बांबूचा उपयोग शेती, घरबांधणी, खाद्य पदार्थ म्हणून तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण बांबूच्या प्रजाती व लागवडीस योग्य जमीन व हवामानाची माहिती घेतली. या भागात आपण बांबूची लागवड आणि विविध उपयोग याबद्दल जाणून घेऊ!
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
लागवड:
- बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते.
- त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते.
- यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबूतोडणीस अडचण होत नाही.
- सर्वसाधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते.
- याप्रमाणे लागवड केल्यास एक हेक्टर अंतरावर ४00 बांबूची रोपे बसतात.
- बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत ‘५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.
- यामुळे उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी , कृमी मरण्यास मदत होते.
- अशा या खोदलेल्या खडुयात पावसाळ्यापूर्वी माती भरावी.
- माती भरताना त्यामध्ये एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनियम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे.
- नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी.
- पिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून,अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.
काढणी:
- लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते.
- रोगराईपासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायदेशीर ठरते.
- बांबू तोडताना तो जमिनीलगत न तोडता, दुस-या व तिस-या पेन्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कु-हाडीने घाव घालून तोडावा.
- असे न केल्यास खोडमुळांच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूची खोडमुळेच मरतात.
- बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते.
- बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी.
- एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबूची काढणी करू नये,कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
उपयोग:–
बांबूचे जवळपास ५,००० उपयोग सांगितले जातात काही उपयोग खालीलप्रमाणे –
- पारंपारिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.
- शेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.
- घरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ.
- प्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.
- घरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.
- फर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.
- हस्तकाल व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तु, विविध आभुषणे, फ्रेन्स इ.
- व्यापार : चहाची खोकी, टोपल्याम आंबा पॅकींगसाठी पेट्या बनवण्यासाठी, पडदे, बासरी बनवणे, नॅपकिन्स, पॉलिहाऊस, कागद बनवणे,उदबत्ती इ.
- आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.
- औषधे : वंशलोशन, नारू रोगावर औषधांसाठी
- मृदा संधारण : जमिनीची धूप थांबविणेसाठी, जमिनीचा कस वाढविणेसाठी.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.