• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 4, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

पिकातील तण व्यवस्थापन

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
October 24, 2018
in शेती
0
पिकातील तण व्यवस्थापन
Share on FacebookShare on WhatsApp

एकदलवर्गीय : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचू, चिमनचारा इ.
व्दिदलवर्गीय : दिपमाळा, दुधी, माठ, काटेमाठ, कुंजरु, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, माका, उंदीरकाणी, शेवरा, रान एरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथरी, चांदवेल, चंदनबटवा, खांडाखुळी इ.

तणामुळे हेाणारे नुकसान :
पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते, कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो, कालवे चार्‍याची वाहक क्षमता घटते. उत्पादनात घट येते. शेती उत्पादनांची प्रत खालावते.

पिकातील तणांचा बंदोबस्त:
तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी ओलितांचे दांड नेहमी तणविरहीत ठेवावे. शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढू देऊ नये. शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक घ्यावे. मजुरांची कमतरता भासल्यास तणनाशकाचा वापर करावा.
तणनाशकाची फवारणी फुट स्प्रेअर अथवा नेंपसॅक पंपाने करावी. त्यासाठी फ्लॅटफॅन अथवा फ्लडजेट नोझल वापरावे. तणनाशकाची फवारणी केलेला पंप साबणाच्या पाण्याने 2 ते 3 वेळा धुवावा व नंतरच किटनाशके फवारणी करीता वापरावे.

विविध पिकातील तणांचे नियंत्रणः
ज्वारी, बाजरी : पेरणीनंतर 2 निंदण्या व 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी अ‍ॅट्रॅझीन 0.75 कि हे. या प्रमाणात फवारावे.
ओलिताखाली पेरसाळ : पेरणीनंतर दोन निंदण्या व दोन कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलिन 2.0 कि.हे या प्रमाणात फवारावे.
तूर : पेरणीनंतर तणांच्या प्रादुर्भावप्रमाणे तीन निंदण्या आणि कोळपण्या 3, 6 आणि 9 आठवड्यांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी मेटोलॅक्लोर 1.0 कि/हे. या प्रमाणात फवारावे.
सूर्यफुल : पेरणीनंतर तीन निंदण्या आणि तीन कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी 0.10 कि./हे. ऑक्सीक्लोरफेनची फवारणी करुन नंतर 6 आठवडयांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.
कपाशी : पेरणीनंतर तीन निंदण्या व कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात. किंवा पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन 1.00 कि./हे. या प्रमाणात फवारणी करावी नंतर 6 आडवडयांनी एक कोळपणी व खुरपणी करावी.
ऊस : सुरु उसाला 3, पूर्वहंगामी ऊसाला 4 व आडसाली उसाला 4 ते 5 निंदण्या एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात.
हळद : हळद पीकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी व अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक उगवणीपुर्वी मेट्रीब्यूझीन 70 टक्के डब्ल्यु. पी. 0.7 कि. क्रियाशील घटक प्रती हेक्टरी, लागवडीनंतर 9 आठवडयांनी काडाचे आच्छादन 10 टन प्रति हेक्टरी व 12 आठवडयांनी एक खुपरणी करावी. किंवा चार निंदण्या 3, 6, 9 व 12 आठवडयांनी द्याव्यात किंवा अ‍ॅट्राझीन 0.75 कि. /हे किंवा ऑक्सीक्लोरफेन 0.15 कि./हे ची उगवणीपूर्वी फवारणी करुन नंतर 9 व 12 आठवडयांनी फवारणी करावी.

 

हिरा ब्रश कटर

 

घातुक तणांचा बंदोबस्त
हराळी, नागरमोथा, कुंधा
उन्हाळी हंगामात जमीन नांगरुन, वखरुन वर आलेल्या गाठी, काशा वेचून जाळून टाकाव्यात. या तणाच्या नियंत्रणासाठी ही तणे कोवळी असताना (2 ते 4 पाने असताना) ग्लायफॉसेट हे तणनाशक हेक्टरी 2.05 कि. या प्रमाणात फवारावे. हे तणनाशक बाजारात ग्लायसेल, राऊंड अप, विडॉफ इ. नावाने मिळते. फवारावीनंतर दोन तास पाऊस पडणार नाही याचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. फवारणीनंतर 3 ते 4 आठवडे अशा जमिनीत कसलीही मशागत करु नये.

गाजरगवतः
गाजर गवताच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक, निवारणात्मक, निर्मूलनात्मक

प्रतिबंधात्मक : हे तण फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून काढावे. कंपोस्टचे खडडे, ओलिताचे दांड, कालवे, रेल्वेलाईन, रस्ते इत्यादी ठिकाणी गाजरगवत फुलावर येण्यापूर्वी उपटावे.

निवारणात्मक : उभ्या पिकातील गाजरगवत निंदणी अगर कोळपणीव्दारे मुळासकट काढावे. निरनिराळया पिकांत तणांचे नियंत्रणासाठी तणनाशकाच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्यांचा अवलंब केल्यास पिकात गाजर गवत उगवत नाही.

पडीत जमिनीत उगवणार्‍या गाजर गवतासाठी 2, 4 डी हे तणनाशक (सोडियम क्षार) 3 किलो किंवा ग्लायफोसेट 5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळून हे तण फुलावर येण्यापूर्वी फवारावे. गरज भासल्यास पुन्हा 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणात फवारणी करावी. 2, 4 – डी उपलब्ध नसल्यास खाण्याचे मीठ 20 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून फुलावर येण्यापूर्वीच त्यावर फवारावे. किंवा पीक विरहीत क्षेत्रावर तरोटा बियाणे (15 ग्रॅम तरोटा बियाणे प्रति चौरस मिटर) वापरले असता गाजरगवताची संख्या व त्याचे शुष्क वजन परिणामकारकरित्या घटू शकते. त्यामुळे अशा क्षेत्रावर चार ते पाच वर्षानंतर गाजरगवताचा बंदोबस्त परिणामकरकरित्या होतो.

निर्मूलनात्मक :
गाजर गवत एकाच वेळी सर्व संबंधितांनी आणि संस्थानी सामुहिकरित्या फुलावर येण्यापूर्वीच वारंवार काढून टाकावे. गाजर गवताच्या निर्मूलनासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर करावा.

झायगोग्रामा बायकोलरॅटा भुंग्याचा जीवनक्रम :
या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात. अंडयांचा रंग फिकट असून अंडयातून अळया बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असून अंड्यातून बाहेर निघालेल्या अळया गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. तरुण अळया झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या अळया रंगाने पिवळया पडतात. अळी अवस्था 10 ते 11 दिवसांची असते, कोषावस्था 9 – 10 दिवसांनी असून कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजिवीका करतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबरनंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळाच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजरगवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की, पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे व किती सोडावेत :
शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्यप्राण्याचा अडथळा किंवा शिरकाव नाही, अशा जागी भुंगे सोडण्यास योग्य. प्रभावी नियंत्रण रेल्वे व राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडिक जमिनीत, बसस्थानकाजवळीत मोकळया जागेत त्वरीत मिळते.
नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे :
भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील 500 – 1000 भुंगे, 10 – 15 सें. मी. उंच प्लॅस्टीकच्या बाटलीत टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा.

भुंग्याचा इतर पिकांना उपद्रव :
जैविक किड नियंत्रण संचालनालय बेंगलोरच्या चाचणीनुसार इतर पिकांना सुरक्षित आहेत. भुंगे व अळया फक्त गाजरगवतच खातात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमीनीत सुप्तावस्थेत जातात.

भुंग्याचा मानवाला त्रास :
झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणीमात्राला त्रास नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे.
भुंग्याचे प्रयोगशाळेत अथवा शेतावर गुणन :
प्रयोगशाळेत प्लॅस्टीकच्या 6 बाय 9 इंच आकाराच्या डब्यात. शेतात 10 बाय 10 फुट अथवा 10 बाय 15 फुट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याचे गुणन करतात.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Tags: Crop management in the cropपिकातील तण व्यवस्थापन
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In