कूपनलिका (बोअरवेल) पुनर्भरण

0

पावसाचे पाणी कुपनालिकेत सोडणे म्हणजे कूपनलिका पुनर्भरण होण्यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी, पावसाचे वाहून जाणारे पाणी यांचा वापर करता येतो. कुपनलिकेचे पुनर्भरण केल्याने पाणी जमिनीत खोलवर मुरेल व ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेले होते, त्या जलस्तराचे पुनर्भरण होईल. परंतु कुपनलीकेचे पुनर्भरण करताना गाळ विरहित पाणीच विहिरीत सोडावे. यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करावा.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

कूपनलिका (बोअरवेल)पुनर्भरण करण्याची पध्दती:

कूपनलिका पुनर्भरण सयंत्रणा दोन भागात विभागली आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा आणि दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा.

१) शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारे वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे.

२) प्राथमिक गाळण यंत्रणेत 1 मीटर x 1 मीटर x 1 मीटरचा खड्डा तयार करून यात मोठे व छोटे दगड टाकावेत. या गाळण यंत्रणेतून तीन इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप मुख्य गाळण यंत्रणेत सोडावा.

३)प्राथमिक गाळण यंत्रणेमुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडी कचरा, तसेच काही प्रमाणात गाळ अडविण्यास मदत होईल. मुख्य गाळण यंत्रणेत कमी गाळाचे पाणी जाऊन मुख्य गाळण यंत्रणेची कार्यमान आयुष्य वाढविण्यास मदत होईल.


४) दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा. यामध्ये कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर व्यासाचा 2.5 मीटर खोल खड्डा करावा. त्यातील माती वर काढून घ्यावी. तसेच केसिंग पाईप पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा.

५) नंतर खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपला एक-दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूंनी चार-पाच मि.लि. व्यासाची छिद्रे पाडावीत.


६) या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.


७) त्यानंतर खालून 50 सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, त्यानंतर 10 सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड व त्यावर 30 सें.मी. उंचीपर्यंत मोठी वाळू व त्यावर 20 सें.मी. उंचीपर्यंत बारीक वाळूचे थर घ्यावे, यानंतर सिमेंट रिंग दोन मीटर व्यासाची ठेवून मुख्य गाळण यंत्रणेचे काम पूर्ण करावे. वरच्या भागात सिमेंट रिंग ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाजूची माती खड्ड्यात किंवा गाळण साहित्यावर पावसामुळे घसरून पडणार नाही. संपूर्ण यंत्रणा दीर्घकाळापर्यंत सुस्थितीत राहते.


८) अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.


पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी
1) ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.
2) पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.
3) ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी पुनर्भरणास वापरू नये.
4) औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये.
5) वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.