बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचा उपयोग शेतीसाठी तसेच शोभेच्या वास्तू बनवण्यासाटी केला जातो, अशा या बहुउपयोगी बांबू वनस्पती लागवड बद्दल जाणून घेऊ!
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
प्रजाती:
- अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत.
- यातील १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६० प्रजाती या लागवडीखाली आहेत.
- त्यात बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या २ जाती प्रमुख असून, त्या देशात सर्व ठिकाणी वाढतात.
- महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस,
कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या प्रजाती आहेत; तर कळक,
मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत.
मानवेल:
- हा प्रकार महाराष्ट्राच्या सगळ्या भागांत आढळतो.
- त्याची उंची ८ ते १६ मीटरपर्यंत, तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो.
- एक पेर ३० ते४५ सें.मी. लांबीचे असते.
- बुरुड काम करणारे टोपल्या, सुपे यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी या प्रकारचा बांबू वापरतात.
कटांग, काटस:
- या जातीचे बांबू १५ ते ३० मीटर उंच आणि ३ ते ७ सें.मी. व्यासाचे असतात.
- त्यांचे एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी याचा उपयोग होतो.
कोंड्या मेस:
- याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें.मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें.मी. एवढी असते.
- याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी,फर्निचर बनविण्यासाठी करतात.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
पिवळा बांबू:
- घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड.
चिवळी:
- याची उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी., तर पेर १५ ते ३० सें.मी. लांबीचे असते.
- टोपल्या व घरबांधणीसाठी या बांबूचा उपयोगकरतात.
जमीन व हवामान:–
- बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी
सुपीक आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी
जमीन असणे गरजेचे असते पाणथळ जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. क्षारपड, पानथळ जमिनी बांबूच्या लागवडीसाठी योग्य नाहीत. - बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते.
- तसेच कोरड्या हवामानातहीबांबू चांगला वाढतो. पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ८ ते २५अंश सेल्शिअस तापमान आणि सरासरी प्रति वर्षी७५० मि.मी. पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात करावी.
काढणी, लागवड व उपयोग या बद्दल माहिती पुढील भागात जाणून घेऊ !
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.