खेकडा पालन

2
 •      खेकड्याची शेती अतिशय कमी खर्च, कमी मनुष्यबळ व योग्य उत्पादन मिळवून देणारी आहे. हा उद्योग ग्रामीण भागात फारच फायदेशीर असा आहे. त्यास निश्चितच व चांगली अशी बाजारपेठ मिळते हे सर्वश्रुत आहे. जगाच्या बाजारपेठेत फक्त ८ ते १० टक्के लोकांना खेकड्याचे उत्पन्न अन्न म्हणून उपलब्ध होते. यावरून त्याचे महत्त्व व मागणी आपल्या लक्षात येईल. जगाच्या बाजारपेठेत अन्न पुरवायचे झाल्यास आपल्या राज्यातील किमान ५० लाख बेरोजगारांना रोजगार यातून मिळू शकेल. अमेरिकेचा अन्न प्रशासन विभाग प्रतिवर्षी खेकड्यांपासून मिळणारे उपयुक्त असे लायसेट नावाचे रक्त विकून ५ ते ६ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवितो. इतकेच काय परंतु आता पणजीच्या सागर विज्ञान संस्थेतील डॉ. अनिल चटर्जी यांनी लायसेट तयार करण्याचे तंत्र शोधून काढले आहे.

 

 •      खेकड्याचा आणखी एक उपयोग म्हणजे खेकड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे. थोडी प्रक्रिया करून त्यापासून कॅल्शियमच्या गोळ्या व कच्चा माल तयार करता येतो. यापासून आपणास ३ ते ४ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळण्याची आशा आहे. तसेच खेकडयापासून अन्न तयार करून त्यातूनही १४ ते १५  हजार कोटी परकीय चलन मिळू शकेल. हे अन्न पचनास हलके असते. गर्भवती स्त्रीने जर असे अन्न घेतल्यास गर्भाची वाढ चांगली होते व स्त्रीची प्रकृती उत्तम राहते.

 

 •      डोंगराच्या तसेच धरणांच्या पडीक जमिनीवर खेकडयांची शेती / पैदास केल्यामुळे आणखी एक फायदा म्हणजे शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा हि योजना यशस्वी होण्यास यामुळे मदतच होते. ही शेती पाईपवर पाईप रचून विशिष्ट अशी पिजस पद्धतीने केल्यास थोड्या जागेत चौपट पैदास होऊ शकते. दुसरी पद्धत म्हणजे स्लॅप पद्धत. या पद्धतीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग ४-५ मजले तयार करून होऊ शकतो. यामुळे पाण्याचाही जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो.

 

 •      जरी हे उत्पन्न वर्षातून एकदाच होत असले तरी लवकर वाढणाऱ्या खेकड्यांच्या जाती आहेत. साधारणतः २५ ग्रॅमपासून २५ किलोपर्यंत वजन असलेले खेकडे असु शकतात. त्यांचे उत्पन्न एका एकर जमिनीत २० ते २५ हजार किलोपर्यंत होऊ शकते. यापासून ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे एका एकर जमिनीतून ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. यावरून याची किफायतशीरता आपल्या लक्षात येऊ शकते.

 

 •      पहिल्या वर्षी खेकड्यांच्या प्रकल्पासाठी खर्च थोडा जास्त येतो. त्यासाठी बांधकाम, पाईप, मोटार, जाती इ. साहित्य लागते. चांगल्या प्रकारचे बांधकाम साधारणतः ३० ते ४० वर्षे टिकू शकते. आणि यातून आणखी बांधकाम पाईप्स, प्लास्टिक ट्रे इत्यादी असे दुय्यम उद्योगही अस्तित्त्वात येऊ शकतात.

 

 •      खेकड्यांना २५० ते ३०० पिल्ले एकावेळी होतात. पुढे पिलांची पैदास करून विकणे हाही एक उद्योग होऊ शकतो. असा या उद्योगासाठी व्यवसाय बँक सहाय्य, निर्माण सहाय्य यासाठी बेरोजगारांना पडीक जमिनी मिळाव्यात वगैरे गोष्टी शासनाच्या विचाराधीन आहेत.

https://krushisamrat.com/crab-crab/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

2 Comments
 1. Anonymous says

  5

 2. Anonymous says

  4.5

Leave A Reply

Your email address will not be published.