बहुगुणी वनस्पती जैवइंधन-जैट्रोफा

0

गतिमान विकासात प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची आवश्यकता असते. पाहिजे तेवढ्या प्रमाणात या इंधन ऊर्जेचा पुरवठा होत नाही. विकासासाठी इंधन ही अपरिहार्य बाब आहे. आपल्याला कोळशापासून आणि खनिज तेलापासून उर्जा मिळत असते.खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातं. पण त्याचा पुरवठा मर्यादित आहे. भविष्यात नक्कीच मर्यादा येणार आहेत, हे ओळखून सर्वजन पर्यायी इंधन स्रोताच्या शोधात आहे.

 

आपल्याकडे भविष्यात सौरउर्जा, पवनउर्जा, इथेनोल, बायोगैस कचरयापासून उर्जा, बायोडिझेल पासून उर्जा आणि समुद्राच्या पाण्यापासून उर्जा इ. उर्जांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये जैविक इंधनाचा पर्याय मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे.जैविक इंधन निर्मितीत महत्वाचावाटा आहे तो रानएरंड किंवा जैट्रोफा या झाडाचा.

प्राथमिक माहिती:-

 

जैट्रोफा जवळपास १७५ वनस्पतींचा समूह आहे ज्यात झाडे व झुडुपे आहेत. ह्याचे झुडप भारत, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि कॅरेबियन अश्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतात. हे एक मोठे झुडूप आहे जे अर्ध शुष्क क्षेत्रात उगवते.ह्याच्या झुडपा पासून २५-३०% तेल मिळते. ह्या तेलावर आपण कार चालवू शकतो तसेच जे अवशेष उरतात त्यापासून विजनर्मितीही होऊ शकते.जैट्रोफा एक अनावृष्टी रोधक सदाबहार झाड आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची उत्तम क्षमता ह्यात आहे.

 

जैट्रोफाची वैशिष्ठे :-

१) ह्याचेबीज स्वस्त आहेत.

२) बीजाततेलाची मात्रा खूप अधिक आहे ( जवळपास ३७% )

३) ह्यापासून मिळणाऱ्या तेलाचा ज्वल्नांक ( फ्लॅश पॉइंट ) अधिक असल्याने हे खूप सुरक्षित आहे.

४) १.०५ किलोग्राम जैट्रोफा तेलापासून १ किलोग्राम बायोडिझेल तयार होते.

५)जैट्रोफा तेल विना शुद्धीकरण हि इंधन म्हणून वापरता येते.

६) जाळल्यानंतर हे तेल धूरविरहित अग्नी तयार करते.

७) थोड्याच दिवसात फळे ( अवघ्या २ वर्षात) येतात.

८) सुपीक जमीन तसेच माळरानावर देखील उगवते.

९) कमी( २०० मि.मि ) तसेच अधिक पावसाच्या क्षेत्रात देखील उगवते.

१०) जिथं दुसर कुठलाच पिक येत नाही तिथ ह्याची लागवड करता येते.

११) ह्याच्या शेतीसाठी कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही.

१२) फळे तोडण्याच्या दृष्टीने झाडाची उंची असते.हाताने फळे तोडता येतात.

१३) फळे पावसाळा सुरु होण्याआधीच परिपक्व होतात त्यामुळे तोडणीस अडचण नाही.

१४) झाड५० वर्षापर्यंत फळे देते त्यामुळे वारंवार लागवड करावी लागत नाही.

१५) वेगाने वाढते व जास्त देखभालीची गरज नाही.

१६) ह्याला जनावर खात नाहीत आणि कीड हि लागत नाही.

 

जैट्रोफा चे उपयोग :-

१)जैट्रोफा चे जवळपास १६०० उपयोग शास्त्रसंमत आहेत.

२) जमिनीची धूप थांबविण्यास ह्याची झाडे उपयोगी ठरतात.

३)जैट्रोफाची मुळे जमिनीतून फोस्फोरस शोषून घेण्यास सक्षम आहेत– हा गुण आम्लधर्मी जमिनीसाठी फार उपयुक्त आहे.

४) आपल्या पूर्ण आयुष्यात जमिनीवर जी पानेपाडतो त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

५) तेल काढल्यानंतर जोगाळ उरतो तो उच्च दर्जाचा नत्राचा स्त्रोत आहे ज्याचाखत म्हणून वापर करता येतो. गुरांना प्रोटीनयुक्तखाद्य म्हणून देखील उपयोगी.

६)ग्लिसरीन देखील ह्याचा एक उप-पदार्थ आहे. ज्याचे अनेक उपयोग आहेत.

७) जनावर आणि किडे ह्याच्या नैसगिक गुणांमुळे ह्यापासून दूर राहतात म्हणून ह्याचा उपयोग फळबाग व शेताकरिता जैविक कुंपण म्हणून हि करता येतो.

 

ह्याच्या बीजांपासून जे तेल मिळते त्यामुळे :-

१) वाहनांसाठी बायोडिझेल बनविता येते.

२) घरगुती इंधन म्हणून वापरता येते.

३)ह्या तेलाचे इतर उपयोग- जलवायू संरक्षण, वार्निश, साबण, जैविक किटकनाशक ई.

 

जैट्रोफाचे औषधी उपयोग:-

१) ह्याचे खोड व फुल औषधी गुणधर्माचे आहेत.

२) ह्याची पाने घाव लागल्यावर ड्रेसिंग साठी कामी येतात.

३) ह्याशिवाय ह्यापासून चर्मरोग, कॅन्सर, मुळव्याध, लकवा, सर्पदंश, डास रोधकऔषधी तयार करता येतात.

४) ह्याच्याखोडाच्या सालीपासून गडद निळ्या रंगाचा डाय व मेण बनविता येते.

५) ह्याच्या मुळापासून पिवळ्या रंगाचा डाय तयार करतात.

६) ह्याची लाकडे सरपण म्हणून वापरता येतात.

 

जैट्रोफाचे सामाजिक महत्व :-

१)जैट्रोफा अक्षय उर्जेचे ( sustainable energy) एक प्रमुख साधन आहे.

२) भारतासारख्या देशात इंधन तुटवड्याला एक उत्तम पर्याय आहे.

३) ह्याच्या लागवडीसाठी कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही.

४)  ह्याच्या लागवडीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात.

५) कृषी पूरक व्यवसायांना गती मिळेल.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.