तुळशीचे फायदे

1

तुळशीला भारतात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्येही ही तुळस अत्यंत गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुंच्या घरा घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. हिन्दू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट परिणामांपासून वाचवते. तुळशीतील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकास हवेहवेसे वाटते. तुळशीस टॉनिकही म्हटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. भारतात यास एक घरगूती औषधाचा भंडार मानले जाते. तुळसी याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. त्यामूळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो.

तुळशीचे काही महत्त्वाचे फायदे…

१. सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याच तुळशीची ताजी पाने चावून खाणे अथवा वाळलेल्या तुळशीच्या पानांचा चहा घेणे लाभकारक ठरते. खोकल्याच्या औषधांतही तुळशीचा वापर केलेला असतो.

२. दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जाते. पुरातन काळात भोजनानंतर तुळसपानांचा स्वाद मुखशुध्दीसाठी घेतला जाई. तोंडातील सूज व फोड तूळशीची पाने खाल्ल्याने बरे होतात. मुखाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते.

३. तुळशीत विषजन्य पदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे गुण असतात त्यामूळे या गुणांमुळे तूळसपानांचा उपयोग मुत्रपिंडातील खडयांवर होतो. पहाटे निर्जळी ४ ते ५ तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळसपाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही. लघवी गरम होत नाही. त्यामूळे मुत्रविसर्जनात वेदना कमी होण्यास फार लाभ मिळतो.

४. पाने चावून खाणे अथवा किडा चावलेल्या भागावर लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे किड्याचे विष बाहेर पडते.

५. तणाव निवळण्यातही तुळस गुणकारी ठरते. दिवसातून दोन वेळा तुळशीची किमान १२ पाने चावून खाल्ल्यास रक्त शुद्ध होते. तसेच मेंदू तल्लख बनतो.

६. जीवनसत्व ‘ए’ चे भरपूर प्रमाण असलेली तुळशीची पाने डोळ्यांच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरतात. तुळशीची पाने पाण्यात टाकून ठेवावी आणि रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी त्या पाण्याचे चेहरा धुतल्यास डोळ्यांना सूज येणे, इन्फेक्शन होणे, जळजळ होणे यापासून आराम मिळतो. डोळ्यांचा ताणही कमी करते. रोज दोन तीन पाने चावून खाल्ल्यास डोळ्याची नजर कमजोर होण्यापासून बचाव करता येतो. रात आंधळेपणासाठी तुळशीची रोपे लाभदायी ठर

७. चेहऱ्यावरील मुरूम किंवा पुरळ येण्यापासून सरंक्षण करण्यात तुळशीची पाने उपयोगी ठरतात. रक्त शुद्ध करून टॉक्सिनचे प्रमाण कमी करत असल्याने या समस्या दूर राहतात. तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरीयल तत्व असल्याने त्याचा तेल चंदनाच्या लेपाबरोबर चेहऱ्यावर लावाला. लिंबाच्या पानाच्या लेपाबरोबर मिश्रण करूनही चेहऱ्यावर लावता येतो. त्यामुळे चेहऱ्याची जळजळही कमी होते.

८. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.

९. कर्करोगातील आणि टयुमर मधील कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधींमध्ये तुळशीचा वापर होतो.

१०. फार डोके दुखणे (मायग्रेन), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते.

११. तुळशीमधील जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले एंटी ऑक्सीडेंटनी भरलेले असतात. त्यामूळे शरीरास टवटवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. पाण्यासोबत तुळसपानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था निटपणे कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.

वृषाली खडके

https://krushisamrat.com/advantages-of-clove/

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. Badisaufp

    […] तुळशीचे फायदे […]

Leave A Reply

Your email address will not be published.