शेतीतील कमी उत्पादनाची कारणे

0

मराठवाड्यातील जमीन पीक उत्पादन देत देत हजारो वर्षे झाली आहेत, तरी पण आजपावेतो आपण त्या काळ्या आईवर दडपण घालून क्रूरपणे तिला उत्पादनास प्रवृत्त करत आहोत. त्या आईची पीक उत्पादन क्षमता आज दिसून येत नाही. कारण संकरित वाण रासायनिक खते, विषारी औषधे ही सर्व दुसर्‍यांनी हाकलून दिलेली ती आपण वापरात आणून जमिनीची उपजाऊ क्षमता नाहीशी करून पुढील पिढीला उत्पादनात नगण्य करत आहोत. आज जमिनीवरील सेंद्रीय कर्ब व ऑक्सिजन तयार कारणारी सामग्रीही वरचेवर नष्ट करत आहोत.

अनुभवी व्यक्‍तींनी मराठवाड्यातील शेतीसाठी जे सलाईन दिली ती सार्वजनिक वृक्ष लागवड करा, पाणी, माती अडवा, पाणी जिरवा, हवा अडवा, ऑक्सिजन वाढवा, झाडे लावा, पाऊसकाळ वाढवा, ही आहे.

आज मराठवाड्यात शास्त्रज्ञांनी पुढार्‍यांच्या आदेशावरून पाणलोट गाव न निवडता जी टाकाऊ जमीन आहे ती पाणलोटाच्या लागवडी खाली येईल अशी निवडणे, पाणलोटात कोल्हापुरी बंधार्‍याचा समावेश करणे. असे केल्यास बर्‍याच अंशी वातावरण निर्मिती व पीक सुधारणा साध्य होईल.

पर्यावरणाचा विचार करता शासनाने औद्योगिक कारखाने शहरात (जवळ) न काढता मराठवाड्यात पर्वतीय जमीन (नापीक) खूप आहे. त्या जमिनीत असे कारखाने काढल्यास खेड्यातील लोकांचा शहराकडे जाण्याचा ओढा थांबेल. कारखान्यांचे दूषित पाणी टेकड्यांच्या उतारास अडवून ते पाणी खाली सुपीक जमिनीला शुुद्ध करून दिल्यास बर्‍याच प्रमाणात प्रदूषण कमी होईल.

व्यापार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करून पीक पद्धत चालते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात घट येऊन जमिनीची घडण ढासळते. ती टाळण्यासाठी पिकाची कीडनाशके, खते विक्री पिकाचे, शेतकर्‍याचे, औषधाचे नाव हा रिपोर्ट पाहूनच करावी त्यामुळे शेतकर्‍याची फसवणूक न होता मार्गी लागेल.
आजसुद्धा आपण जेवढे वातावरण प्रदूषण कमी करण्याबाबत प्रयत्न व खर्च करतो, त्याऐवजी दूषित औषधांच्या कंपन्या दुसर्‍या राज्यातून आणतो, त्या न आणणे व शेतकर्‍यास जैविक व सेंद्रीय गांडूळ खते मिळण्यासाठी कारखाने काढून वरील दूषित औद्योगिकीकरणावर बंदी घातल्यास बिघडणारी परिस्थिती पूर्वपदास येईल. संयुक्‍त खताच्या किंमती कमी झाल्यास उत्पादनात भर पडेल व जमिनीची सुपिकता काही अंशी टिकून राहील.

निकृष्ट बियाणांपासून देशाची अन्नउत्पादन क्षमता बर्‍याच अंशी कमी होते आहे. त्याची कारणे अशी आहेत- शेतकर्‍यांना पिकाविषयी सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती नसणे, अनुवंशिक अशुद्ध व निकृष्ट दर्जाची बियाणे, सुधारीत औजारे घेण्यास भांडवलाचा अभाव, मराठवाड्यात पाऊस अनिश्‍चित व कमी पडतो व जमीन हलक्या प्रतीची, शेतकर्‍यास बियाणे, जमीन, हंगाम व कीटकनाशक कोणते, कशासाठी व केव्हा किती प्रमाण, किती वापरावे याचे तंत्र अवगत नसणे, खत किती व ते कोणत्या पिकास केव्हा द्यावे हे माहीत नसणे.

जमीन 50 टक्के पडीत
या सर्व गोष्टींचे शासनाने नियोजन आखल्यास मराठवाड्याच्या शेतीत व उत्पादनात अनुकूल परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
दुर्दैव म्हणजे स्वातंत्र्याची 70 वर्षे होऊनही जमीन 50 टक्के पडीत व खराब आहे. दारिद्य्र रेषेची तुलना केल्यास निम्म्यापेक्षा जास्त लोक दारिद्य्ररेषेखाली आहेत. 30 टक्के ऐवजी 6 टक्केच जमीन वनाखाली असून काही भागातच जंगले उरली आहेत.
मराठवाड्यातील खेड्यांच्या विकासासाठी कृषिवर आधारित आणि संलग्‍न धंद्याचे जाळे सुरू करून पदार्थावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे केल्यास नाशवंत मालाला चांगला भाव मिळाल्याने गरिबी निर्मूलनाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही.
मराठवाड्यातील शेतकर्‍याला हिंमत देऊन पडीक जमिनीवर वनशेती, फळशेती, रेशमी उद्योगास शासनाने गांभीर्याने प्रेत्साहन देणेे गरजेचे आहे.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.