मोसंबी हे पिवळट हिरव्या रंगाचे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे या वर्गातील एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये मोसंबीची लागवड मोठ्याप्रमाणात केली जाते. या पिकाच्या लागवडीमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. मोसंबी हे फळ मधुर, शीत, ग्राहक, दीपक व पाचक तसेच पुष्टीकारक आहे. यासोबतच मोसंबी तृष्णानाशक स्फुर्तिदायक म्हणून प्रसिद्ध आहे. वाळलेल्या मोसंबीचा रस रक्त पित्तनाशक असतो. मोसंबीच्या १०० ग्रॅम एवढ्या फळामध्ये – ५० मायक्रोग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व, ४० मिली ग्रॅम कॅल्शियम, ३० मिली ग्रॅम फॉस्फरस, ४० कि.ग्रॅ. कॅलरी असतात. यामध्ये शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं.
- हवामान:-
कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीच्या झाडांची वाढ चांगल्याप्रकारे होते. हवामानाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोसंबीच्या लागवडीस चांगला वाव असतो. कोरड्या हवामानात मोसंबीची झाडे चांगली वाढतात व अशा ठिकाणी फळांचा दर्जा चांगला असतो. ज्या ठिकाणचे तापमान १२ डिग्री सेल्सियसपेक्षा खाली जात नाही व ३५ पेक्षा जास्त नसते अशा ठिकाणी या फळझाडांची वाढ चांगली होते व फळे उत्तम पोसली जातात.
- जमिन:-
या पिकासाठी मध्यम काळी, उत्तम निचऱ्याची, साधारणतः एक मीटर खोल असलेली जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चोपण व चुनखडीचा थर असलेल्या जमिनीत मोसंबीची लागवड अजिबात करू नये. उपलब्ध चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त असू नये. भारी काळ्या तसेच पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करणे टाळावे.
- लागवड:-
१८ x १८ फूट अंतरावर चौरस पद्धतीने २ x २ x २ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यांमध्ये शेणखत १ पाटी आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम टाकावे. नंतर रोपांची लागवड करावी. रोप लावतेवेळी जर्मिनेटरची (जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाणी या द्रावणात रोपे बुडवून लावावीत) प्रक्रिया करावी. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकविला जातो. तसेच जमिनीत गांडुळांच्या संख्येत वाढ होते. रोपांचा जारवा फुटण्यास मदत होऊन रोपांची वाढ जोमदार होते.
- खते:-
पूर्ण वाढलेल्या झाडास 50 कि.ग्रॅ. शेणखत, 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे. नत्र खत दोन वेळा विभागून द्यावे. स्फुरद, पालाश व अर्धे नत्र ताण पूर्ण झाल्यानंतर द्यावे. उरलेले नत्र फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावे. बहार धरतेवेळी ५०० ग्रॅम ते १ किलो व त्यानंतर २ महिन्यांनी ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडास द्यावे. त्याने मुळांभोवती गारवा निर्माण होऊन जारवा (पांढऱ्या मुळ्या) वाढतो. तसेच झाडांची फुट व वाढ चांगली होऊन पाने गर्द हिरवी राहतील. फळधारणेस आल्यानंतर खत व फवारणी व्यवस्थित योग्य वेळी न दिल्यास पाने पिवळी पडून पानांवर चट्टे दिसतात.
- पाणी:-
पाणी देताना झाडाच्या बुंध्यास लागणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार पावसाळ्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी द्यावे. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!