‘फणी’ मुळे पिकांचे नुकसान

0

 

शुक्रवारी ओडिशा किनारपट्टीला धडकलेल्या ‘फणी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील किनारी भागांतील जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती आणि पिकांचेही मोठे नुकसान झाले. व दहा हजारांहून अधिक नारळाची झाडे पडली. वादळामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे राज्याचे मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रह्मण्यम यानी सांगितले. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२ झाली आहे. आंध्र प्रदेशात या वादळामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्या नुकसानाचा आकडा सरासरी ५८.६१ कोटी रु येवढा वर्तवण्यात येत आहे. यातील सर्वाधिक नुकसान श्रीकाकुलम जिल्ह्यात झाले आहे. या ठिकाणी चोवीस तासांत जनजीवन पूर्वपदावर आले आहे. वादळामुळे २१८ फोनच्या टॉवरचे नुकसान झाले होते. शनिवारी सकाळपर्यंत ते दुरुस्त करण्यात आले. तसेच, गावांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता त्यानंतर ७३३पैकी ६५९ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. राज्याच्या ‘रिअल टाइम गव्हर्नन्स’ केंद्राने ही माहिती दिली. राज्याचे मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी केंद्रीय मंत्री प्रदीप कुमार सिन्हा यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नुकसानाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘३०४ घरांचे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. श्रीकाकुलम जिल्ह्यात ९५८ एकर जागेवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दहा हजारांहून अधिक नारळाची झाडे उन्मळून पडली आहेत. शेजारील विजिनगरम जिल्ह्यात २२९ एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील १४५ किनारी गावांतील जवळपास २.७४ लाख नागरिकांना वादळाचा फटका बसला. मात्र, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्यात १३९ तात्पुरती निवारागृह उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी १५,४६० नागरिकांनी आसरा घेतला आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.