संवर्धन न करण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
औरंगाबाद / प्रतिनिधी
शेततळ्यात, पाझर तलावत मत्स्य तळ्यात, शासनाच्या पाटबंधारे, लघुपाटबंधारे तलावात प्रतिबंधित असलेल्या आफ्रिकन मांगूर व त्याच्या प्रजाती, बिग हेड, तिलापिया माशांचे संवर्धन करण्यात येऊ नये, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
तिलापिया जातीच्या माशांच्या संवर्धनावर बंदी आहे. या मासळीच्या गिफ्ट (ॠशपशींळलश्रू र्खािीेींशव ऋरीाशव ढळश्ररळिर) या प्रजातीचे फक्त बंधिस्त तलावात संवर्धन शासनाच्या मंजुरीने करण्याची परवानगी आहे. आफ्रिकन मांगूर, बिग हेड, तिलापिया या जातीचे व त्यांच्या प्रजातीचे संवर्धन मासेमार समाजास हानिकारक आहेत. या मासळीच्या खाण्यामुळे अल्सर सदृष्य आजार होण्याची शक्यता असते. या मासळीला अन्न म्हणून देण्यात येणारे पदार्थही मानवाच्या आरोग्यास हानिकारक आहेत. शिवाय या मासळीच्या संवर्धनाने तलावाचे प्रदूषणही होत आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो आहे. तरी अशा मासळीचे संवर्धन जिल्ह्यात कोठे होत असल्यास त्याची तक्रार या कार्यालयात करावी. त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कास्तकारांनी या मासळीचे संवर्धन केलेले असल्यास संपूर्ण मासळीसाठा त्वरीत नष्ट करावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.