पिकांच्या सद्याच्या अवस्थेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

गहु-फुटवे फुटणे किंवा दाणे भरणे

दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फोईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडेसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या  बिळात टाकून बिळे बंद करावीत.

हरभरा-घाटे भरणे

उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम प्रती एकर फवारणी करावी.

करडई -बोंडे लागणे

करडई पिकात काळा मावा याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 ईसी 260 मिली प्रती एकर किंवा अ‍ॅसिफेट 75 एसपी 320 ग्रॅम प्रती एकर फवारणी करावी.

ऊस- तोडणी अवस्थाा किंवा वाढीची अवस्था

ऊस तोडणीनंतर 15 दिवसांच्या आत पहिल्या पाण्याच्या पाळीबरोबर हेक्टरी 25 किलो नत्र (54 किलो युरीया), 60 किलो स्फुरद (375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व 60 किलो पालाश (100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खत मात्रा द्यावी.

संत्रा किंवा मोसंबी- फळधारणा

मृगबहार संत्रा किंवा मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब-फुलधारणा

डाळिंब बागेत आंबेबहार धरला असल्यास रोगनाशकाची फवारणी करावी.

फुल शेती-वाढीची अवस्था

फुलपिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला-काढणी अवस्था

भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके-कापणी किंवा काढणी

सध्या  हिरवा चारा उपलब्ध असल्यास त्यापासून मुरघास तयार करून ठेवावा किंवा पाणी उपलब्ध असल्यास चारा उत्पादन घेऊन मुरघास तयार करून ठेवावा. जेणेकरून हा तयार केलेला मुरघास उन्हाळ्यात चारा टंचाईच्या काळात वापरता येईल.

तुती रेशीम उद्योग –

तुतीबागेत केसाळ अळी (बिहार हेअरी कॅटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळ्यात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळ्या अंड्यातून फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिविका करतात. यामुळे पानांची चाळणी झालेली दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतिक पध्दतीने म्हणजे हाताने प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळ्या रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.