- जमिनीच्या फुल जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकवून ठेवल्यामुळे टिकून राहते व पिकांच्या उत्पन्नात वाढ होते.
- जमिनीच्या निरनिराळ्या थरातील अन्नांशावर वाढणाऱ्या पिकांचा तसेच अन्नांशाची वेगवेगळ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांचा समावेश केल्यामुळे जमिनीत अन्नांशाचे संतुलन राखणेस मदत होते.
- पिकांच्या विविधतेमुळे बाजारातील प्रतीकुलभाव, प्रतिकूल हवामान आणि किडी व रोगांमुळे होणारे नुकसान यांच्यामुळे आर्थिक तोटा होण्याचा जो धोका असतो तो कमी होतो.
- पिके वेगवेगळ्या हंगामात तयार होत असल्यामुळे मजुरांचा तुटवडा भासत नाही व त्यांना एकसारखे काम मिळते.
- वर्षभर काही ना काही उत्पन्न मिळत राहते.
- तणे, किडी व रोगांचे आक्रमनास आळा बसतो.
- जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते.
- फेरपालटीमुळे शेतकरी व त्यांच्या जनावरांच्या गरजा भागवता येतात.
क्षारयुक्त पाण्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.
- जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल आणि काही प्रमाणात युक्त कार्बोनेटस असतील तर अशा पाण्यात अधूनमधून १५० ते २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट वापरावे.
- पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे.
- सेंद्रिय खतांचा वापर करावा.
- पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.
- पिकांची फेरपालट करावी.
- आच्छादकांचा वापर करावा उदा. ऊसाचे पाचट, पोलिथिन पेपर इ.
- पिकांची लागवड सरीच्या बगलेत करावी म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.
- अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.
- क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.
- शिफारशीपेक्षा ३५ टक्के अधिक नत्र पाणी अल्कधर्मी असल्यास दयावे.
- क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू) करडई, सुर्यफुल इ.
- हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढवावे.
अशा प्रकारे पाणी परीक्षण अहवालानुसार पीक लागवड, मशागत तंत्र व पाणी व्यवस्थापन केल्यास पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर तर होईलच परंतु जमिनीचे प्राकृतिक गुणधर्मावर कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम न होता जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवण्यास नक्कीच मदत होईल.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल