गहू-फुटवे फुटणे किंवा दाणे भरणे
दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडेशे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकून बिळे बंद करावीत.
हरभरा-घाटे भरणे
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 400 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 80 ग्रॅम प्रती एकर फवारणी करावी.
करडई-बोंडे लागणे
करडई पिकात काळ्या माव्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 ईसी 260 मिली प्रती एकर किंवा अॅसिफेट 75 एसपी 320 ग्रॅम प्रती एकर फवारणी करावी. पाणी उपलब्ध असल्यास करडई पिकास तुषार सिंचन पध्द्तीने दोन ते अडीच तास पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
ऊस-वाढीची अवस्था
नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेल्या ऊस पिकास वरखताची मात्रा देऊन पाणी द्यावे.
संत्रा किंवा मोसंबी-फुलधारण अवस्था
आंबेबहार धरलेल्या संत्रा किंवा मोसंबी फळबागेत तणांचे नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.
डाळिंब-बहार धरणे
डाळिंब बागेत आंबेबहार धरण्यासाठी खत व पाणी व्यवस्थापन करावे.
फुल शेती-वाढीची अवस्था
छाटणी केलेल्या मोगरा फुलपिकात आंतरमशागतीची कामे करून खत व पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला-काढणी अवस्था
भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
चारा पिके-पूर्व मशागत
उन्हाळी चारा पिकांच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.
तुती रेशीम उद्योग –
हिवाळ्यामध्ये तुती बागेस हलक्या जमिनीत 8 आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. दांडातून पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केल्यास 44 टक्के पाण्यााची बचत होते.