कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावश्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतातते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4 दिवसात हि उबवतात त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वाळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकळी तयार होते.
2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अळी ज्या मार्गाने कैरीमध्ये गेलेली असते तो मार्ग कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहिती पडत नाही की कैरीत अळी आहे तेआणि म्हणूनच या अळी ला कोणतेही किडनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी, ती जीवंत सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवसांनी अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून.
सेंद्री अळी वर उपाय
- अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात.
- अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किटनाशक फवारणी केली तर 80 ते 90% सेंद्री अळी चा बंदोबस्त करू शकतो. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या दोन्ही आमावस्या सांभाळा .
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.