चारसुत्री भात लागवड : भाग – २
चारसूत्री भातशेती पद्धतीत मुख्यत्वंकरून पुढील व्यवस्थापन सूत्रांचा अंतर्भाव होतो.
- भात पिकांच्या अवशेषांचा फेर वापर.
- गिरीपुष्पाच्या हिरवळीचे खत झाणून वापर.
- रोपांची नियंत्रित लावणी.
- लावणींनंतर त्याच दिवशी युरिया – डीएपी ब्रिकेट्सचे जमीनीत खोलवर वापर.
१. भात पिकांच्या अवशेषांचा फेर वापर यामध्ये मुख्यत्वेकरून दोन भाग आहेत
अ) सुधारित जातींची भाताची रौपे वाढविंन्यासाठी भाताच्या तुसाच्या राखेचा रोपवाफ्यात वापर करणे.
शेतकरी महिलानी घरगुती स्वयंपाकासाठी भाताच्या तुसावर चालणा-या चुलीचा वापर करावा.
चुलीतून मिळणाऱ्या राखेचा साठा खड्ड्यात करावा. रोपांना सिलिकॉन अन्नद्रव्यांचा पुरवठा व्हावा म्हणून रोपवाफ्यात प्रती चौ.मी. क्षेत्रातील मातीत हि राख अर्धा ते एक किलोग्रॅम या प्रमाणात सुधारित जातींच्या भाताचे बियाणे पेरण्यापुर्वी मिसळावी
भाताच्या उत्पादनातील तूस हा शेतावर नैसर्गिकरीत्या तयार होणारा टाकाऊ अवशेष आहे. त्याचा घरगुती स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर करावा . तूस जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या तुसाच्या राखेचा रंग काळसर – भुरकट असतो. या राखेतील सिलिकॉन हे पोषक अन्नद्रव्य अस्फटीत स्वरुपात असते. त्यामुळे भातरोपांच्या निरोगी वाढीकरिता या राखेचा रोपवाफ्यात निसर्गनिर्मित सिलिका खताचा वापर करावा .
ब) रोपांच्या लावणीपूर्वी भाताचा पेंढा जमिनीत गाडणे.
या पद्धतीमध्ये पाण्यात न भिजलेला भाताचा पेंढा हेक्टरी २० क्विंटल या प्रमाणात खाचरात सगळीकडे पसरावा व पहिल्या किंवा दुसऱ्या नांगरीटिच्या वेळी जमिनीत गाडावा. शक्य असल्यास
पेंढ्याचे २ ते ३ तुकडे करावेत.त्यामुळे तो कुजण्यास मदत होते. मजूर नसल्यास पेंढ्याचे तुकडे करण्याची आवश्यकता नाही . खाचरात पावसाचे पाणी साचल्यास पेंढा जमिनीत गाडणे सोपे जाते त्यामुळे तो पेंढा लवकर कुजतो.
२. गिरीपुष्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर
शेतक-यांनी वनशेतीच्या तंत्रज्ञानाच अवलंब करून गिरींपुष्पाच्या पानांचा हेक्टरी २० ते ३० किंटल या प्रणाणात हिरवळीचे खत म्हणून वापर करावा.
शेतक-यांनी गिरीपुष्पाच्या झाडांची बांधावर, रस्त्याच्या कडेला आणि घराजवळील तसेच शेतीस योग्य नसलेल्या पडीक जमिनीवर लागवड करावी. गिरीपुष्पाच्या लागवडीकरीता २ ते ६ सें.मी. व्यासाच्या आणि ३o ते १oo सें.मी. लांबीच्या काड्या वापराव्यात. लागवड करतेवेळी काड्या जमिनीत सुमारे २० सें.मी. खोलपर्यंत लावाव्यात. काड्यांना भरपूर मुळे यावीत याकरीता जमिनीखाली लावल्या जाणा-या काडीच्या सालीवर चाकूने छोट्या खाचा कराव्यात. गिरीपुष्पाच्या बियांपासून तयार केलेली रोपे लावूनही लागवड करता येते. गिरीपुष्पाची २ ते ४. झाडे खाचरातील एक गुंठा क्षेत्रासाठी २० ते ३० किलो पाला पुरवू शकतात. दरवर्षी गिरीपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून अंदाजे २० ते ४0 सें.मी. अंतरावर तोडाव्यात.
गिरीपुष्पाच्या फांद्या खाचरात चिखलणीपूर्वी पसरवून ठेवाव्यात.
५ ते ७ दिवसांत फांद्यावरील पाने खाचरात गळून पडतात. राहिलेल्या फांद्या गोळा करून त्याचा जळणासाठी वापर करावा.
गिरीपुष्पाची पाने चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावीत.
३. रोपांची नियंत्रित लावणी पद्धतीचा अंतर्भाव केलेला आहे
रोपवाफ्यात तुसाची राख वापरून वाढविलेली ३ ते ४ आठवडे वयाची सशक्त रोपे लावणीसाठी वापरावीत. या पद्धतीमध्ये दोन चुडातील ओळीतील अंतर १५ सें.मी. असे एका आड एक दोन्ही दिशेने राखले जाईल. या पद्धतीमध्ये चुडांची संख्या प्रती चौ.मी. लावणी क्षेत्रात २५ इतकी राखली जाते. प्रत्येक चार चुडाचा १५ x १५ सें.मी.चा चौकोन होईल अशाप्रकारे रोपांची लावणी करावी.
४ : युरिया
डिएपी ब्रिकेट्सचा वापर चौथ्या सूत्रामध्ये रोपांच्या नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात एक ब्रिकेट या प्रमाणात डायअमोनियम फॉस्फेटयुक्त युरिया (युरिया-डिएपी) ब्रिकेटस जमिनीत ७ ते १0 सें.मी. खोलीवर खोचाव्यात. युरिया – डिएपी ब्रिकेट्स हे नत्र व स्फुरदयुक्त खत आहे. प्रत्येक उशीच्या आकाराच्या एक ब्रिकेटचे वजन साधारणतः २ ते ७ ग्रॅम इतके असते. या ब्रिकेट्स युरिया (४६:०o:००) आणि डायअमोनियम सल्फेट (१८:४६:00) या उपलब्ध असणा-या खतांच्या मिश्रणापासून तयार केल्या जातात.
ब्रिकेट्सच्या खताचा दर्जा ३४ टक्के नत्र आणि १७ टक्के स्फुरद या स्वरूपात आहे. चिखलणी जमीन मऊ असते, अशी जमीन लावणीप्रमाणेच ब्रिकेट्सच्या वापरासाठीही अनुकूल असते. त्यामुळे ब्रिकेट्स जमिनीत ७ ते १0 सें.मी. खोल त्रास न होता हाताने खोचता येतात.
प्रत्येक चार चुडांच्या लावणीमुळे तयार झालेल्या एका १५ x १५ सें.मी. चौकोनाच्या मध्यभागी एक ब्रिकेट उजव्या हाताने ७ ते १o सें.मी. खोलीवर जमिनीत खोचावी. पिकास नत्र देण्याच्या या पद्धतीत प्रती १oo चौ.मी. (अंदाजे एक गुंठा किंवा १ आर) क्षेत्रात ६२५ ब्रिकेटची आवश्यकता असते. ब्रिकेट्समुळे हेक्टरी ५७ किलोग्रॅम नत्र आणि २९ किलोगॅम स्फुरद या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
[…] चारसुत्री भात लागवड : भाग – २ […]