पिकांच्या सद्याच्या अवस्थप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्‍ला

0

गहु-वाढीची अवस्था
नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रती हेक्टरी देऊन पिकास पाणी द्यावे.

हरभरा-वाढीची अवस्था
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्था पनासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 80 ग्रॅम प्रती एकर फवारणी करावी.

करडई-वाढीची अवस्था
करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्था पनासाठी डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.

ऊस-वाढीची अवस्था
ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या ऊस पिकास 40 किलो नत्र प्रती हेक्टरी देऊन पिकास पाणी द्यावे.

संत्रा/मोसंबी-वाढीची अवस्था
संत्रा / मोसंबी फळबागेत सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के 3 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25 टक्के 2 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब-काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या डाळिंब फळांची काढणी करून प्रतवारी करावी व विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविण्यात यावे.

चिकू-काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

फुल शेती-वाढीची अवस्था
गुलाब पिकावरील कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

भाजीपाला -वाढीची अवस्था
कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 300 पीपीएम 1 लिटर किंवा डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे. काकडीवर्गीय भाजीपाला पिकावरील केवडा (डाऊनी मेल्डी्यु) व भुरी (पावडरी मेल्डीेयु) रोगाच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.

चारा पिके-वाढीची अवस्था
चारा पिकास पाण्यााचा ताण बसणार नाही, याची दक्षता घ्यावी.

तुती रेशीम उदयोग-
तुती लागवड केलेल्या बागेत कुजलेले शेणखत 8 टन प्रती एकरप्रमाणे जुन महिन्यात 4 टन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात 4 टनप्रमाणे द्यावे. फांद्या खाद्यपध्दतीत शेतातून तोडलेल्या स्वाच्छ फांद्या अधारी खोलीत दोन तास ठेवून नंतर किटकास द्याव्यात. रॅकवर निळे पॉलीथीन आच्छादन म्हणून वापरावे.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.