शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उपाय

2

पिकावर अनेकवेळा म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आलं, काकडी, कोबी इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्ष, सफरचंदसारख्या फळांचेही थोड्याफार फरकाने असेच असते. त्याचप्रमाणे कोबी, फ्लॉवर ही हिवाळ्यातील पिके आहेत. मात्र, या भाज्या आजकाल सर्व ऋतूंमध्ये बाजारात दिसतात. अशी लागवड निसर्गानुकूल नसते. बिगर हंगामी आणि पॉलिहाऊसमध्ये पिकवल्या जाणार्‍या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते. असा रसायनयुक्त भाजीपाला ग्राहकांनी नाकारला, तरच शेतातील भाजीपाल्याची ही बिगर हंगामी लागवड थांबेल आणि आरोग्यास पोहोचणारी हानीही कमी होऊ शकेल.

रसायनांच्या परिणामांची माहिती उजेडात कोण आणणार?

शेतात फवारणी केल्यानंतर अगदी दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी तो शेतमाल बाजारात येतो. फवारणी केल्यावर किती काळ असा शेतमाल वापरू नये. याबाबत शेतकरी आणि ग्राहक दोघेही अंधारात आहेत. त्याबाबतीतील नियम असतील, तर ते केवळ पाण्याच्या फावारण्यावर अवलंबून आहेत त्यांना प्रसिद्धी कोण देणार? जनहितार्थ, तंबाखूजन्य उत्पादनावर सावधानतेचा इशारा दिला जातो; त्यातून व्यापक जनजागृती होते. अशीच व्यापक जनजागृती रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके या तिन्ही कृषी रसायनांच्या घातक परिणामांसंदर्भात होण्यासाठी कृषी रसायनांच्या वेष्टणावर सावधानतेचा इशारा ठळकपणे दिला गेला पाहिजे,

पर्यावरण स्नेही शेती पद्धतीची आवश्यकता :

शेतीसाठी कोणतेही तंत्रज्ञान वापरले, तरी ते पर्यावरणस्नेहीच असायला हवे. कारण हवा, पाणी, माती हे सजीवांचे मूलाधार आहेत. त्यांच्या आरोग्यावर माणूस, प्राणी आणि अन्य सजीवांचे आरोग्य अवलंबून असते. शेतात माझ्या आजोबांची पिढी शेतातील मुंग्यांना साखर घालत होती. तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातले नाही. म्हणूनच नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी पर्यावरणस्नेही शेती पद्धती आवश्यक ठरते.

नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी शेती पद्धती विकसित करण्याचे काम भारतात 80 च्या दशकात सुरू झाले. जपानी कृषी’ (One Straw Revolution) या पुस्तकाची या कामी मोठी मदत झाली. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक Bill Mollisionच्या Permaculture  पद्धतीचाही उपयोग झाला. ‘नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी शेती पद्धती’ या झर्‍याचे आज नदीत रूपांतर झाले आहे. जागोजागचे शेतकरी, कार्यकर्ते, अभ्यासकांनी आपआपले स्वयंसेवी योगदान दिले आहे आणि अजूनही देत आहेत. महाराष्ट्रातसुद्धा हे कार्य चांगलेच रूजत आहे, आता गरज आहे ती लोकचळवळीची. दोन-चारशे लोकांनी केलेली सेंद्रिय / नैसर्गिक शेती वाळवंटातील हिरवळीसारखी ठरते, ती दीर्घकाळ टिकण्याची खात्री नाही. शेजारी रासायनिक शेती होत असेल, तर त्याचे अनिष्ट परिणाम माझ्या सेंद्रिय / नैसर्गिक शेतीवर होणारच. पूर्वी हा धोका तेवढा गंभीर नव्हता; पण कीटकनाशकांच्या जोडीला आता तणनाशकांचा वाढता वापर आणि जी. एम. बियाणे या दोन बाबी आल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे

सुरक्षित अन्नासाठी ग्राहक गटांची उभारणी :

सुरक्षित (विषमुक्त) अन्न निर्मिती आणि त्याचे वितरण या दोन्हींसाठी शेतकरी आणि ग्राहकांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठी असे ग्राहक गट तयार झाले पाहिजेत, जे शेतकर्‍यांना विविध (कायदे, तंत्रज्ञान, शासकीय धोरण इत्यादींची) माहिती देतील, मनुष्यबळाची गरज असताना शेतावरील कष्टाची कामे करतील, शेतकर्‍यांना अनामत रक्कम देऊन त्यांची पैशाची नड भागवतील, शेतमाल वितरणाची जबाबदारी सांभाळतील. शेतकर्‍यांना मदत करणार्‍या अशा ग्राहक गटांच्या माध्यमातून जी व्यवस्था निर्माण होईल आणि शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये जे नाते निर्माण होईल, ते ‘माणुसकी’च्या दिशेने जाणारे एक ठोस पाऊल असेल. सुरक्षित अन्नासाठी आग्रह धरणारे ग्राहक गट आज क्वचितच दिसतात. जागोजागी अशा गटांची बांधणी होऊन एकत्रितपणे शासन दरबारी सुरक्षित अन्नासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

सुरक्षित अन्न आणि अन्नसुरक्षा :

‘सर्वांच्या भरण पोषणासाठी रासायनिक शेती लागणारच. सेंद्रिय शेती केल्यास लोक उपाशी मरतील’, असा प्रचार विविध माध्यमांमधून केला जात आहे. हा प्रचार लोकांमध्ये गैरसमज पसरविणारा आहे. कारण सेंद्रिय शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीचे उच्चांक मोडल्याची देखील अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. सेंद्रिय/ नैसर्गिक शेतीमुळे जमीन दरवर्षी सुपीक होत जाते, रासायनिक शेतीत याउलट घडते. रासायनिक शेती सुरूच ठेवल्यास पुढच्या पिढ्यांच्या हातात आम्ही कशा प्रकारची जमीन सोपवू? ती शेती पूर्णपणे वांझ तर नसेल?

वैज्ञानिकांचे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकासंबंधीचे घोषणापत्र

जगभरातील 80 पेक्षा अधिक वैज्ञानिकांच्या गटाने ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. या गटाने तणनाशकांच्या घातक परिणामांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला आहे.

विद्राव्य खते कशी असावीत ?

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. […] शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उ… […]

  2. […] शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उ… […]

Leave A Reply

Your email address will not be published.