भाजीपाला, कंद व शेंगभाज्या यावर पडणारी कीड व रोग, त्यांच्याकडून होणारी हानी, कोणत्या भाजी प्रकाराला कोणत्या कीडीचा, रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो व त्यावर कोणती उपाययोजना करावी याची माहिती पुढे दिली आहे.
परसबाग असो वा टेरेस गार्डन किंवा व्यावसायिक शेती, त्यातील पिकांना, भाजीपाल्याला रोगराई येते. अशा रोगराईचा प्रकार व त्यापासून संरक्षण याची माहिती असावी लागते. रोगराई व त्यावरील औषधे, कीटकनाशके यांची माहिती असणाराच यशस्वी भाजी उत्पादक होतो.
बटाट्याची कीड ः-
1) बटाट्याच्या पानांवर मावा व सफेदी – या दोन्ही किडी बटाट्याच्या रोपट्यातील जीवनरस शोषत राहतात. रोपटे त्यामुळे कोमेजते, निर्जीव होते. या रोगाचे जीवाणू इतर रोपांवर हल्ला करतात व पानांच्या मागे पांढरी साय दिसू लागते.
उपाय – वरील कीड पडल्यास मॅटासिस्टॉक या कीटकनाशकाचा 0.15 टक्के पाण्यात मिसळून द्रावण करावे व ते शेतात शिंपडावे.
2) एपिलॅकना बिटल- ही कीटक पाने खातो. जोपर्यंत पान खाऊन होत नाही तोपर्यंत पान सोडत नाही.
उपाय – या किडीच्या नाशाकरिता सेव्हिनची धुरळणी पानांवर करावी. प्रति हेक्टरी 20 ते 25 किलोग्रॅम सेव्हिन बटाट्याच्या शेतात उधळावे लागते.
3) कुतरा कीटक- हा कीटक दिवसभर जमिनीतील फटीत लपून राहतो. दिवसा अजिबात दिसत नाही. रात्रीच्यावेळी हा आलप्या सोंडेने पाने खाऊ लागतो व बटाट्याच्या पानांची/ पिकाची नासाडी करतो.
उपाय- कुतरा (कुरतडणारा) कीटकाचा बंदोबस्त करण्याची तयारी आधीच करावी लागते. बटत्तटे पेरण्यापूर्वीच शेताच्या मातीत एल्डॅक्सची पावडर (प्रति हेक्टरी 35 ते 40 किलोग्रॉम) मिसळावी. शेत नांगरत असतानाच एल्डॅक्स मातीत मिसळणे सोपे असते.
टॉमॅटोची कीड ः-
टोमॅटोच्या पिकाला चार प्रकारची कीड लागते. जागरुक शेतकरी यांचा बंदोबस्त करण्यात यशस्वी होतो आणि भरपूर सुदृढ पीक मिळवतो.
1 ) मावा कीड- ही कीड टोमॅटोच्या पानांची नासाडी करते. पानातील जीवनरस शोषून घेते व पाने निर्जीव होतात. यामुळे रोगट रोपटी तांबूस दिसू लागतात.
उपाय- एक बादली पाण्यात 0.15 टक्के मेटासिस्टॉक टाकून त्याचे द्रावण तयार करावे व ते टोमॅटोच्या पानांवर शिंपडावे. काही कृषितज्ज्ञ मेटासिस्टॉक ऐवजी गाडोंना 0.1 टक्का पाण्यात टाकून द्रावण तयार करावे व ते पानांवर शिंपडावे असे सांगतात. ज्याला जे सुलभ वाटेल ते द्रावण तो वापरतो.
2) कुतरा कीटक- बटाट्याप्रमाणे नुकसान करते व उपायही बटाटा पिकाप्रमाणे करावा.
3) पांढरी माशी- ही माशी टोमॅटोच्या पानांतील जीवनरस शोषते तसेच इतर रोगराईला सहायक होते. रोगप्रसार करते.
उपाय – एक बादली पाण्यात 0.15 टक्के मेटासिस्टॉक घालून ते द्रावण पानांवर शिंपडावे, त्यामुळे पिकाचे रक्षण होते.
4) फळ छेदक- ही हिरव्या रंगाची कीड आपल्या सोंडेने टॉमॅटोचे फळ छेदत राहते. साहजिकच फळ रोगट बनते व पिकाची नासाडी होते.
उपाय- या फळ छेदक किडीपासून टॉमॅटोचे संरक्षण करण्यासाठी 0.2 टक्के श्रायोडॉनचे द्रावण पिकावर शिंपडावे.
फ्लॉवरची कीड ः-
फ्लॉवरला तीन प्रकारची कीड लागते. याची माहिती पुढील प्रमाणे-
1) सोंडी – या किडीच्या पाठीवर पिवळ्या रंगाच्या रेषा असतात. ही कीड पानेखाते व फ्लॉवरच्या गड्ड्याला हानी पोहोचवते.
उपाय- 0.2 टक्के थायोडॉन कीटकनाशकाचे द्रावण तयार करून पिकावर फवाराचे म्हणजे कीडीचा नायनाट होईल.
2) बगराड कीड- या किडीच्या पाठीवर पिवळे, लाल व काळे ठिपके दिसतात. या किडीचा परिवार पानांवर हल्ला करून पानांतील जीवनरस शोषतात. यामुळे फ्लॉवरची वाढ खुंटते.
उपाय- सेव्हिन 0.2 टक्के पाण्यात मिसहून त्याचे द्रावण पिकावर शिंपडावे. पिकाचे रक्षण होईल.
3) मावा कीड- ही कीड सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे नुकसान करत असते. ही कीड पानांवर दिसते. याच्या झुंडी मोठ्या प्रमाणात असतात. हे हिरव्या रंगाचे असतात.
उपाय – मावा (माहू) किडीचा नायनाट करण्यासाठी मेटासिस्टॉक 0.15 टक्के वापर करून त्याचे द्रावण पिकावर शिंपडावे.
वांग्याची कीड ः-
वांग्याच्या रोपांची वाढ थांबवणारी कीड शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान करते. त्यामुळे सतर्क राहावे लागते.
1) एपिलॅकना बिटल – ही कीड वांग्याच्या रोपट्याची पाने खाऊन वाढते आणि मोठे नुकसान करते.
उपाय- सेव्हिन कीटकनाशक पावडर पानांवर उधळावी/ धुरळणी करावी. प्रत्येक हेक्टरी 20 ते 25 किलो ग्रॅम सेव्हिन वापरावे.
2) लास्सी मावा कीड- वांग्याच्या संपूर्ण रोपट्यावर ही दिसते. ही कीड रोपट्याचा जीवनरस शोषून घेत असते. यामुळे रोपट्यांची वाढ खुंटते.फळ बनण्याच्या प्रक्रियेवर या कीडीचा परिणाम होतो.
उपाय – 0.15 मेआसिस्टॉकचे द्रावण पिकावर शिंपडावे म्हणजे या कीडीचा बंदोबस्त होईल.
3) फळे पोखरणारी कीड- ही कीड वांग्याची फळे बाधित करते. ही कीड फिकट गुलाबी रंगाची असते व त्याला सोंड असते. वांग्याची फळे लहान असतानाच त्यांच्यावर या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड कोवळी पाने व खोड यांचेही नुकसान करते. त्यामुळे रोपट्याची वाढ खुंटते. या किडीने वांगी पोखरली , कि फळे खाण्यालायक राहत नाहीत.
उपाय- दोन प्रकारचे उपाय योजून फळे पोखरणार्या किडीचा नायनाट करता येतो. 1) सेव्हिन कीटकनाशकाचा 0.2 टक्के मिश्रणाचे द्रावण पिकावर शिंपडावे.
मिरचीवरील कीड ः- मिरची पिकावर मुख्यतः एकच कीड पडते त्याची माहिती
1 ) पाने पोखरणारी (झुनगा) कीड- मिरचीचे रोपटे वाढत असतानाच त्याच्या कोवळ्या पानावर ही कीड हल्ला करते. ही कीड सूक्ष्म असल्याने पानाच्या गाभ्यातून फिरत जीवनरस शोषत राहते. यामुळे पाने कोमेजून वाळतात. साहजिकच रोपट्याची वाढ खुंटते.
उपाय- या किडीपासून पीक वाचवायचे असेल तर मेटासिस्टॉक कीडनाशकाचे 0.15 टक्के द्रावण पिकावर फवारावे/शिंपडावे. पुन्हा काही दिवसांनी हा प्रयोग करावा.
भेंडीची कीड ः- भेंडीला तीन प्रकारच्या किडीचा धोका असतो.यामुळे भेंडीची पाने व फळे धोक्यात येतात. त्यांची वाढ खुंटते.
1) लस्सी (मावा) कीड – या किडीला जेसिड असेही म्हणतात. ही कीड पानातील जीवनरस शोषत राहते. यामुळे भेंडीचे पीक पिवळे पडू लागते.परिणामी रोपावर फळधारणा कमी होते.
उपाय- मेटासिस्टॉक या कीटकनाशकाचे 0.15 चे द्रावण तयार करून पिकावर फवारावे/शिंपडावे. प्रत्येक पिकावर ही कीड आढळते.
2) माहू – ही कीड सुद्धा पानांमधील जीवनरस शोषत असते. यामुळे भेंडीचे रोपटे मलूल पडते.
उपाय – या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेटासिस्टॉक 0.15 चे द्रावण पिकावर शिंपडावे.
3) फळे पोखरणारी कीड- ही एकप्रकारची अळी असून ती मातकट रंगाची असते. पाठीवर पिवळे ठिपके असतात. रोपटी लहान असतानाच याचा फैलाव होतो. रोपट्यांचा कोवळा भाग याला बळी पडतो. ही भेंडफळाचे सुद्धा नुकसान करते. फळ- पाने पोखरण्यासाठीयाला सोंड असते.
उपाय- थायोडॉन या कीटकनाशकाचे 0.2 टक्के द्रावण पिकावर शिंपडावे.
कांद्यावरील कीड ः-
कांदा पिकाला एकाच किडीपासून धोका असतो. त्यापासून बचाव करून कांद्याचे पीक भरघोस घेता येते.
1) झुनगा कीड- ही कीड कांद्याच्या पातीचा चट्टामट्टा करत राहते. पानांतील रस शोषून भूमिगत कांद्याची वाढ थांबवते.
उपाय- या किडीच्या निर्मूलनासाठी मेटासिस्टॉक्स 0.15 चे द्रावण कांद्याच्या पातीवर शिंपडावे.
भोपळ्यावरील कीड ः-
भोजपळ्याच्या वेलीला दोन प्रकारची कीड हानिकारक असते.
1) भोपळ्याची माशी- माशी किडीचा नर भोपळ्याचे नुकसान करत नाही. परंतु मादी भोपळ्याची साल पोखरून त्यात अंडी घालते. या अंड्यांचे फलन होऊन त्यातून कीड निर्माण होते व हे लहान किडे फळाचे नुकसान करतात. त्यातील गर खाऊ लागतात. फळ वरून ठीकठाक दिसते, पण आतून सडते.
उपाय- सेव्हिन या कीटकनाशकाचे द्रावण 0.2 टक्के तयार करून ते वेलीवर फवारावे. पुन्हा माशी आढळल्यास15 दिवसांनी सेव्हिनचे द्रावण शिंपडावे/ फवारावे.
2) लाल कीड-हे लाल चमकदार रंगाचे लांबट असे कीटक आहेत. हे भोपळ्याच्या फळाला छिद्र पाडतात. या कीटकाची पिल्ले तर भोपळ्याच्या वेलीच्या मुळाला छिद्रे पाडू लागतात. यामुळे भोपळ्याचे संपूर्ण पीक धोक्यात येते.
उपाय- या लाल किडीचा बंदोबस्त करण्यासाठी सेव्हिन पावडरची धुरळणी करवी. हेक्टरी 12 ते 15 किलोग्रॉम सेव्हिन पावडर वापरावी.
काकडी, दोडका, दुधी भोपळ्यावरील कीड –
या फळभाज्यांना व त्यांच्या वेलींना भोपळ्यावरील किडीचाच प्रादुर्भाव होऊन वेल व फळांचे नुकसान होत असते. यासाठी भोपळ्यावरील किडीसाठी जी औषधे योजली आहेत तीच वापरावीत.
*3) साठवणुकीमध्ये बियाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक*
बियाणे हे जिवंत असून त्याची उगवणक्षमता ठराविक काळापर्यंत जास्त राहते, नंतर ती कमी होेते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बियाणे काढणीपासून साठवणुकीपर्यंत किंवा बियाणाच्या पुढील वापरापर्यंत सुस्थितीत ठेवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेतल्यास बियाण्याचा र्हास होण्याच्या प्रक्रियेचा कालावधी लांबवू शकतो. म्हणजेच आवश्यक त्या गुणवत्तेसह आपण बियाणे जास्त काळ साठवू शकतो. त्यासाठी खालील बाबींवर कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.
1. बियाण्याची सुरुवातीची उगवणक्षमता
सुरूवातीची उगवण शक्ती जास्त असलेले बियाणे, साठवणुकीमध्ये सुरुवातीची उगवण शक्ती कमी असलेल्या बियाण्यापेक्षा अगदी प्रतिकूल परिस्थितीतही उगवण शक्ती बराच काळ टिकवून ठेवते. सुरुवातीला उगवण शक्ती कमी असलेले किंवा रोग, कीडग्रस्त किंवा इजा झालेले बियाणे साठवणुकीमध्ये लवकर खराब होते व ते काही महिन्यापर्यंतच टिकते.
2. बियाण्याची आर्द्रता
बियाण्यातील आर्द्रता ही साठवणुकीत बियाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. साठवणुकीमध्ये पीक वाणानुसार बियाण्यातील सुरक्षित पातळीवरील आर्द्रतेचे प्रमाण किती असावे हे संशोधनाअंती ठरवलेले आहे. खालील आकडेवारीवरून बियाण्यातील आर्द्रतेनुसार त्याचे साठवणुकीतील आयुष्य किती आहे हे लक्षात येते.
सर्वसाधारणपणे बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 1 टक्के ने कमी केल्यास साठवणुकीचा कालावधी दुपटीने वाढू शकतो.
3. तापमान
बियाण्यातील आर्द्रता व साठवणुकीचे तापमान हे बियाण्याची साठवणुकीतील गुणवत्तेवर परिणाम करते. सर्वसामान्यपणे जास्त तापमानात बियाण्याचा र्हास लवकर होतो म्हणून थंड तापमानात (4 ते 5सें.) बियाणे साठवल्यास त्याची गुणवत्ता जास्त काळ टिकून राहते.
4. बियाण्याची भौतिक स्थिथी
काढणी, मळणी, प्रक्रिया, वाहतूक, हाताळणी दरम्यान बियाण्यास इजा झाल्यास असे बियाणे साठवणुकीत लवकर खराब होते. बीजोत्पादन दरम्यानचे हवामान, पाण्याचा ताण, तापमानातील बदल, कीड व रोग यांचा प्रादुर्भाव इत्यादी प्रभाव असलेले बियाणे साठवणुकीत जास्त काळ चांगले राहत नाही. योग्य वेळी काढणी केलेले, काळजीपूर्वक हाताळलेल्या बियाण्याची गुणवत्ता साठवणुकीत जास्त काळ टिकून राहते. काढणीपर्यंत व काढणीनंतरच्या परिस्थितीवर बियाणे साठवणे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. अनुकूल वातावरणात तयार केलेले व काळजीपूर्वक हाताळणी व योग्य प्रक्रिया केलेले बियाणे साठवणुकीत जास्त काळ चांगले राहते.
साठवणुकीची गरज
कृषि उत्पादनांचे काढणीनंतरचे नुकसान साधारपणे 10 टक्के पर्यंत होते. त्यापैकी 6 ते 7 टक्के नुकसान साठवणुकीतील रोग, कीड, वाहतूक, मळणी, आर्द्रता, तापमान आणि प्रतिकूल वातावरणामुळे होते. या घटकांचा बियाण्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये म्हणून 1962 मध्ये वेअरहाऊसिंग कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली. बियाण्याची काढणीनंतर पुढील हंगामात पेरणी करेपर्यंत किंवा विक्री होईपर्यंत साठवण करावी लागते. साठवणीच्या काळात बियाण्याची उगवण शक्ती व जोम कमी होत असतो. ही प्रक्रिया आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही; परंतु अनुकूल वातावरणात बियाण्याची साठवण करून ती कमी करू शकतो म्हणजेच बियाण्याचा र्हास होण्याचा कालावधी वाढवू शकतो.
बियाण्याची साठवण किती काळ करावयाची आहे, त्यानुसार त्याचे तीन प्रकार पडतात.
* कमी कालावधीची साठवण : यामध्ये बियाणे काढणीपासून पुढील हंगामात पेरणी करेपर्यंत साठवण केली जाते. हा काळ सर्वसाधारणपणे 6 ते 8 महिन्यांचा असतो.
* मध्यम कालावधीची साठवण : काही वेळेस उत्पादित केलेले बियाणे पुढील हंगामात पेरले नाही किंवा त्याची विक्री झाली नाही तर सदर शिल्लक राहिलेल्या बियाण्याचे नुतनीकरण करून त्याची साठवण केली जाते. हा कालावधी साधारणत: 12 ते 16 महिन्यांचा अशतो.
* दीर्घकाळ कालावधीसाठी साठवण : जनुके प्रजाती, केंद्रक बियाणे, बीजपरिक्षण प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या बियाण्याचे नमुने कायदेशीर बाबीसाठी ठेवणे आवश्यक असते. अशा बियाण्याचा साठवणुकीचा काळ सर्वसाधारणपणे 5 ते 20 वर्षांपर्यंत असतो. अर्थातच अशा प्रकारे साठवण करावयाच्या बियाण्याची, योग्य वेळी साठवण करून बियाण्याच्या आर्द्रतेची वेळोवेळी तपासणी करून साठवणुकीमध्ये आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.
साठवणगृहाचे प्रकार
बियाणे साठवण गृहाचे प्रकार हे, किती व कोणत्या प्रकारचे बियाणे, किती कालावधीसाठी साठवण करावयाची आहे व तेथील हवामान या बाबींवर ठरवले जाते. पारंपारिक पद्धतीमध्ये मातीचे भांडे, बांबूच्या विणलेल्या कणगी, जमिनीमध्ये खड्डा करून ज्यूटच्या बॅगांमध्ये बियाण्याची साठवण केली जाते. परंतु अशा साठवणुकीमध्ये बियाण्याची गुणवत्ता जास्त काळ टिकवून ठेवली जात नाही. त्यासाठी आधुनिक पद्धतीची शीतगृहे किंवा वेअरहाऊसमध्ये साठवण केल्यास बियाण्याची गुणवत्ता जास्त काळापर्यंत राखली जाऊ शकते.
बियाणे साठवणीसाठी कंटेनर हे दोन प्रकारचे असतात. कंटेनर आर्द्रतावाहक व आर्द्रतारोधक. यापैकी आर्द्रतारोधक कंटेनर वापरल्याने बाहेरील वातावरणातील बदलांचा फारसा परिणाम होत नाही. अशा कंटेनरमध्ये साठवलेल्या बियाण्याचा ओलावा वातावरणातील आर्द्रतेमुळे वाढत नाही. त्यामुळे त्याची उगवणक्षमता व एकूणच बियाण्याची गुणवत्ता जास्त काळ टिकून राहते. त्यासाठी ज्या शेतकर्यांना पुढील हंगामात पेरणीसाठी स्वत:चे बियाणे वापरावयाचे आहे, त्यांनी किती बियाणे लागेल तेवढेच बियाणे चांगले वाळवून, त्याला बीजप्रक्रिया करून पॉलिलाईन बॅग किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये साठवणूक करावी व सीलबंद करून ठेवावे. त्यामुळे साठवणीमध्ये बियाणे जास्त काळ टिकून राहते.