पक्षी शेतकर्यांचे मित्र
डॉ. संतोष पाटील यांची माहिती
भराडी / प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखण्यात, निसर्गात मोहकता निर्माण करन्यात, शेतकरीमित्र म्हणुन महत्वाचा वाटा असनारे पक्षी दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. पर्यावरणात कृत्रीम पणा आक्रमण करीत असून पक्षी वाचवाण्यासाठी सवार्ंनी काम करणे गरजेचे असल्याचे मत सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे सल्लागार डॉ. संतोष पाटील यांनी (दि.5) रोजी भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात आयोजित राष्ट्रिय पक्षीदिना निमित्त या पाखरांनो परत फिरारे, पर्यावरण संतुलनासाठी या विषयावर बोलताना केले.
सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान विविध उपक्रम माजी उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्या पुढाकाराने करत असते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतात 1200 तर महाराष्ट्रात 552 जातीचे पक्षी आढळतात. त्यापैकी सुमारे 20 टक्के पक्षी जाती धोक्याच्या श्रेणित आहेत. शिकारीसाठी शिकारी तसेच पक्षी अवयवाना मोठी किंमत मिळते म्हणुन तस्करी करिता पक्षी मारले जातात. मोबाईल मनोराच्या रेडिएशन, वृक्षतोड, पाण्याचे दुर्भिक्ष, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे व अंधश्रद्धेसह अनेक कारणामुळे पक्षी नष्ट होत चालले आहेत. म्हणुन विद्याथ्यार्ंनी, शिक्षकांनी शाळेत, घराजवळ जलपात्र व धान्य ठेवण्याचेही त्यांनी यावेळी सुचविले. तसेच संक्रातीच्या काळात पक्षांना ईजा करणारे, पतंग न उडवण्याचा सल्ला दिला. व गुलरमुक्त वातावरण पाहिजे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच सध्या जायकवाडी जलाशयात वास्तव्यास आलेल्या प्लेमिंगो, सायबेरियन कोच, यांसह परिसरात आढळणारे पक्षी त्यांचा आहार, त्यांच्या आवाजा विषयी माहिती दिली. व ते जगवण्याकरीता उपाय सुचविले. महाराष्ट्राचा राज्यपक्षी माळढोक नष्ट होत चालला असून तो वाचविण्याचे आवाहन करीत त्या पक्ष्यांची प्रतिमा माहितीसह विद्यालयाला सपुर्द केली. यावेळी पक्षी आकाराची विद्यार्थी साखळी विद्यार्थ्यांनी तयार करुण पक्षी वाचवण्याचा संदेश दिला. याप्रसंगी डॉ. राज सुर्यवंशी, सोमिनाथ गोरे, सतिष पांडव, गणेश खोमणे, विठ्ठल खोमणे, अमित धारकर, अजय बोराडे आदींसह विद्यालयाचे मुख्यध्यापक, शिक्षक उपस्थित होते.