• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 25, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

मराठवाड्यातील शेती व शेतकरी

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
February 14, 2019
in शेती
0
मराठवाड्यातील शेती व शेतकरी
Share on FacebookShare on WhatsApp

मराठवाड्यातील शेती म्हणजे नद्यांच्या काठची काळी, कसदार, पाणी धरून ठेवणारी माती, बर्‍याच भागामध्ये मध्यम काळी जमीन, चांगल्या प्रकारे ज्वारी, कापूस, गळीत व कडधान्य उत्पादन करणारी आहे. मराठवाड्यातला 60 टक्के भाग हमखास पावसाच्या विभागात तर 40 टक्के भाग अवर्षण प्रवण भागामध्ये मोडला जातो. पाऊस चांगला पडला तर उदंड पीक नसता सर्व भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
पाण्याचे दुर्भिक्ष तर या विभागाच्या पाचवीलाच पूजले आहे. उन्हाळ्यात सर्व नद्या साधारणपणे कोरड्या पडतात. म्हणून हमखास सिंचनाखाली फक्‍त 11 टक्के जमीन व उरलेली जमीन कोरडवाहू. मराठवाड्यातील शेतीला निश्‍चितता नाही. म्हणूनच इथला शेतकरी कमी जोखमीची पिके घेतो. कमी भांडवलात, कमी जोखमीमुळे कमी उत्पादन हे ठरलेले सूत्र आहे. या चक्रात इथला सामान्य शेतकरी सापडला आहे.

विकास मनोवृत्तीवर अवलंबून
येथील उच्चभ्रू नागरिक आणि इतर लोकांना असावी तेवढी सामाजिक जाण कमी असल्याचे जाणवते. स्वतःच्याच विश्‍वात मग्‍न राहणारा, विकास म्हणजे काय व त्याला काय करावे लागते, किती धडपड करावी लागते, याचे चिंतन व मनन नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे. नोकरी करणारा इथला माणूस एकदा नोकरीत गेला की तो स्वतःच्या विश्‍वात गुरफटला जातो व समाजाच्या विकासाकडे त्याचे दुर्लक्ष होते. एकत्र येऊन या विभागाकरिता सातत्याने काही तरी करावे ही भावनाच अद्याप अपेक्षित प्रमाणात रुजली नाही. सामर्थ्य व विकास साधनसामग्रीच्या उपलब्धतेवर नाही तर माणसांच्या वृत्ती व मनोवृत्तीवर अवलंबून असतो. म्हणून प्रशासकांनी मराठवाड्यातील समस्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरू नये.
मराठवाड्यातील शेती शाश्‍वती नसलेली, उत्पादन व उत्पादकता कमी असलेली आधुनिक तंत्रज्ञानाची कमी जोड असणारी आहे. शेतकरी मिळेल त्या उत्पादनावर अल्पसंतुष्ट असणारा, कमी धडपड, नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाची कमी ओढ असणारा. येथील शेतकरी हा नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी उशिरा करणारा, या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे मागासलेली अल्प उत्पादक शेती.

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा फायदा तळागाळापर्यंतच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्यास खूप वाव आहे. कारण पिकांचे नवीन वाण, रासायनिक खते, कीटकनाशके, पाणी व यंत्रे वापरूनही त्यांच्या उत्पादनामध्ये फारशी भर पडलेली दिसत नाही. नवीन साधनसामग्री वापरण्याचे परिपूर्ण तंत्रच अद्याप शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविले नाही व शेतकर्‍यांनीही आत्मसात केलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठवाड्यातील आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक स्थिती अतिशय नाजूक व दुसर्‍या बाजूला नवीन ज्ञानाची, विज्ञानाची व तंत्रज्ञानाची ओळख कमी अशी स्थिती आहे.

मानसिकता अंधश्रद्धा जोपासणारी, सरंजामशाहीचा पगडाही
मराठवाड्यातील शेतकर्‍यांची मानसिकता अंधश्रद्धा जोपासणारी व सरंजामशाहीचा पगडा असलेली अद्यापही आहे. नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याबद्दल फक्‍त कुतूहल आहे. जिज्ञासा नाही. बर्‍याच गोष्टींच्या बाबतीत नकारात्मक भूमिका, जिद्द, महत्त्वाकांक्षेची उणीव असल्याने बहुतांशी शेतकरी निरुत्साही, प्रत्येक बाबतीत नकारात्मक भूमिका घेणारा आहे. त्यातच समाधान मानणारा, विकास स्वतः करावा लागतो व स्वतःच केला पाहिजे, याची जाण कमी असणारा व हे कुणी तरी दुसर्‍यांनी करावे अशी अपेक्षा करणारा असा आहे. शेतीच्या, गावाच्या आणि विभागाच्या विकासात तळमळीने भाग न घेणारा व स्थितीवादी मानसिक जडणघडणीचा तो आहे. कृषी तंत्रज्ञान आत्मसात करताना स्त्रियांचा सहभाग आपल्या भागात अत्यल्प आहे हे अविकासकतेचे लक्षण आहे.

एखाद्या शेतकर्‍याला कुणी चांगले नवीन तंत्रज्ञान, वाण दिले तर ते इतर शेतकर्‍यांना सांगावे अशी त्याची मनोवृत्ती नसते. एखादा शेतकरी नवीन वाण व तंत्रज्ञान पाहण्याकरिता त्या शेतकर्‍याच्या शेतीला भेट देण्याकरिता व विचारण्याकरिता गेला तर तुला हे जमणार नाही कारण हे वाण व तंत्रज्ञान फार महाग आहे, असे सांगण्याकडे त्याचा कल असतो. कुणी सांगितले की, एखाद्या शेतकर्‍याकडे नवीन वाण व नवीन तंत्रज्ञान आले आहे, ते पाहण्यास जाऊ तर हा शेतकरी म्हणेल त्यालाच काय सर्व माहिती आहे, आम्हीही दुसरीकडून घेऊ. अशी शेतकर्‍यांची मनोवृत्ती असल्यामुळे वाणाचा, तंत्रज्ञानाचा व विज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या विभागातील शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अल्प प्रमाणात केला.

समस्यांमुळेच उदासीनता
मराठवाड्यातील शेतकरी अनेक समस्यांनी जखडलेला आहे. म्हणून त्याच्यात ही उदासीनता आली आहे. दोष शेतकर्‍यांचा नाही परिस्थितीचा आहे. आजच्या शिक्षित व अशिक्षित दोन्ही प्रकारच्या तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. दुसरे काही करता येत नाही किंवा नोकरी मिळत नाही म्हणून शेती व्यवसाय तो स्वीकारतो. तरुणही शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून पिकाचा अभ्यास करीत नाही. शेतकर्‍यांच्या शेतीला किंवा कृषी विद्यापीठांना भेट देऊन अभ्यास करणे, चिंतन व मनन करून स्वतःच्या शेतीमध्ये काय करता येईल याचा अभ्यास हे सर्व तरुण शेतकरी करीत नाही.

पण काही तरुणांमध्ये आशेचा किरण दिसतो. कारण ते शेतीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून शेतीमध्ये नवीन विचार, दिशा घेऊन मराठवाड्यातील शेतीला नवीन दिशा देतील, त्याच्याकरिता जाणीवपूर्वक पावले उचलावी लागतील.

कृषी विद्यापीठामुळे कृषी क्षेत्राबद्दल आकर्षण आणि नवनवीन प्रयोग, संशोधनांना वाव मिळाला एवढा एक दिलासा सोडला तर कृषी क्षेत्रात फार काही करता आलेली नाही. शेतकर्‍यांमध्ये जागरूकता आणणे व त्यांच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनातून नेण्यामध्ये आपण कमी पडलो हे मान्यच करावे लागते. सरकारी यंत्रणेमध्ये अधिकारी वर्ग शेतकर्‍यांच्या समस्यांच्याबाबतीत फारसा उत्सुक नसतो. शेतकरी त्यांनी सांगितलेली बाब आत्मसात करत नाही किंवा अन्य कोणामुळे स्वीकारू शकत नाही.
शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक
कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण बहुतांशी शेतीमध्ये काम करण्यास किंवा शेती व्यवसाय पत्करण्यास उत्साही नाहीत. सामान्य शेतकर्‍यांचाही शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. म्हणून आज प्रत्येक शेतकरी आपल्या मुलांना शेती हा व्यवसाय स्वीकारण्यास संमती देत नाही. उलट नोकरी मिळावी म्हणून त्याला कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार असतात.

अशिक्षित, अर्धवट-सुशिक्षित किंवा ज्यांना काहीच जमत नाही असे लोक शेतीकडे गेल्यामुळे शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान जेवढे रुजावयास पाहिजे तेवढे रुजले नाही.

स्वतःचा श्‍वास स्वतःच घ्यावा लागतो हे जितके खरे आहे त्याचप्रमाणे येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील प्रश्‍न स्वतः पुढाकार घेऊन सोडवावे लागतील. सरकारनेही शेतीबद्दल उदार धोरणे ठेवणे आवश्यक आहे. इथला शेतकरी विज्ञानाभिमुख कसा होईल या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे.
या विभागात उसाचे क्षेत्र व कारखाने वाढले परंतु ऊस लागवडीत कुठल्याच प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांकडून वापरले जात नाही ना त्या बाबतीत कारखाने त्याकडे लक्ष देतात.

कापूस तर सामान्य शेतकर्‍यांचे नगदी पीक आहे. जोपर्यंत कापूस लागवडीचे तंत्र व उत्पादनात भरीव वाढ करण्यामध्ये मदत करणार्‍या घटकाविषयीचे शास्त्रोक्‍त ज्ञान शेतकर्‍यांना समजून सांगितले जाणार नाही, तोपर्यंत कापसाच्या उत्पादनामध्ये आमूलाग्र वाढ होणार नाही.
कितीही सुपीक भूमी, कितीही सुधारीत बियाणे असोत, पाणीच नसेल तर पीक येण्याची कसलीच निश्‍चितता नसते. त्याला आजच्या परिस्थितीत एकच उत्तर आहे व ते म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास.

वाटा विज्ञानाच्या नवलाईच्या
रुजविल्या पाहिजे रानावर
मराठवाडा विभागामध्ये शेतीपद्धत, पीकपद्धत, जमीन आणि व्यवसाय या गोष्टी लक्षात घेऊन नियोजनाची गरज आहे असे सांगितले जाते पण त्यासाठी कुणीच पुढाकार घेताना दिसत नाही. मराठवाड्याच्या मागासलेपणास येथील अविकसित शेतीकरिता सर्वच कमी अधिक प्रमाणात जबाबदार आहेेत. कदाचित म्हणूनच…
याच भूमीत जन्मलेले कवी ना.धों. महानोर म्हणतात….
इथल्या या मातीला
सुंदर आकाश
सुंदर निरंतर
लखलखता प्रकाश
वाटा विज्ञानाच्या नव्या नवलाईच्या
रुजविल्या पाहिजे आपणच रानावर.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Agriculture and Farmers of Marathwadaमराठवाड्यातील शेती व शेतकरी
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In