कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

पिकाच्या सद्याच्या अवस्थेप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्ला

मका-वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.6 टक्केव + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
रब्बी  ज्वारी-दाणे भरणे अवस्था
रब्बी ज्वारीवर माव्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 ईसी 200 मिली प्रती एकर फवारणी करावी.
हळद-काढणीपूर्व अवस्था
हळद पिकाच्या काढणीस साधारणतः फेब्रुवारी महिन्याात सुरूवात होते. काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
केळी-वाढीची अवस्था
केळी बागेस 50 ग्रॅम पोटॅश प्रती झाड देऊन बागेस पाणी द्यावे.
आंबा-मोहर ते फुलधारणा
आंबा फळबागेतील तुडतूड्यांच्या व्यवस्थापनासाठी फवारणी केली नसल्यास डायमिथोएट 30 टक्के 1320 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
द्राक्ष-घड वाढीची अवस्था
द्राक्ष बागेत 00:00:50 या खतमात्रेची 6 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला लागवड-
पाण्याची उपलब्धता असल्यास या आठवड्यात उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड करण्यास हरकत नाही.
फुलशेती-छाटणी अवस्था
छाटणी केलेल्या मोगरा बागेतील झाडाची अळी साफ करून जमिनीची मशागत करून अळ्यांची बांधणी करावी.
तुती रेशीम उद्योग-तुती लागवड करण्यासाठी शासनाने तुती बेणेऐवजी तुतीरोपांपासून लागवड करावी, असे निर्बंध घातले आहेत. शेतकर्‍यांना तुती बेणेपासून तुतीरोपवाटीका 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करता येईल आणि जून महिन्यामध्ये त्याची पुनर्लागवड करता येईल.
कृषी अभियांत्रिकी-
जमिनीच्या पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर (हार्ड पॅन) फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यक आहे. सबसॉयलरचा वापर 2 ते 3 वर्षांतून एकदा करावा. सबसॉयलर चालविण्यासाठी पावसाळ्यानंतर डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.