20 गुंठ्यात मिळाले 50 हजारांचे उत्पन्न
पाणी नियोजनाने साधली किमया
औरंगाबाद
तालुक्यातील आदर्शग्राम हत्तलवाडी येथील युवा शेतकरी माणिक मोगरे यांनी कमी पाण्यावर मिर्चीची लावगड करून पन्नास हजाराचे उत्पन्न घेतले आहे.
मानवत तालुका शेतीच्या उत्पन्नात अतिशय संपन्न आहे. मात्र पाच वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दरवर्षी विविध नैसर्गिक संकटात सापडत आला आहे. पाणी टंचाईमुळे शेतकर्यांच्या खरिप -रबी पिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न नेहमीच भेडसावत आला आहे. कधी कोरडा दुष्काळ पडल्याची स्थिती तर कधी अतिवृष्टीने शेतकर्यांवर घाला घातला आहे. असे नानाविध संकटे शेतकर्यांवर कोसळत आहेत. या विविध संकटातून शेतकर्यांना तारण्यासाठी शेतीत पाणी नियोजन महत्वाचे ठरत असल्याचा प्रयोग तालुक्यातील युवा शेतकरी माणिक मोगरे यांनी यशस्वी करून दाखवला आहे.
त्यांनी योग्य पाणी नियोजन करून कमी पाण्यावर मिर्चीचे दुष्काळाच्या परिस्थितीतही चांगले उत्पन्न घेऊन आपली विस्कटत चाललेली शेतीच्या अर्थचक्राची घडी नीट बसविण्याचा त्यांचा प्रयोग नक्कीच प्रत्येक शेतकर्याला प्रेरणा देणारा म्हणावा लागेल.
मोगरे यांनी आपल्या हत्तलवाडी शिवारातील वीस गुंठे शेतीत ड्रीपच्या माध्यमातून बाराशे मिर्चीची रोपे लावली. यातून त्यांना किमान हाजारो रूपयाचे उत्पादन केले आहे.
31 मे रोजी मोगरे यांनी अंकूर जातीच्या मिर्चीची लावगड केली. त्यानंतर त्यांना सप्टेंबर अखेर यातून 50 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांच्या मिर्ची प्लँटला जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेकडो शेतकर्यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!