आल्टरनेरिया पर्ण ठिपके
आल्टरनेरिया पर्ण ठिपके हा रोग पिकाच्या शेवटच्या
टप्प्यात दिसून येतो,पिकावर
बदामी रंगाचे डाग दिसून येतात,थंडीमध्ये ओलसर हवामानात या रोगाची तीव्रता जास्त
वाढते व पाने गळून पडतात,
नियंत्रणासाठी मेटालेक्सिल 8% + मेंकोजेब
64WP ( रिडोमिल, kemoxyl ) @ 30 gmकिंवा
बाइटरलेटोन 25WP
( बायकोर ) @ 30 gmकिंवा
क्लोरोथेलोनील 75WP
@ 30 gmकिंवा टेबुकोनाझोल 250EC ( फोलिकुर, टोर्क
) @
15 मिली किंवा कार्बनडॅझिम 12% + मेंकोजेब
63%WP ( साफ, कोम्बिप्लस
) @
30 gm / 15 लीटर पाण्यातून फवारा.
मर
हा रोग काळ्या मातीमध्ये दिसून येतो,प्रतिबंधासाठी
ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक 1.25 किलो /एकर / 250 लिटर
पाण्यात मिसळून मुळ्यांच्याजवळ टाका.जास्त प्रादुर्भाव दिसल्यास कार्बनडॅझिम 150 ग्रॅम
प्रती एकर याप्रमाणात सिंचनाच्या पाण्यासोबत द्या.
जिवाणूजन्य पर्ण ठिपके
1.सुरवातीच्या काळात येणा-या जिवाणूजन्य पानांवरील
ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसाइक्लिन 15gm / 15Ltr पाण्याच्या
द्रावणात बियाणे 20
मिनिटे भिजत ठेवावे.
2.उभ्या पिकात जर रोग दिसून आला तर नियंत्रणासाठी
स्ट्रेप्टोसायक्लिन @
1ग्रॅम + कॉपर ऑक्सी क्लोराइड 50WP ( ब्लू
कोपर,
ब्लाइटोक्स ) @ 45 ग्रॅम/15 लिटर
पाण्यात मिसळून फवारा.
मूळकुज
मुळकुज हा रोग वालुकामय किंवा वालुकामय चिकणमाती
मध्ये दिसून येतो नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सी क्लोराइड 50WP ( ब्लू
कोपर,
ब्लाइटोक्स ) 500 gm + 150 gmकार्बनडॅझिम
150gm प्रती
एकर सिंचनाच्या पाण्यासोबत द्या.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.