जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा उपटून फेकाव्या लागल्या, कारण- केळीवर अचानक आलेला सी.एम.व्ही विषाणू रोग ( कुकुम्बर मोझाईक व्हायरस ) नुकतीचभारतीय अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांनी रावेर तालुक्याला या संदर्भात भेट दिली होती. या वेळी त्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्याने सी.एम.व्ही. विषाणू फोफावला आहे असे सांगितले आणि जैविक संसाधने वापरण्याचा सल्ला दिला.
रावेर तालुक्यातील सावखेडा गावापासून सी.एम.व्ही विषाणू आल्याचे दिसून आले. यानंतर हळूहळू संपूर्ण केली पट्ट्यात त्याने थैमान घातले. आत्तापर्यंत हजारो हेक्टरवरील केळी उपटून फेकावी लागली आहे. शिवाय बाधित क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात केळी पिकावर आलेल्या रोगांचा नायनाट करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पुणे येथे मागील शुक्रवारी बैठक झाली होती.या अनुषंगाने स्थानिक पिक पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दिल्ली येथील शास्त्रज्ञांचे पथक बोलाविण्यात आले होते. या वेळी आलेल्या पथकाने विवरा व परिसरात आलेल्यासी.एम.व्ही ( हरण्या ) या केळी पिकावर आलेल्या विषाणू रोगाची पाहणी करून, हा व्हायरस रोखण्यासाठी माती परीक्षण करून सेंद्रिय व जैविक शेतीकडे कल वाढवावा व रासायनिक खतांचा अजिबात वापर करू नये याबाबत मार्गदर्शन केले. दिल्ली येथील डॉ. राजवर्मा, डॉ. त्रिपाठी, डॉ. बडगुजर, डॉ. तिरमाली, व्ही. एस. सुपे यांच्या सोबत जळगाव येथील डॉ. शेखयांचा समावेश होता. स्थानिक कृषी अधिकारी व शेतकरी सुद्धा उपस्थित होते.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.