कापसातील विकृती व त्यांचे व्यवस्थापन

0
विकृती तपशील लक्षणे व्यवस्थापन
१) लाल्या हि विकृती कुठल्याही बुरशी किंवा जीवाणूंमुळे होत नसून प्रादुर्भाव अमेरिकन संकरित बी.टी वाणावर जास्त दिसून येतो. कापसावर हि विकृती संकरित वाण, जमीन, खतांच्या मात्रा आणि हवामान यांच्या विविध परिस्थितीमुळे आढळून येते. नत्राच्या कमतरतेमुळे हरित ग्रंथींचे विघटन  होऊनत्या प्रथम पिवळ्या पडतात नंतर लाल होतात. पाण्याचा ताण पडणे किंवा पाणी साचून राहणे, पानात नत्राचे प्रमाण १ % पेक्षाकमी होणे आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव इत्यादी कारणे आहेत. या विकृतीमुळे पाने लाल होऊन बऱ्याचवेळा शिरा हिरव्या राहतात. तीव्रतेनुसारपाने कमी किंवा अधिक लाल पडून गळून पडतात. – कापूस पिकास एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. त्यासाठीशेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत यांचा वापर करावा. – शिफारस केलेल्या वेळेतच कापसाची लागवड करावी. – मॅग्नेशीअम सल्फेट २५ कि.ग्र/ हे. वापर करावा. – पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. – जमिनीस शक्यतोवर भेगा पडू देऊ नये. जमीन भुसभुशीत ठेवावी. – पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्यावी. – कोरडवाहू परिस्थितीत संरक्षित पाणी द्यावे किंवा शक्य नसल्यास नियमित कोळपण्या कराव्यात. – रस शोषणाऱ्या किडींपासून पिकाचे संरक्षण करावे. – पिक पात्या, फुले धरण्याच्या वेळेस २ % युरियाच्या द्रावणाची व बोंडे धरण्याच्या कालावधीत २ % डि.ए.पी च्या द्रावणाचीफवारणी करावी. – मॅग्नेशीअम सल्फेटची १ टक्के फवारणी करावी.
२) आकस्मिक मर कपाशीची वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २८ ते ३५ डिग्री .से. लागते. दिवसाचे तापमान ४० डिग्री.से. किंवा त्यापेक्षा जास्त दीर्घकाळ टिकून राहिल्यास शरीरक्रियेत अनिष्ट परिणाम होतात. अशावेळेस पिकास पाण्याचा ताण पडल्यास रोपाच्या जलवाहिन्या फुगीर बनून पूर्ण किंवा अर्धवट बंद होतात. पिकात जास्त काळ पाणी साचून राहिले तरी सुद्धा हि विकृती दिसते. ह्या विकृतीचा संबंध अन्नद्र्व्याशी निगडीत आहे. जास्ततापमान, पाण्याचाताण, नत्र,मॅग्नेशीअम, पालाश अन्नद्रव्यांची कमतरता आणि व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यास हि विकृती जास्त आढळून येते. या विकृतीत पानांची चमक कमी होऊन पाने मलूल व निस्तेज होतात. झाड संथ गतीने सुकू लागते. शेंडा सुकलेला दिसत नाही तसेच खोड, मूळ देखील कुजत नाही.झाड सहजगत्या उपटल्या जात नाही. काही वेळा विकृतीग्रस्तझाडाचा अर्धा भाग निरोगी व अर्धा भाग रोगट दिसतो. बऱ्याच वेळेस एका ठिकाणी दोन झाडे असल्यास एक झाड निरोगी व एक रोगात दिसते. -पिकास पाण्याचा ताण जास्त वेळ बसू देऊ नये. – झाडाजवळ जास्त वेळ पाणी साचून राहू देऊ नये. – शिफारस केलेल्या वेळेतच कापसाची लागवड करावी. – या विकृतीसाठी तसा काही ठोस उपाय नाही परंतु शेतात दिसू लागताच पुढील उपाय केल्यास निश्चितच फायदा होतो. – विकृती दिसू लागताच प्रादुर्भाव ग्रस्त झादालगतची जमीन खुरपीने भुसभुशीत करावी. – १.५ किलो युरिया व १.५ किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण १५०ते २०० मि.ली विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याशी ओतावे. – विकृतीग्रस्त झाडाला इतर रोगकारक घटकांपासून संरक्षण मिळणेसाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑकझी क्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे घेऊन बुंध्यास ओतल्यास फायदा होतो.
३) नैसर्गिक गळ पिकाला पाण्याचा ताण पडल्यास किंवा अधिक काळ पाणी साचून राहिल्यास पात्यांची, फुलांचीअथवा लहान बोंडांची गळ होते. पात्यांची, फुलांचीअथवा लहान बोंडांची गळ होते. – योग्य पाणी व्यवस्थापन करावे. – एन.ए.ए. या संजीवकाची५ मि.ली. प्रति पंप या प्रमाणे २ ते ३ आठवड्यांनी दोनदा फवारणी करावी.
४) तणनाशकाच्या वापरामुळे होणारी विकृती. तृणधान्य पिकांमध्ये २.४.डी या तणनाशकाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. यातणनाशकामुळे नियंत्रण परिणामकारक होते परंतुत्याचे अवशेष जमिनीत दीर्घकाळ टिकून राहतात. अशा जमिनीत कापूस पिक घेतल्यास ही विकृती दिसून येते. तणनाशक फवारणीसाठी वापरलेला पंप कापसात फवारणीसाठी वापरला तरीही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. हे तणनाशक वापरलेल्याशेतातूनपाणी वाहूनआल्यास हि विकृती दिसते. इतर शेतात फवारताना वारा असल्यास कापसाच्या शेतात पडून परिणामदिसतात. पाने लांबट अरुंद होऊन भेंडीच्या पानांसारखी दिसतात. पानांच्याशिरा फुगीर होतात. फांद्या लांबतात व शेंड्याची वाढ खुंटते. – २.४.डी तणनाशकाची फवारणी केलेल्या शेतात कापूस लावू नये. – २.४.डी वापरलेल्या शेतातून कापसाच्या शेतात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. – तणनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप कापसासाठी वापरू नये. – दुसऱ्या शेतात वारा शांत असतांनाचतणनाशकाची फवारणी करावी. कपाशीच्या शेतात ते उडणार नाही याची काळजी घ्यावी. – २.४.डी तणनाशकाचा कापसावर दुष्परिणाम झाल्यास त्वरित उपाय योजावेत. – तणनाशक कपाशीवर पडल्याचे लक्षात येताच पाण्याची फवारणी करावी. – नवीन फुट चांगली येण्यासाठी १ टक्के युरिया द्रावणाची फवारणी करावी. – २.४.डी चा प्रादुर्भाव कमी असेल तर १.५ % कॅल्शियम कार्बोनेट( १०० लिटर पाणी + १.५ किलो कॅल्शियम कार्बोनेट ) किंवा ५० पी.पी.एम जिब्रेलिक अॅसिडची ( १०० लिटर पाणी + १/२ ग्रॅम जिब्रेलिक अॅसिड ) फवारणी करावी.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.