गहू-पेरणी
बागायती गहू पिकाची पेरणी केली नसल्यास 15 डिसेंबरपूर्वी करून घ्यावी. उशिरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे, दोन ओळीतील अंतर 18 सेंमी ठेवावे.
हरभरा-वाढीची अवस्था
शेतामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव ओळखण्या करीता हेक्टरी 5 ते 6 कामगंध सापळे लावावेत. शेतामध्ये एकरी 2 कामगंध सापळे झाडाच्या उंचीपेक्षा 30 ते 45 सेमी उंच लावावेत. पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्या स याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 7 80 मिली प्रती एकर फवारणी करावी.
करडई-वाढीची अवस्था
करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
ऊस-वाढीची अवस्था
ऊस पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार फिप्रोनील 0.3 टक्केे 13 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावे किंवा जमिनीत ओल असताना मेटारायझियम अॅनोसोप्लीथ जैविक बुरशी 4 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावी.
संत्रा किंवा मोसंबी-वाढीची अवस्था
संत्रा किंवा मोसंबी फळबागेतील तणनियंत्रण करावे. वाढ न झालेले व रोगग्रस्त फळे काढून घ्यावीत. बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
डाळिंब-वाढीची अवस्था
डाळिंब बागेत फळांची प्रत खालावू नये म्हणून फळांना बटर पेपर लावावेत. बागेस ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
चिकू-वाढीची अवस्था
चिकू बागेस पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बागेत झाडाभोवती आच्छादन करावे.
फुल शेती-वाढीची अवस्था
गुलाब पिकावरील कळ्या खाणार्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
भाजीपाला -वाढीची अवस्था
कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 300 पीपीएम 1 लीटर किंवा डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
चारा पिके-वाढीची अवस्था
गवतवर्गीय चारा पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावे.