गाईचे दुध
आयुर्वेदानुसार अमृताचे भांडार म्हणून गायीच्या दूधाला आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप यांना ओळखले. या पृथ्वी तालावर केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात ‘सूर्यकेतू’ नाडी असते. इतर कोणताही प्राणी अथवा मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियामान होऊन एक पदार्थ स्रवतो त्याचा रंग हा पिवळा असतो, त्याला ‘स्वर्णक्षार’ म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते नेहमीच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि आयुर्वान होतात तसेच त्यांच्या आचार-विचारांमध्येही सात्विकता राहते.जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे दुध हितकार नसून फक्त देशी गायीचेचदुध हितकार आहे; पाश्चुरायझेशन प्रकियेमुळे दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
दुध कोणी घेऊ नये?
नवीन आलेला ताप, वारंवार जुलाब होण्याची सवय, पोटात खुटखुटणे, कळ मारून मलप्रवृत्ती, अग्निमांद्य, लघवीला अडथळा असणे, लघवी कमी होणे, मूतखडा, लहान बालकांचा दमा, खोकला व कफ विकारात दूध हितकारक नाही. अजीर्ण, आमवात, वृद्ध माणसांचा रात्रीचा खोकला या विकारात दूध वज्र्य करावे. कफ प्रकृती असणाऱ्यांनी किंवा शौचाला खडा होण्याची सवय असणाऱ्यांनी रात्री दूध घेऊ नये. कावीळ किंवा टायफॉइडचा ताप या विकारात औषधांचा गुण येत नसेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ लगेच बंद करावे. आराम मिळतो.
गायीचे दूध त्वचाविकार, आम्लपित्त, अंगाची आग, खाज, अल्सर, पित्तप्रधान पोटदुखी, झोप न लागणे, हातापायांची व डोळय़ांची आग, डोळय़ांची लाली, शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, मलावरोध, आतडय़ांचा क्षय, टीबी, मूळव्याध, भगंदर, दारूचे व्यसन, तंबाखूचे दुष्परिणाम, तोंडातील व्रण, कोणत्याही जखमा, मधुमेह इत्यादी नाना विकारांत उपयुक्त आहे.
डोळे दुखणे – उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात ओले करून ते कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त – आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा थंड दुध घोट-घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी पिणे गरजेचे आहे. दुध थंडगार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त – कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
सोरायसिस या दुर्धर विकारात गायीचे दूध नवजीवन देते. सूर्याच्या शापाला म्हणजेच उष्माघाताला ‘गोमातेचे पुण्य’ हे मोठे उत्तर आहे. दीर्घकालीन तापातून, विशेषत: टायफॉइड, मलेरिया, टीबी या तापातून बाहेर पडताना गाईच्या दुग्धाचा आधार घ्यावा.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.