे प्रकार असून लहान फुलांपासून टपोऱ्या आणि विविध रंगाची फुले देणाऱ्या डेलियाच्या अनेक जाती आहेत. डेलियाच्या फुलांचा रंग लाल, पांढरा, पिवळा किंवा जांभळा असतो. काही फुले दोन रंगी असतात. फुलांचा आकार ५ -३० सेंमी. व्यासाचा असतो. जातीपरत्वे झाडाची उंची वाढते, दांड्यावर भरगच्च फुले लागतात. कुंडीत लागवड करण्यासाठीही डेलिया फुलांचा कलात्मक वापर करता येतो.
डेलिया प्रामुख्याने पावसाळी हंगामात चांगला वाढतो व फुलतो. हंगामी डेलीयाचे बी लहान, पातळ आणि हलके असते. फुलांचा हंगाम राखून ठेवावा. डेलिया लाल मातीत चांगला वाढतो. डेलियाच्या कंदाला हिरवे अंकुर आल्यानंतर त्याचे पानांत रुपांतर होते. यानंतर रोप एक फुटापर्यंत वाढल्यानंतर लाल माती, तसेच सेंद्रीय खतांचे मिश्रण टाकून कुंडी भरून घ्या. मात्र पूर्णपणे भरू नका. मुळे पूर्णतः झाकली जातील हे पाहा. डेलियाचे रोप थेट जमिनीतही लावता येते. परंतु, हे रोप थेट जमिनीत लाऊ नये. कारण त्याची मुळे उंदीर कुरतडण्याची शक्यता असते.
तापमान:-
दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास डेलियाच्या रोपावर शेडनेट लावावे. रोप कुंडीत असेल, तर कुंडी सावलीत ठेवावी. फ्रेब्रुवारीनंतर झाडाला फुले कमी येतात. त्यावेळी लांब फांद्या छाटाव्यात, तसेच काही मुळे काढून साठवून ठेवावीत. मुळे बाहेर काढून वाळवावीत आणि एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवावीत. या बॅगला हवा जाण्यासाठी छोटे छिद्र पाडावे. पावसाळ्यात डेलियाच्या या मुळांची पुन्हा लागवड करता येईल.
रोपांची काळजी:-
चांगली वाढ होण्यासाठी डेलियाला वेगवेगळी खते द्यावी लागतात. योग्य निगा राखल्यास सुंदर फुले येतात. कमी नायट्रोजन असलेले खत ५:१०:१० किंवा १०:१९:१९ वापरता येईल. पाण्यात विरघळणाऱ्या खतांची निवड करा. दर पंधरा दिवसांतून एकदा खते द्या. यामुळे चांगली फुले येतील. दरम्यानच्या काळात अस्थिचूर्ण (बोन मिल) देखील झाडाला देता येईल. झाड उंच वाढण्यासाठी त्याची तीन इंचापेक्षा अधिक वाढलेली फांदी एखाद्या नळीला बांधा. निस्तेज झालेली फुले आणि पाने खुडून टाका. झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा अन्यथा फुले चांगली फुलणार नाहीत. फुले फुलल्यानंतर किटनाशके फवारा. किडीपासून संरक्षण होण्यासाठी झाडावर कडुलिंबाचे तेल नियमितपणे फवारा. डेलियाचे कंद बाजारात १० ते २५ रुपयांपर्यंत मिळते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.