आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पाहिले मी माझ्या घरच एक दृश्य.

0

खूळ लागलं बापाला , स्वतः कानफटात मारून घेतोय
फोटो कड बघून माझ्या ,स्वतःलाच फार शिव्या देतो।

केस सोडून फिरते आई, वेडी झाली म्हणते गाव
ती कोण विचारलं की , माझंच सांगते म्हणे नाव.

बायकोकडे माझ्या बघवत नाही उदास आणि निस्तेज झाला चेहरा तीचा.
खळखळून हसणारा चेहरा तिचा पार गायब झाला होता .

तस कारण मोठं न्हवत माझ्या त्या मरण्याच
मलाच न्हवत भान तेंव्हा , असं काही करण्याचं.

रेल्वे खाली झोपलो, तुकडे झाले  क्षणाला
घरचे म्हणतात गोळा करून आणलं तरी कुणाला

पाहून हे सार  पुन्हा मी मरत  आहे.

चिमुकली  पिलं माझी हल्ली फार झुरत आहे.
ईकडून तिकडे घर भर पळतांना दिसत नाहीत

आत्मा नुसता भरकटतोय परत येता हि येत नाही
त्या बापाची माफी घ्यायला ,पुन्हा संधी हि देव देत नाहि.

मी एकदाच मेलो पण घरचे रोज मरत आहेत
माझ्या फोटो समोर बसून विनवण्या करत आहे.

चुकला माझं निर्णय देवा माफी एकदा देशील का
पुन्हा एक शरीर देऊन  ,माझ्या घरी मला नेशील का

बापाला बिलगून रडावं म्हणतो
आईच्या पायात पडाव  म्हणतो
आयुष्याला न घाबरता
 देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो
देवा पुन्हा एकदा  घडावं म्हणतो

महत्वाची सूचना :- स्त्रोत : सोशल मिडिया…..

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.