पावसाचा खंड पडताच अकोला जिल्ह्यात पिकांसाठी तुषार सिंचनाचा अवलंब

0

पावसाने दडी मारताच पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. पिकांना पाण्याची हि ओढताण सहन होणार नसल्याने अकोला जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरु केला आहे.

आजवर जिल्ह्यात असमतोल स्वरुपात पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरण्या सुद्धा मागे-पुढे झाल्या आहेत. सुरुवातीच्याटप्प्यातपेरणी केलेल्यांची पिके साधली आहेत.मात्र आता अनेक भागात १५ दिवस झाले पाऊसच पडलेला नाही. ताशीलागलेल्या पिकांमध्ये सध्या आंतरमशागत, तणनाशके फवारणी, निंदन आदी कामे जोमाने सुरु आहेत. मात्र पावसाचा ताण पिकांवर पडणे सुरु झाले आहे. दुपारच्या सुमारास पिके कोमेजलेली दिसून येतात.याचा फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन सुरु केले आहे.

जिल्ह्यात आजवर सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मुर्तीजापूर तालुक्यात तर पेरण्या सुद्धा झालेल्या नाहीत. जिल्ह्यात अद्यापही ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. आता पावसात खंड पडला असून भागात आणखी ४ ते ५ दिवस पाऊस उघडीप घेऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. असे झाल्यास पावसाचा हा खंड १५ दिवसांवर पोहचू शकतो. अशावेळी उगवलेली पिके, तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके अडचणीत सापडू शकतात. यासाठी शेतकऱ्यांची आता लगबग वाढली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनाचे काम हाती घेतले आहे. 

This image has an empty alt attribute; its file name is Strip.jpg

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.