कापूस-वेचणी
कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पिकांचा पालापाचोळा, पर्हाट्यांची लवकरात लवकर विल्हेावाट लावावी.
तूर -शेंगा भरणे अवस्था
तूर पिकावरील शेंगा पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅनट्रानोलिप्रोल 18.5 टक्के 60 मिली किंवा क्लोरॅनट्रानोलिप्रोल 0.3 टक्केट + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 80 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
मका-वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झा 12.6 टक्केा + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
रब्बी ज्वारी-वाढीची अवस्था
रब्बी ज्वारी पिकावरील लष्कारी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झा 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
रब्बी भुईमूग-शेंगा वाढीची अवस्था
रब्बी भुईमूग पिकास पाणी व्यथवस्थापन करावे.
हळद-वाढीची अवस्था
हळद पिकात पोटॅशची कमतरता दिसून येत असल्यास 13:00:45 4 किलो प्रती एकर ड्रिपमधून दयावी. पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅमप्रती 10 लिटर पाण्याात मिसळून स्टीतकरसह फवारणी करावी.
केळी-घड निसवणी अवस्था
केळी बागेत तण व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. केळी पिकावरील सिगाटोका लिफस्पा्ट (करपा) रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनॅझोल 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा-मोहर ते फुलधारणा धरणे
आंबा फळबागेत मोहर धरणे चालू झाले असल्यास तुडतूडयांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के 1320 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. आंबा फळबागेस पाणी देऊ नये.
द्राक्ष-घड वाढीची अवस्था
द्राक्ष बागेत द्राक्षाचे घड 20 पीपीएम जिब्रॅलीक अॅसीडच्या द्रावणात बुडवून घ्यावेत.
भाजीपाला-वाढीची अवस्था
कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 300 पीपीएम 1 लिटर किंवा डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
फुलशेती- छाटणी अवस्था
मोगरा फुलपिकाची छाटणी केली असल्यास खत मात्रा दयावी.
तुती रेशीम उदयोग-
तुती बागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पट्टा पध्दत लागवडीमध्येच आच्छादन करावे. तसेच किटक संगोपन गृहात 20 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान येणार नाही याची काळजी घ्यावी.