अकोला, परभणी, चंद्रपूर मध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद …
आपल्याला जाणवत असलेली उन्हाची अतितीव्र लाट सोमवारी (ता. २९) महाराष्ट्रातील अकोला, चंद्रपूर, परभणी येथे देशातील सर्वोच्च ४७.२ अंश तापमानापर्यंत पोहचली. हे एप्रिल महिन्याचे आतापर्यंतचे सर्वकालीन उच्चांकी तापमान ठरले आहे. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही ४७.२ अंश तापमान होते. तसेच बुलडाणा येथेही आतापर्यंच्या सर्वोच्च ४४ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, बुलडाणा, मराठवाड्यातील परभणी येथे एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले आहे.उन्हाचा ताप वाढल्याने यंदा तापमानाचे नवनवीन उच्चांक नोंदविले जात आहे. अकोला येथे यापूर्वी २००९ मध्ये ४७.० अंश, यंदा दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूरमध्ये ४६.५ अंश, बुलडाणा ४३.३ अंश, तर परभणी ४५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. याशिवाय पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, बीड, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे उष्णतेची लाट कायमच आहे. आज (ता. ३०) हे चक्रीवादळ तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार असून, उद्या(ता. १) उत्तरेकडे ओडिशाच्या दिशेने सरकून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरात फोणी चक्रीवादळ तीव्र झाले असून, पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असलेल्या चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार, ओडिशामध्ये वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. किनाऱ्यालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
सोमवारी (ता.२९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४३.० (५.१), जळगाव ४५.४ (२.७), कोल्हापूर ३७.७ (०.७), महाबळेश्वर ३६.१ (४.४), मालेगाव ४४.२ (३.७), नाशिक ४२.८ (४.५), सांगली ४०.० (१.४), सातारा ४२.१ (५.४), सोलापूर ४४.३(३.५), अलिबाग ३३.२ (०.९), डहाणू ३५.७ (२.३), सांताक्रूझ ३५.५ (२.३), रत्नागिरी ३२.७ (०.१), औरंगाबाद ४३.६ (४.२), बीड ४५.१ (४.६), परभणी ४७.२ (५.७), नांदेड ४४.६ (२.५), उस्मानाबाद ४३.० (३.८), अकोला ४७.२ (५.२), अमरावती ४५.८ (३.७), बुलडाणा ४४.० (५.८), बह्मपुरी ४६.३ (४.६), चंद्रपूर ४७.२ (४.५), गोंदिया ४३.६ (२.१), नागपूर ४४.९ (२.९), वर्धा ४५.७ (३.९), यवतमाळ ४५.५(४.०).
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.