विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना सरकारला पुन्हा शेतकर्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे. ठाण्याहून बुधवारी निघालेले हजारो शेतकरी मुंबईत आझाद मैदानात गुरूवारी धडक देणार आहेत. ङ्गलोकसंघर्षफच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.कर्जमाफी, दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या मागरण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानात ठिय्या देण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला आहे.
शेतकरी-आदिवासींचे विधान भवनावर उलगुलान
ठाणे / प्रतिनिधी
आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईत मंत्रालयावर लोकसंघर्ष मोर्चा घेऊन धडकणार आहेत. हजारोंच्या संख्येत आदिवासी शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले असून या मोर्चाला सकाळी दहा च्या सुमारास ठाण्यातून सुरुवात झाली आहे.
आंदोलक आपल्या न्याय मागण्यासाठी ठाणे ते आझाद मैदान असे 45 किमी अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडकणार आहेत. आनंद दिघे प्रवेशद्वार येथील जुना चेकपोस्ट नाका येथून हा मोर्चा निघाला आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जे. कोळसेपाटील, पाणीवाले बाबा राजेंद्र सिंघ, बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम, काका दोधडे हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात राष्ट्र सेवादल, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मदत करत आहेत.
आनंद दिघे प्रवेशद्वार (जकात नाका, मुलुंड ईस्ट) वरून सकाळी 10 ला निघाला. त्यानंतर हा मोर्चा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेमार्गे सोमय्या मैदान येथे 6 वाजेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर या ठिकाणी सभा घेऊन मोर्चेकरी येथेच मुक्काम करतील. 22 तारखेला सोमय्या मैदानातून पहाटे मोर्चा पुन्हा मार्गस्थ होणार आहे. पुढे भायखळा जे. जे. फ्लायओव्हर मार्गे आझाद मैदान येथे दाखल झाल्यानंतर मोर्चेकर्यांची सभा होणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उठायचे नाही, या निर्धाराने आम्ही लढण्याचे ठरवले असल्याची माहिती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख नेतृत्वाखाली व श्रमिक एल्गार विदर्भ व लोकशासन आंदोलन, पश्चिम महाराष्ट्र या मोर्च्यात सहभागी आहेत.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!